चर्चा:स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
Appearance
Historian Prof Sreedhara Menon
समसमीक्षा
[संपादन]या विषयाच्या अभासूंनी "सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर ह्यांनी राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन ब्रिटिश शासनाने त्यांना जन्मठेपीची शिक्षा देऊन काळ्यापाण्यावर धाडले." हे वाक्य व्याकरण दृष्ट्या व्यवस्थित लिहिले आहे का हे पुन्हा एकदा पडताळून घ्यावे. या वाक्यामुळे शिक्षा नेमकी कुणाला आणि का झाली या बद्दल किंचीत संदिग्धता जाणवते.
Mahitgar १४:५९, ३० जानेवारी २००७ (UTC)
वाक्य संदिग्ध मुळीच नाही. बाबाराव सावरकरांनी राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केले असा आरोप ठेऊन त्यांना (म्हणजे बाबारावांनाच) शिक्षा झाली. कदाचित दोघा सावरकरबंधूंना काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती हे माहित नसल्याने संदिग्धता वाटत असेल. अर्थात लेख अपुरा असल्यामुळेच अशा संदिग्धतेला वाव आहे.
सुशांत २१ मार्च २००७