चर्चा:२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील नेमबाजी - पुरुष १० मीटर एर रायफल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

'एर रायफल' बरोबर की 'एअर रायफल'? हे अमेरीकन उच्चार आहेत काय? V.narsikar १२:४६, १६ सप्टेंबर २००९ (UTC)

इंग्लिशमधील air एर शब्दाच्या उच्चारात दीर्घ ए आहे, जो देवनागरीत लिप्यंतरीत होत नाही. एअर लिहिले असता मधला पूर्णतः ध्वनित होतो, तरी असे लिहू नये हे माझे मत आहे. उच्चार करताना context-specific उच्चार करण्यात यावा.
इंग्लिशमध्ये कमीत कमी तीन तरी उच्चार आहेत - e(bet, set), ai(air, chair), a*e (pare, tare). कानडीत दोन ए आहेत (र्‍हस्व आणि दीर्घ). देवनागरीत एकच ए आहे.
हाच प्रकार च्या बाबतीतही आहे.
हिंदीमध्ये airचे लिप्यंतर एर, एअर, एयर असे अनेक प्रकारे केलेले आढळते. इतर भाषा/लिप्यांतून असलेले अधिक स्वर देवनागरीत लिप्यंतरित कसे करावे याचे नियम मी अजून तरी पाहिलेले नाहीत. जर तुम्हाला कोठे आढळल्यास येथे कळवावे.
अभय नातू १८:१०, १६ सप्टेंबर २००९ (UTC)
ता.क. अमेरिकेतील विविध प्रदेशांतून एकाच शब्दाचा उच्चार अनेक वेळा अगदी वेगवेगळ्या प्रकारे होतो - उदा: नू योक (बॉस्टन, न्यू इंग्लंड), न्यू यॉर्क (मान्य अमेरिकन इंग्लिश), न्युयॉर्क (अमेरिकेचा पूर्व किनारा सोडून), नू यॉक (खुद्द न्यू यॉर्क)