चर्चा:शंकर गोपाळ तुळपुळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लेखन आणि संपादन यांची सरमिसळ टाळावी[संपादन]

साहित्यिकांच स्वत:च लेखन आणि इतरांच्या लेखनाच केलेल संपादन या दोन भीन्न बाबी आहेत.जिथे माहिती उपलब्ध असेल तिथे लेखन आणि संपादन वेगवेगळ दाखवाव सरमिसळ टाळली जावयास हवी.

  • मूळ लेखन ज्या व्यक्तीच आहे त्या व्यक्तीचा उल्लेख हा त्या लेखकाचा नैतीक आणि कॉपीराइट कायद्याने कायदेशीर आधीकार असतो.त्रयस्थ व्यक्तीने एखाद्या दुसऱ्या लेखकाच लेखन केवळ संपादन केल म्हणून, त्रयस्थ व्यक्तीच्या लेखनाच्या श्रेय नामावलीत येण,सरमिसळ होण न्याय आणि प्रशस्त ठरत नाही.म्हणून तो उल्लेख वेगळा असावा
  • ज्ञानकोशात दिली जाणारी माहिती नेमकी असावी, गैरसमजास वाव देण्यास जागा ठेवणारी नसावी.सरमिसळ केल्याने दिशाभूल होण्याची शक्यता रहाते.ज्ञानकोशातील माहिती इतरत्र संदर्भाकरता वापरली जाते आणि चुकीचे संदर्भ दिल्या जाण्याचा स्रोत ठरणे ज्ञानकोशास भूषणावह ठरणारे असणार नाही.

त्यामुळे लेखन आणि संपादन जिथे माहिती उपलब्ध आहे तेथे वेगळा निर्देश केला जावा असे माझे आग्रहाचे मत आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:३६, २६ जून २०१३ (IST)