Jump to content

चर्चा:लैंगिक शिक्षण

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी विकिपीडियाच्या दृष्टीने हा लेख महत्त्वाचा वाटतो परंतु त्याचे स्वरूप एखाद्याने आपली व्यक्तिगत मत मांडल्याप्रमाणे आहे. तरी या लेखात ज्ञानकोशाच्या चौकटीत मोडणारे बदल घडवून आणावे का?

priyambhashini १५:३८, १८ जून २००७ (UTC)

हो.

अभय नातू २३:५५, १८ जून २००७ (UTC)

इंग्रजी विकिपीडियाची नीव्वळ नक्कल होऊ नये म्हणून मराठी डॉ. आणि ईंटरनेटवर इतरत्र झालेल्या चर्चांचा संदर्भ दीलेत.हा लेख अधिक दर्जेदार पद्धतीने घडवण्यात तुम्ही देऊ करत असाल ती मदत उपयोगी पडेल. कोणत्या पद्धतीने बदल करावेत या बद्दल अजून चर्चा केलीत तर तसे करणे सोपे जाईल.

-शलाका

शलाका, तुम्ही घालत असलेल्या विषयाचे आणि लेखाचे कौतुकच वाटले. बदल करण्यासाठी मुखपृष्ठावरील नागपूर हा लेख पाहा. लेखकाने निव्वळ माहिती दिली आहे, व्यक्तिगत मत (म्हणजे मला असे वाटते, मी म्हणतो इ. इ.) मांडलेले नाही. दुसरे उदा. म्हणजे जीवशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात ही माहिती कशाप्रकारे आली असती असा विचार केल्यास स्वरूप लक्षात येईल असे वाटते. अधिक माहिती विकी प्रबंधक पुरवतीलच.

priyambhashini १९:३५, १९ जून २००७ (UTC)

विश्वकोशीय पद्धतीने माहिती लिहावी

[संपादन]

शलाका, ज्याप्रकारे एखाद्या विश्वकोशातील माहितीपूर्ण लेखात काही विचारांचा प्रचार करण्यापेक्षा माहितीचा प्रसार करण्याच्या हेतूने वस्तुस्थिती मांडली जाते, त्याप्रकारे या लेखामध्ये मांडायचा प्रयत्न करावा. लैंगिक शिक्षणाबद्दल जी माहिती संशोधन, सर्वेक्षण यातून पुढे आली आहे ती शक्य तितक्या निरपेक्ष(neutral) भाषेत मांडावी. लेखात एका ठिकाणी 'तरीही आपण सुन्न....बधिर' असे वाक्य वाचले. याप्रकारची भावनिक अभिव्यक्ती दर्शविणारी भाषा टाळावी. विषयाचा एकंदर वैश्विक आवाका मांडता आला तर उत्तम. तसेच, 'आम्ही एका शाळेत गेलो होतो..' वगैरे स्वरूपातील व्यक्तिगत अनुभव सांगणारी मांडणी करू नये.

प्रिया यांनी सांगितल्याप्रमाणे मुखपृष्ठावर नागपूर, तसेच इतर जुन्या मासिक सदरांचे लेख धुंडाळून वर सांगितलेल्या मुद्द्यांच्या आधारे त्यांची मांडणी कसःई केली आहे ते पाहा. तुम्हाला त्यातून बराच अंदाज येईल.

--संकल्प द्रविड ०७:५९, २१ जून २००७ (UTC)

Old Feature Articles
You can find old feature articles here -- मुखपृष्ठ सदर लेख
--Abhay (who has temporarily lost the ability to login and edit in devnagari) :-(

शलाका, इंग्रजी विकिवरील सेक्स एज्युकेशन या लेखाचा उपयोगही तुम्हाला करता येईल असे वाटते. थोडे बदल करून दाखवले आहेत. शुभेच्छा! priyambhashini १३:४३, २१ जून २००७ (UTC)

'लैंगिक शिक्षणाची सोय'

[संपादन]

हा संपूर्ण परिच्छेद लेखातून काढून टाकून दुव्यामध्ये टाकावा. --J- J १३:१९, २१ जून २००७ (UTC)

आयुर्वेद आणि पपई

[संपादन]

"हवामान व प्रकृतीनुसार पाळावयाचे पथ्य आणि कुपथ्य या विषयात आयुर्वेदात जेवढे संकेत आहेत तेवढे आधुनिक वैद्यकशास्त्रात नाहीत."

पपई विषयी लिहीले असताना हे वाक्य कुणी अंतर्भूत केले याची कल्पना नाही. माझ्या माहिती प्रमाणे पोर्तुगिज पूर्व काळात पपई हे फळ भारतात नव्हते. त्यामुळे "गरोदरपणात पपई खाऊ नये " या समजाचा आयुर्वेदाशी संबध आहे का, यावर इतिहास तज्ञांनी प्रकाश टाकावा. "1500s: Papaya seeds brought to Panama and the Dominican Republic. Spanish and Portuguese sailors transported seeds to many subtropical countries including the Philippines, Malacca, and India."Facts History

याचा आयुर्वेदातही नेमका उल्लेख कुठे आहे याचा काही संदर्भ आहे का? उपलब्ध आहे का असल्यास कळवणे. अनेक पथ्य कुपथ्यांच्या थंड गरमच्या पदार्थ निहाय उल्लेख आयूर्वेदात पण नाहीत तरीही असे समज भारतीय समाजात आहे प्रत्येक समज चुकीचा आहे हे दाखवण्याचा येतेह उद्देश नाही .


सुचनांबद्दल धन्यवाद. आपण लोकांनी सागीतल्या प्रमाणे प्रयत्न करेन.आपण कुणी परस्पर बदल केलेत तर तशी काही हरकत नाही. -शलाका

लेखाचा इतिहास/ पपई

[संपादन]

लेखाचा इतिहास (log) पाहिल्यास कोणी कोणते बदल केले हे तुम्हाला कळू शकेल. एखाद्याने केलेल्या बदलाबद्दल तुम्ही साशंक असाल किंवा संदर्भ हवा असेल तर तुम्ही तसे त्या सदस्यास कळवू शकता.

पपईचे उदाहरण हे लैंगिक शिक्षणापेक्षा गर्भारपणातील अंधविश्वासांशी निगडीत वाटते. यापेक्षा समर्पक उदाहरण लेखाच्या सुरूवातीला असावे असे वाटते.

priyambhashini १६:२८, २१ जून २००७ (UTC)

पपई हे झाड मूळ उष्णकटिबंधीय मध्य अमेरिकेतले. आफ्रिकेत याच्या सालीपासून दोर तयार करतात. ते सतराव्या शतकात भारतातून चीनमध्ये गेले. एवढीच माहिती माझ्याकडे आहे. पपईने गर्भपात होतो या समजुतीचे मूळ शोधणे अवघड आहे. पण एकदा असा समज पसरला की त्याची शहानिशा करण्याची हिंमत कोणतीही गर्भवती स्त्री करणार नाही. मोठ्या प्रमाणात पपया खाल्यावर गर्भपात होत नाही असे संशोधनाने सिद्ध झाले असल्यास वाचायला आवडेल.--J--J ०४:२७, २२ जून २००७ (UTC)


--- गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये हा फक्त भारतातच नव्हे तर जागतिक समज आहे हे इंटरनेटवर मुशाफिरी करून आल्यावर समजले. कच्ची किंवा अर्धवट पिकलेली पपई खाण्याने गर्भाशय आकुंचन पावतो आणि त्यामुळे गर्भपाताची शक्यता वाढते हे उंदरावर केलेल्या प्रयोगांतून सिद्ध झाल्याचे वाचले. पिकलेल्या पपईचा असा परिणाम आढळला नाही. भारतात, विशेषतः गुजराथमध्ये कच्ची पपई रोजच्या खाण्यात असते. पपईचा प्रयोग स्त्रियांवर केला नसावा असे वाटते.

ई विटॅमिन्जच्या संकेतस्थळांवर पपईचा उल्लेख सापडला नाही. अव्होकॅडो, किवी, केळे, सफरचंद आणि करवंदांमध्ये ई भरपूर असल्याचे दिसते. पपई हे त्यामानाने स्वस्त आणि सहज मिळणारे फळ असल्याने ई, अ आणि क व्हिटॅमिनसाठी आणि पेप्टिनकरिता त्याचे सेवन लाभदायक आहे यात शंकाच नाही.

आयुर्वेद हे प्राचीन वैद्यकशास्त्र असले तरी त्यात एकोणीसाव्या शतकापर्य़ंत संशोधन आणि भर पडत होती असे पपईची माहिती शोधताना सापडले. पपईला संस्कृतमध्ये मधुकर्कटी आणि एरंडकर्कटी असे दोन शब्द सापडले. मधुकर्कटीचा खजूर हाही एक अर्थ असल्याचे शब्दकोशांवरून समजले.-J---J ०९:२८, २३ जून २००७ (UTC)