चर्चा:सुरेशबाबू माने
Appearance
सुरेशबाबू हा शब्द या लेखात अनेकदा आला आहे. फक्त एकाच ठिकाणी तो (अरुंधती कुलकर्णींनी)दुरुस्त करून सुरेश बाबू असा केला आहे. असे करण्याचे कारण समजेल का?...J १९:२७, २७ एप्रिल २०११ (UTC)
बाबू
[संपादन]मला वाटते सुरेशबाबू असे लिहिणे बरोबर आहे कारण बाबू ही त्यांच्या नावाला दिलेली जोड आहे. जसे शांतारामबापू वणकुद्रे, वसंतराव नाईक, अजितदादा पवार, सखारामपंत बोकील, इ नावांत जागा सोडली जात नाही तसेच येथेही जागा न सोडता सुरेशबाबूच लिहावे.
जर त्यांच्या वडीलांचे नाव, किंवा त्यांचे दुसरे नाव (मिडल नेम), बाबू असते तर ते नाव सुरेश बाबू माने लिहीणे योग्य ठरेल. जसे तानाजी बाबू वायदंडे, ज्ञानेश्वर बाबू भिंताडे, इ.
अभय नातू १९:३६, २७ एप्रिल २०११ (UTC)