चर्चा:हराळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गावांबद्दलचे अनेक लेख विकीवर नव्याने आले आहेत. प्रत्येक लेखात गावाचे क्षेत्र (?) हेक्टरमध्ये दिले आहे. अशी परंपरा नाही. हेक्टर हे साधारणपणे शेतजमिनीचे मोजमाप असते. एखाद्या प्लॉटचे किंवा शहराचे मोजमाप गुंठ्यांत, चौरस फुटांत, चौरस मीटर/किमी.मध्ये देण्याची आजवरची पद्धत आहे.

आणखी एक, क्षेत्र आणि क्षेत्रफळ यांचे अर्थ समान नाहीत. क्षेत्राचे गाव म्हणजे तीर्थक्षेत्राचे गांव. पंढरपूर, आळंदी, काशी ही क्षेत्राची गावे आहेत. ..... (चर्चा) १९:००, २ मार्च २०१६ (IST)

क्षेत्र हा शब्द सर्व सरकारी कागदपत्रांत, जनगणना अहवालात क्षेत्रफळ या अर्थाने वापरात आहे. सदर अहवालाचा संदर्भ दिलेला आहे. Area साठी क्षेत्र हा शब्द वापरला जातो. एकक कोणतेही असू शकते. केवळ तीर्थक्षेत्रच नव्हे - सबंधित वैशिष्ठ्याशी जोडून अवर्षणप्रवणक्षेत्र, सागरीक्षेत्र, कार्यक्षेत्र, सामाजिक क्षेत्र.. असे शब्द नेहेमीच वापरले जातात.


सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:५०, १८ मार्च २०१६ (IST)