चर्चा:सौर औष्णिक विद्युत केंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

औष्णिक हे शीर्षक योग्य?[संपादन]

वीज निर्मीतीमध्ये ढोबळमानाने खालील प्रकार आढळतात.

  • औष्णिक- दगडी कोळसा व तत्सम इंधनांचे ज्वलन करुन
  • आण्विक- अणू भट्ट्यांतील
  • सौर- सुर्याच्या शक्तीचा वापर करुन

असे असेल तर शीर्षक योग्य आहे का?


Dr.sachin23 ०३:४५, ११ मे २०११ (UTC)

सौर उर्जा ही सहसा सिलिकॉन किंवा तत्सम फोटोव्होल्टेक कोश वापरुन सूर्यप्रकाशाचे वीजेत रुपांतर करण्याच्या प्रक्रियेची संज्ञा आहे. सौर औष्णिक उर्जानिर्मितीप्रक्रियेत सूर्यप्रकाश अनेक आरशांच्या सहाय्याने एका बिंदूवर केन्द्रित करुन प्रचंड प्रमाणात उष्णता तयार केली जाते व त्याद्वारे पाणी किंवा इतर द्रवाचे बाष्पीकरण करुन जनित्र चालवले जाते.
अभय नातू १५:०५, ११ मे २०११ (UTC)

नबदललेलेच इष्ट ..![संपादन]

विद्युत निर्मितीचा क्षेत्रात प्रथम जल विद्युत केंद्र आणि औष्णिक विद्युत केंद्र हेच प्रमुख प्रकार होते. जशी जशी विजेची गरज वाढत गेली तसे तसे वैद्यानिकांनी वीजनिर्मितीची अनेक पर्याय शोधून काढलेत. त्यामध्ये आण्विक आणि सौर उर्जा हे प्रचलित प्रकार होत. सौर उर्जेत सूर्य किरणांचा वापर करून सरळ विद्युत निर्मिती केलीजते तर आण्विक प्रकारात अणुउर्जेचा वापर करून तयार होणार्या उष्णतेवर औष्णिक विद्युत तयार करण्यात येते.


आता झालेत्या नवीन प्रयोगन्द्वारे हे सिद्ध करण्यात आले आहे कि सौर उर्जेचा सरळ वीजनिर्मिती करिता वापर करण्यापेश्या जर सौरुर्जेस (अनुउर्जे प्रमाणे) औष्णिक विद्युत तयार करण्यास वापरले तर जास्त रूपांतरण कार्यक्षमता मिळवता येते. आता आपणा कडे सौरुर्जेचे वीजनिर्मितीसाठी दोन पर्याय झालेत त्यांना स्वतंत्र परिभाषित करण्यासाठी सौर औष्णिक विद्युत आणि सौर उर्जा असे संबोधतात. म्हणून माझ्या मते सदर लेखाचे नाव हे नबदललेलेच इष्ट.

राहुल देशमुख ०६:५०, ११ मे २०११ (UTC)

ता.क. इंग्लिश विकीची लिंक ही सोलर थर्मल च्या मध्ये चुकीचे शीर्षक म्हणुन संबोधलेले आहे.

त्या दुव्यावर गेल्यास खालील संदर्भ येतो आहे.


http://en.wikipedia.org/wiki/Solar_thermal%7C

Bad title From Wikipedia, the free encyclopedia Jump to: navigation, search

The requested page title is invalid. It may be empty, contain unsupported characters, or include a non-local or incorrectly linked interwiki prefix. You may be able to locate the desired page by searching for its name (with interwiki prefix, if any) in the search box.

Possible causes are:

  • an attempt to follow a link to a diff for a page that has since been deleted;
  • an attempt to load a URL such as http://en.wikipedia.org/wiki/%7C (the | character is not permitted in page titles);

Dr.sachin23 ०७:३८, ११ मे २०११ (UTC)


मापदंड[संपादन]

सर्व साधारणतः तांत्रिक क्षेत्रात नामांकनाचे मापदंड हे साचेबंध नसले तरी बरेचदा रुढीमुळे, पद्धती मुळे, तर अनेकदा निर्मात्या/सोधकर्त्याच्या च्या नावावर नामकरण झालेले दिसते. जर एखादे नाव मान्यता प्राप्त तांत्रिक व्यावसायिक सहयोग संघांनी मान्य केलेले असेल तर ती नामाकने स्वीकारण्यास हरकत नाही. मी पडताळले असता आय ई ई ई ( IEEE - ह्या क्षेत्रातील मानके बनवणारी संस्था ) शोधनिबंधानमध्ये हि सौर औष्णिक विद्युत हा शब्द प्रचलित असल्याचे दिसते.

इंग्रजी विकीपिडीयाच्याच इतरही काही विभागात (माहितीची दुवे देत आहोत ) ह्याच शब्दाला ज्यास्त प्रमुख पणे वापरल्याचे आढळते. अगदी ह्या नावाचा वर्ग सुद्धा इंग्रजी विकिपीडियात आहे. म्हणून नाव नबदलेलेच इष्ट असे वाटते.

राहुल देशमुख १८:११, ११ मे २०११ (UTC)