चर्चा:ॲडॉल्फ हिटलर
Appearance
'ऍडॉल्फ हिटलर' असे नाव हवे
[संपादन]या लेखाचे नाव 'ऍडॉल्फ हिटलर' असे पाहिजे असे मला वाटते. कारण मराठीत या नावाचे अशा पद्धतीने लेखन रूढ झाले आहे.. हिटलर, महायुद्ध, नाझीवाद विषयांवरील पुस्तकांत 'ऍडॉल्फ हिटलर' असे लेखन मोठ्या प्रमाणावर वापरले गेले आहे.
--संकल्प द्रविड 07:13, 20 डिसेंबर 2006 (UTC)
Pronunciation at English wikipedia says एडॉल्फ. Most people I have heard pronounce this say एडोल्फ. Original german pronunciation is आडोल्फ.
अभय नातू 07:22, 20 डिसेंबर 2006 (UTC)
- अभय, जर्मनमधला उच्चार माहीत होताच; पण हिटलरसारख्या जगभर ख्यात असलेल्या व्यक्तीचे नाव मराठीत बहुतेक जण 'ऍडॉल्फ' असे उच्चारतात/लिहितात; जो इंग्लिश भाषेच्या अमेरिकन/ब्रिटिश/कॅनेडियन ऍक्सेंटपेक्षा वेगळा असू शकेल. मग काय करावे? 'आडोल्फ हिटलर' या जर्मन उच्चाराला प्रमाण मानून 'ऍडॉल्फ हिटलर' हे व अशी अन्य रूपे असणारी पाने पुनर्निर्देशित करावीत काय? (अर्थात हा मामला हिटलरसारख्या अलीकडच्या काळातील प्रसिद्ध व्यक्तीबद्दल आहे म्हणून; 'तुर्कस्तान', 'आशिया' या उदाहरणांची बाब वेगळी आहे असे मला वाटते. :) ) मला वाटते हा मार्ग चालू शकेल.
- -संकल्प द्रविड 10:05, 20 डिसेंबर 2006 (UTC)