चर्चा:वामन लक्ष्मण कुलकर्णी
प्रा. वा. ल. कुलकर्णी
[संपादन]बालपण व जडणघडण
[संपादन]वा. ल. अर्थात वामन लक्ष्म्ण कुलकर्णी यांचा जन्म पूर्वीच्या खानदेश जिल्ह्यातील चोपडे या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण नाशिक हायस्कूल नाशिक येथे तर पदवी व पदव्युखत्तर शिक्षण हं. प्रा. ठाकरसी कॉलेज, नाशिक व विल्सन कॉलेज, मुंबई येथे झाले. बी.ए. (इंग्रजी) व एम.ए. (मराठी) शिक्षणानंतर ते मुंबई येथे छबिलदास हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत झाले. (१९३५-३६). पुढे १९४४ पर्यंत विल्संन हायस्कूल, मुंबई येथे शिक्षकी पेशा केल्यानंतर विल्सन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य. नंतर १९५९ पासून औरंगाबाद येथील तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्यां मराठी भाषा व वाङ्मय विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत झाले. येथे त्यांनी १९७३ पर्यंत कार्य केल्यानंतर १९७४ ते १९७६ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून रूजू झाले. येथून ते १९७६ मध्ये निवृत्त झाले.https://mr.wikipedia.org/s/szv
ग्रंथसंपदा
[संपादन]ग्रंथ
- वामन मल्हार : वाङ्मयदर्शन (१९४४)
- वाङ्मयातील वादस्थळे (१९४६)
- वाङ्मयीन मते आणि मतभेद (१९४९)
- वाङ्मयीन टीपा आणि टिप्पणी (१९५३)
- वाङ्मयीन दृष्टी आणि दृष्टिकोन (१९५९)
- श्रीपाद कृष्ण : वाङ्मयदर्शन (१९५९)
- साहित्य आणि समीक्षा (१९६३)
- मराठी ज्ञानप्रसारक : इतिहास आणि वाङ्मयविचार (१९६५)
- साहित्य : शोध आणि बोध’ (१९६७),
- न. चिं. केळकर : वाङ्मयदर्शन (१९७३)
- हरिभाऊंची सामाजिक कादंबरी (१९७३)
- साहित्य : स्वरूप आणि समीक्षा (१९७५)
- विविधज्ञानविस्तार : इतिहास आणि वाङ्मयविचार (१९७६)
- मराठी कविता : जुनी आणि नवी (१९८०)
संपादने
- मराठी कविता (१९२०-१९५०) (१९५०)
- हरिभाऊंच्या कादंबरीतील व्यक्ती (१९६२)
- मराठी नाटक आणि रंगभूमी (१९६३)
- काव्यानतील दुर्बोधता (१९६६)
- मराठी समीक्षा (१९७२)
- एका पिढीचे आत्मकथन (१९७५)
वामन लक्ष्मण कुलकर्णी असे दोन लेख झाले आहेत ते एकत्र करावे लागतील.WikiSuresh (चर्चा) १२:१०, २ मार्च २०१८ (IST)