Jump to content

चष्मेवाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चष्मेवाला (पक्षी) या पानावरून पुनर्निर्देशित)
चष्मेवाला
शास्त्रीय नाव Zosterops palpebrosus
कुळ चक्षुष्याद्य (Zosteropidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Oriental White-eye
संस्कृत चटकिका
हिंदी बबूना

चष्मेवाला (गारडोळी किंवा गाऱ्या पाखरू) (इंग्लिश:Indian White Eye; हिंदी: बबूना, पिद्दी) हा आकाराने चिमणीपेक्षा लहान असलेला पक्षी आहे.

चष्मेवाला हा साधारण १० सें.मी. आकारमान असलेला पक्षी आहे. हा लहान चौकोनी शेपटीचा हिरवट-पिवळा व गर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या डोळ्यांभोवती पांढऱ्या रंगाचे ठळक वर्तुळ असते त्यावरून याचे नाव चष्मेवाला असे पडले.

आवाज

[संपादन]

Oriental White Eye.ogg आवाज ऐका

वितरण

[संपादन]
चश्मेवाला किंवा गारडोळी

चश्मेवाला वाळवंटी प्रदेश सोडून संपूर्ण भारतभर आढळतो. तसेच म्यानमार, बांगलादेश, इंडोनेशिया, पाकिस्तान या देशांतही याचे वास्तव्य आहे.

हे पक्षी ऋतुमानानुसार स्थानिक स्थलांतर करतात. भारतात हा निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. याच्या रंग आणि आकारावरून किमान चार उपजाती आढळतात.

खाद्य

[संपादन]

हा १५-२० पक्ष्यांच्या लहान थव्यात झाडांवर राहणारा (Arboreal), उत्साही पक्षी आहे. कीटक आणि मध शोधत हा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात असतो.

निवासस्थाने

[संपादन]

हे पक्षी बागा, राया व झाडी या ठिकाणी राहतात.

प्रजनन काळ

[संपादन]

साधारणपणे एप्रिल ते जुलै हा काळ या पक्ष्याचा प्रजनन काळ असून जमिनीपासून २ ते ४ मी. अंतरावर, कोळ्याच्या जाळ्याने तयार केलेले, लहान घरटे बांधतो. अंडी फिकट निळ्या रंगाची टोकाकडे गडद निळ्या टोपीची असतात. नर-मादी मिळून पिलांना खाऊ घालतात व इतर कामेही दोघे मिळून करतात.

चित्रदालन

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]