चर्चा:मोनोरेल
इंग्रजीतील straddle या शब्दाचा अर्थ पाय फाकवुन बसणे असा आहे.त्याचा उद्भव saddle या शब्दापासुन झाला असे वाटते. घोड्याच्या खोगीरावर(saddle)वर आपण ज्या प्रकारे बसतो(बुड खोगीरावर ठेउन आणि दोन्ही कडे पाय टाकुन) त्या प्रमाणेच ही एकल-रेल काँक्रिटच्या तुळईवर, तुळईच्या दोन्ही बाजुस पाय ठेउन असल्यागत दिसते.(लेखातील चित्र कृपया बघा) वि. नरसीकर (चर्चा) १६:०२, २७ जानेवारी २०१० (UTC)
मोनोरेल या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द ...
[संपादन]मुख्य सदरावर, मध्यंतरी मोनोरेलसाठी एकल-रेल असा मराठी पर्यायी शब्द सुचविण्यात आला होता. पण पुढे, खालील करणांमुळे, तो न वापरण्याचे योग्य वाटले,
कारणे खालील प्रमाणे,
१. मुंबई-पुण्यात मोनोरेल झाल्यावर किती लोकं 'एकल-रेल' अथवा दुसरा पर्यायी शब्द वापरतील? २. मोनोरेल हे तंत्रज्ञान आपण विकसित केलेले नाही. जर तंत्रज्ञान जसेच्या तसे वापरतो तर त्यास संबोधण्यासाठीचा शब्द का वापरू नये? ३. मोनो साठी एकल तर मग रेल हा शब्द रूळ असा का वापरू नये? ४. मराठीभाषेत वापरले जाणारे परभाषेतील असे अनेक शब्दा आहेत. उदा. सिमेंट, तिकीट, इंजीन. इत्यादी. तसेचं भारतीय भाषांतील शब्दांनी परदेशी भाषांमधे शिरकाव केल्याची बरीचं उदाहरणे अहेत.
मोनोरेलसाठी कुठलाही पर्यायी शब्द विकसित करण्या आधी वरील मुद्द्यांचा जरूर विचार करण्यात यावा ही विनंती.