Jump to content

चर्चा:राघोजी भांगरे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख या आधी, भाऊ चासकर यांच्या sahyadree.blogspot.com या ब्लॉगवर आहे. तिथून तो शुद्धलेखनाच्या चुकांसकट इथे नकल-डकव पद्धतीने उमटवला आहे. मात्र, त्या आणि या लेखाचे लेखक एकच असतील तर प्रताधिकारभंगाचा आरोप करता येणार नाही; तसे नसल्यास गोष्ट वेगळी.--..J १८:२८, १० मे २०११ (UTC) सह्याद्री.ब्लॉगस्पॉटवरचा लेख या अगोदर ज्ञानदीप-संवाद.ब्लॉगस्पॉटवर आला होता आणि हे सर्व लेख श्री.वा.नेर्लेकरांनी मटामध्ये १-५-२००८ ला लिहिलेल्या लेखावर आधारित आहेत. लेख उत्तम आहे, केवळ मामुलीसा प्रताधिकारभंग आहे म्हणू नाकारू नये...J १८:४७, १० मे २०११ (UTC)

संदर्भ हवे?

[संपादन]

संदर्भ हवे हा साचा लावताना खालील दिलेले बाह्य दुवा तपासून पहाने योग्य ठरले असते.

हा लेख भाऊचासकर यांनी लिहिलेला आहे, ते नवीन सदस्य आहे, त्यांच्या लेखाचे स्वागत व अभिनंदन करणे अपेक्षित होते परंतु.... राहुद्या.

त्यानी स्वतः केलेल्या "सकाळ"मधील लेखना आधाराने इतरांनी लेखन केलेले आहे. हे लेखन त्यांनी स्वतः केलेले आहे यात काही वाद नाही.

Dr.sachin23 १५:२९, १२ मे २०११ (UTC)

वस्तुनिष्ठ व विश्वासार्ह संदर्भांसह माहिती लिहावी

[संपादन]

>> त्यानी स्वतः केलेल्या "सकाळ"मधील लेखना आधाराने इतरांनी लेखन केलेले आहे. << डॉ. सचिन, माझा वरील वाक्यास आक्षेप आहे. तटस्थता, व्यक्तिनिरपेक्षता व वस्तुनिष्ठता या मूल्यांवर विकिपीडिया प्रकल्प आधारित आहे. त्यामुळे हे लेखन भाऊ चासकरांनी केले आहे, की अन्य कोणी याच्याशी विकिपीडिया समुदायास काहीही देणे-घेणे नसावे (अर्थात, जर ते प्रताधिकारमुक्त असेल तर). तसेच त्यांच्या किंवा अन्य कुणाही सदस्याच्या अन्य प्रकाशनांतील/माध्यमांतील साहित्यिक महिमेशीही विकिपीडिया समुदायास वस्तुतः काही कर्तव्य नसावे. लेखनातील मजकूर वस्तुनिष्ठ आहे किंवा नाही, विश्वासार्ह संदर्भांसह लिहिला आहे किंवा नाही, लिखाणातून व्यक्तिपूजन केले/व्यक्तिस्तोम माजवले जात आहे किंवा कसे, लेखनात लेखकाची स्वतःची विधाने किंवा निष्कर्ष सर्वसाधारण माहिती म्हणून घुसडले जात आहे का, हे तपासणे प्रत्येक जागरूक विकिपीडियन सदस्याचे कर्तव्य असावे.

उदा.: "ठावठिकाणा विचारायला आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्याने चिडलेल्या पोलिसांनी आईचे निर्दयपणे हाल केले" हे वाक्य कोणत्या संदर्भानिशी लिहिले आहे ? यात "निर्दयपणे" असे विशेषण बहाल करण्याजोगे हाल करण्याचे कोणते तपशील लेखकाला साधार माहीत आहेत ? तसेच, "कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले" हे वाक्य वाचताना "एकंदरित सर्वच सावकार जमिनी बळकावू लागले" असा निष्कारण जनरलाइझ केलेला आरोप केल्याचा अर्थ निघतो.. त्याबद्दल संदर्भ नको का ? अन्य विधानांबद्दल अशीच संदिग्धता आढळल्यामुळे "संदर्भ हवे" साचे लावले आहेत.

विश्वासार्ह व विद्वत्तापूर्ण संदर्भ असतील, तर ते जरूर नोंदवून विधाने सिद्ध करावीत. अन्यथा गावगन्ना बोलवा "माहिती" या लेबलाखाली विकिपीडियावर खपवू नये.

हे पोस्ट व्यक्तिशः तुमच्याबद्द्ल किंवा अन्य कुणाही लेखकाविरुद्ध नाही; त्यामुळे जैरसमज करून घेऊन राग धरू नये. मात्र मराठी विकिपीडियावरील व्यक्तिविषयक लेखांमध्ये बर्‍याचदा (आणि हल्ली वरचे वर) पक्षपाती/व्यक्तिपूजक/भलामणखोर मजकूर "माहिती"च्या नावाखाली खपवण्याचे प्रकार घडू लागले आहेत, त्यामुळे हे रोखठोक पोस्ट लिहावेसे वाटले.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:५२, १२ मे २०११ (UTC)

सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावर विषयतज्ञांनी केलेले लिखाण स्वागतार्ह आहे आणि अशा अनेक तज्ञांनी येथे येउन लिहीणे हे आपल्या सगळ्यांच्याच हिताचे आहे.
त्याच बरोबर विकिपीडियावरील जे संकेत आहेत (त्यातील काही संकल्पने वर उद्धृत केले) ते पाळणे अतिमहत्वाचे आहे. त्यासाठी तज्ञ असणे किंवा नसणे जरुरी नाही.
अजून एक लिहावेसे वाटते की बरेचदा लेखकाने लिहिलेल्या मजकूराचे प्रताधिकार लेखकाकडेच असतात असे नाही. वृत्तपत्रांत छापण्यासाठी दिलेला मजकूर सहसा (छापला गेला तर) वृत्तपत्राच्या मालकीचा होतो. लेखकाचे पुस्तक प्रकाशित झाल्यावर प्रकाशकाचे होते (सर्व हक्क प्रकाशकाधीन - असे वाचल्याचे आठवत असेल).
चासकरांच्या लेखनाचे हक्क त्यांच्याकडे असतीलही आणि तसे असल्यास त्यांनी येथे येउन ही माहिती विकिपीडियास दिली याबद्दल त्यांचे शतशः धन्यवाद. परंतु प्रताधिकार नसताना लेखकाने स्वतःचाच मजकूर नकलवणे आणि इतर कोणी तो नकलवून येथे डकवणे यात फरक नाही.
असो, पुन्हा एकदा चासकरांनी विकिपीडियावर केलेल्या लेखनाबद्दल धन्यवाद आणि या किंवा इतर कोणत्याही विषयावर माहिती, मदत हवी असल्यास ती आम्हा सर्वांस मनमोकळेपणे विचारावे असे आवाहन.
अभय नातू १६:५९, १२ मे २०११ (UTC)

संदर्भ तर हवेत पण विश्वसनीयताही हवी

[संपादन]

(१)लेखात संदर्भ फक्त महाराष्ट्र सरकारच्या दर्शनिकेचा दिला आहे. (२)दर्शनिकेत नसलेले तपशील लेखात आहेत. (३)लेख चरित्रपर आहे, पूर्णत: ललित नाही. त्यामुळे माहिती अनेक ठिकाणाहून गोळा करायला लागली असणार. (४)लेख यापूर्वी इतर माध्यमांतून प्रसिद्ध झाला होता. परंतु, मूळ लेख याच लेखकाने सकाळमध्ये छापून आणला होता, असा दावा आहे.

लेखातली माहिती विश्वसनीय असेल तर वरील कोणत्याही गोष्टीला हरकत घ्यायचे कारण नाही; फक्त ती विश्वसनीयता साधार असावी. आणि खरोखरच सकाळमध्ये प्रसिद्ध झालेला मूळ लेख याच लेखकाचा असेल (जरी असे असण्याची गरज नाही!), तर तो मूळ लेख एप्रिल २००८ पूर्वी प्रकाशित झालेला असला पाहिजे. तरच लेखकाचा दावा मान्य होऊ शकेल.

यापूर्वी फारशी कुणाला नसलेली माहिती देणारा असा चांगला लेख विकीत आणल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन आणि आभार. ...J १६:२८, १२ मे २०११ (UTC)

संदर्भातील काही वाक्ये...

[संपादन]

संदर्भा दाखल खालील वाक्ये की जी तद गॅझेट मधे प्रकाशित झालेली आहेत, तिचा संदर्भ घ्यावा.

"ठावठिकाणा विचारायला आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्याने चिडलेल्या पोलिसांनी आईचे निर्दयपणे हाल केले" हे वाक्य कोणत्या संदर्भानिशी लिहिले आहे ?

During the investigation the police asked Raghoji's mother where her son was hiding; and when she refused to tell she was put to torture. संदर्भ- http://ahmednagar.nic.in/gazetteer/his_modern_period.html

कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले" हे वाक्य वाचताना "एकंदरित सर्वच सावकार जमिनी बळकावू लागले"

an influential Koli, at the head of a well trained gang, began a series of attacks on the moneylenders who habitually cheat and oppress the hill-tribes and at intervals drive them into crime. Many of the moneylenders were robbed and some had their noses cut off.

संदर्भ- http://www.maharashtra.gov.in/pdf/gazeetter_reprint/Poona-II/history_british.html#.

गावगन्ना बोलवा "माहिती"

[संपादन]

ही सर्व माहिती गावगन्ना बोलवा "माहिती" असेल असे मला तरी वाटत नाही. त्या दाखल मी काही संदर्भ दिलेले आहेतच. बाकी काही गॅझेटमध्ये उल्लेख आहेत परंतु मी ते उल्लेखित केलेली नाहीत.

  • गॅझेट फक्त दर्शनिका आहे काय? म्हणजे ती सन्माननीत सदस्यांना विश्वसनीयता असलेली वाटत नाही काय? या संदर्भात चर्चा व्हावी.
  • ५ गॅझेटस् व इतर इतिहासाच्या उल्लेखांमध्ये येणारा 'कोळी उठावा'चा हा एक भाग होता. त्यांनी हा उठाव अत्याचारांच्या विरुध्द केलेला होता. आजही उल्लेखित "सावकार" या प्रजातीची नावे अजुनही अकोले तालुक्यातील ६०-७०% ७/१२ च्या शेतीच्या उतार्‍यावर इतर हक्कांत आढळतात. त्याला माझे स्वतःचे Land Records अपवाद नाहीत.

Dr.sachin23 १७:२३, १२ मे २०११ (UTC)

सहसा संशोधकांनी तौलनिक अभ्यास करून लिहिलेल्या ग्रंथांना माहितीच्या दृष्टीने विश्वासार्हता असते (उदा. रा.चिं. ढेर्‍यांच्या साहित्यात अश्या प्रकारच्या तौलनिक संशोधनाची उदाहरणे सापडतात). अश्या साहित्यात मूळ दस्तऐवजांचे उल्लेख नोंदवत तार्किक संशोधन मांडलेले असते, त्यामुळे त्यांना विश्वासार्हता प्राप्त होते. तुम्ही नोंदवलेले हे पान अहमदनगर जिल्ह्याच्या अधिकृत प्रशासकीय संकेतस्थलावरील सर्वसाधारण माहितीचे पान आहे. त्यावर कित्पत विश्वास ठेवायचा, याबाबत मलातरी शंकाच वाटते - कारण अशी संकेतस्थळे ढोबळमानाने असलेला इतिहास सोप्या पद्धतीने लिहून मोकळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:५१, १३ मे २०११ (UTC)

गॅझेट विश्वासार्ह आहे की नाही?

[संपादन]

सरकार गॅझेट का छापते मला आज हा प्रश्न पडलेला आहे. जर ते विश्वासार्ह नसेल तर सरकार त्याला का छापते व का वेळ खाऊ पध्दती अवलंबते हे मला कळालेले नाही.

सदस्यांना सांगितल्याप्रमाणे "रा.चिं. ढेर्‍यांच्या साहित्य" किंवा इतर संशोधने कशा स्त्रोतांचा आधार घेतात, की जे एवढे विश्वासाहार्य असतात.

"अहमदनगर जिल्ह्याच्या अधिकृत प्रशासकीय संकेतस्थलावरील सर्वसाधारण माहितीचे पान आहे. त्यावर कित्पत विश्वास ठेवायचा, याबाबत मलातरी शंकाच वाटते - कारण अशी संकेतस्थळे ढोबळमानाने असलेला इतिहास सोप्या पद्धतीने लिहून मोकळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही."

मला असे वाटते हे गॅझेट ब्रिटीश कालीन आहे की जे आजच्या संकेतस्थळावर ढोबळमानाने लिहीण्यार्‍या सरकारी अधिकार्‍यांच्या जन्माच्या आधीच प्रकाशित झालेले आहे.

http://books.google.com/books?id=_661AAAAIAAJ&q=raghoji&dq=raghoji&hl=en&ei=txrMTaXSJ8THrQec4fCIBA&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=4&ved=0CDIQ6AEwAw

http://books.google.com/books?id=tbQIAAAAQAAJ&q=Raghoji+Bhangria&dq=Raghoji+Bhangria&hl=en&ei=OXDOTaruB5DOrQeLzLjCCg&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=2&ved=0CC4Q6AEwAQ

Dr.sachin23 १२:११, १४ मे २०११ (UTC)

I will give u some references within 2 weeks when I will come back from my village.

[संपादन]

I will give u some references within 2 weeks when I will come back from my village.