Jump to content

चर्चा:रक्तगट

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रक्त गट या पानावरील मजकूर येथे हलवला.

अभय नातू १७:३९, २ सप्टेंबर २०११ (UTC)


मानवी रक्तामध्ये असलेल्या तांबड्या रक्तपेशीवरील असलेले विशिष्ठ प्रथिन याला प्रतिपिंड असेही म्हणतात. रक्तगटाचा शोध लॅंड्स्टेनर यानी लावला या शोधाबद्द्ल त्याना नोबेल पुरस्कार मिळाला. महत्वाचे रक्तगट दोंन आहेत. प्रथिन प्रकार ए, आणि प्रथिन प्रकार बी. यालाच ए रक्तगट आणि बी रक्तगट असे म्हणतात. तांबड्या पेशीवर कोणत्याही प्रकारचे प्रथिन नाही म्हणजे रक्तगट ओ. आणि ए, व बी या दोन्ही प्रकारचे प्रथिनआहे म्हणजे एबी रक्तगट. रक्त हे पेशी आणि रक्तरस म्हणजे प्लाझमा या द्र्वानी बनले आहे. रक्तपेशी ए गटातील असल्या म्हणजे रक्तरसामध्ये बी प्रकारच्या प्रथिनाविरुद्ध प्रतिद्रव्य असते. तसेच बी रक्तगट असल्यास ए प्रकारच्या पेशी विरुद्ध प्रतिद्रव्य रक्तरसामध्ये असते. ए बी रक्तगट असल्यास रक्तरसामध्ये प्रतिद्रव्य नाही. पण ओ गटाचे रक्त असल्यास रक्तरसामध्ये दोन्ही एआणि बी पेशी विरुद्ध प्रतिद्रव्य असते.

Start a discussion about रक्तगट

Start a discussion