चर्चा:हुआन पुहोल गार्सिया
हा लेख ऐसीअक्षरे या स्थळावर ॠषिकेश यांनीच आधी प्रकाशित केलेला आहे. विकिवरील ॠषिकेश हा एकच लेखक असल्याने प्रताधिकाराचा प्रश्न होऊ नये! उच्चार विषयक नावाचे किंवा अजून काही मतभेद असल्यास तसे कळवावे. (आणि लेख काढून टाकण्याचे संदेश (की धमकी?)पानावर देतांना कृपया सही करावी!)
लेख उत्तम झाला आहे. इतका मोठा लेख येथे आणल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन!! निनाद १६:४५, १३ डिसेंबर २०१३ (IST)
अंशत:मशिन ट्रांसलेशन ?
[संपादन]लेखातील "तिथून त्याने काही थापा रिपोर्ट म्हणून पाठवले." अशा स्वरूपाच्या वाक्यामुळे,लेख लिहिताना अंशत: मशिन ट्रांसलेशन वापरले गेले होते का असे वाटले म्हणून अल्पसे पुर्नलेखन करत आहे.बदल अयोग्य वाटल्यास परतवू शकता.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:१८, १३ डिसेंबर २०१३ (IST)
उदयोन्मुख लेख ?
[संपादन]इंग्रजी विकिपीडियावरून लेख अनुवादीत करून घेण्यात बरीच मेहनत घेतली गेली आहे.लेखात, अंशत: मशिन ट्रांसलेशन अथवा मराठीकरणाच्या प्रयत्नांमुळे काही वाक्यात कृत्रिमता आली असावी.स्वैर अनुवादाच्या प्रयत्नात काही ठिकाणी अविश्वकोशीय वर्णनात्मकता आली आहे.पण लेख बऱ्या पैकी माहिती पूर्ण झाला आहे.ओळीत संदर्भ देत लेखन सुधारणा आणि अधिक लेखन केल्यास हा मराठी विकिपीडियावरील एक चांगाला लेख ठरू शकेल.
मुखपृष्ठ उदयोन्मुख लेखाचे निकष मला तितकेसे माहीत नाहीत पण त्याबद्दल संबधीतांनी विचार करावा असे वाटते.लेख लिहिणाऱ्या अनुवादक लेखकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:२४, १४ डिसेंबर २०१३ (IST)