चर्चा:मिनेसोटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मिनिसोटा[संपादन]

इंग्रजी विकिपीडियावरील मिनिसोटाचा उच्चार पहा: Minnesota (/mɪnɨˈsoʊtə/). आता मिनेसोटा हा उच्चार कुठे मिळाला असेल याचा केवळ तर्कच करावा लागेल...J १२:५४, १६ जून २०११ (UTC)

मिनेसोटामध्ये वास्तव्य करणार्‍यांचे अनुभव.
शिवाय -
ɨ
http://www.merriam-webster.com/dictionary/minnesota मिनेसोटा
  • तुम्ही दिलेले forvo.com या संकेतस्थळावर अनेक उच्चार आहेत. कोणता ग्राह्य धरायचा हे आपल्या सोयीनुसार ठरवू नये.
अभय नातू १३:४१, १६ जून २०११ (UTC)

पुन्हा मिनिसोटा[संपादन]

(१) ɨ : कापलेला आय्‌ ही काहीजण इ तर काहीजण अ असा उच्चार करतात त्यासाठीची खूण.(पहा: IPA चे संकेतस्थळ)

(२) mih-nuh-SOE-tuh म्हणजे मिहनहसोएटह नाही. तर, ih=इ; uh=अ; आणि oe=ओ. ही स्पष्टीकरणे इनोगोलोवर जिथे मिनिसोटाचा उच्चार दिला आहे त्याच्याखाली Pronunciation key मध्ये दिली आहेत. म्हणजे इनोगोलोवरचा उच्चार मिनऽसोटऽ. मिनेसोटा नाही.

(३) मेरियम वेब्स्टरवर दिलेला उच्चार: \ˌmi-nə-ˈsō-tə\ म्हणजे परत, मिनऽसोऽटऽ.

(४) forvo,comवर जे १३ उच्चार दिले आहेत, ते जननेने सुचवलेले आहेत. त्या स्थळावर दिलेला अधिकृत उच्चार एकच आहे. ˌmɪnɪˈsəʊtə मिनिसाउटऽ.

तेव्हा तात्पर्य असे की, लेखाचा मथळा मिनेसोटा असा लिहिण्यास कुठलाही आधार नाही.....J ०८:००, १७ जून २०११ (UTC)

मेरियम वेब्स्टरवर दिलेला उच्चार: \ˌmi-nə-ˈsō-tə\ म्हणजे परत, मिनऽसोऽटऽ.
मिनऽसोऽटऽ याच उच्चार मोठ्याने करुन पहा. आधार आपोआप कळेल.
जनतेने सुचवलेल्या १३-१५ उच्चारांपैकी कोणता निवडावा? मिनेसोटाचे (आणि जवळपास सगळ्याच शब्दांचे) उच्चार मिनीयापोलिस, न्यू यॉर्क, बॉस्टन, बॅटन रूज आणि लॉस एंजेल्समध्ये वेगवेगळे होतात. कोणता प्रमाण मानायचा?
स्थानिक नावांची आपल्या सोयीनुसार किंवा अज्ञानानुसार मोडतोड करणे हे पुणेचे पूना आणि मुंबईचे बॉम्बे करण्यागतच आहे.
अभय नातू १५:०४, १७ जून २०११ (UTC)

शक्य आहे[संपादन]

मिनऽसोऽटऽ हा शब्द मोठ्याने उच्चारला तर तो मिने-सोटा असा ऐकू येईल. येईलही कदाचित, करून पाहिले पाहिजे.

इंग्रजी ज्या लॅटिन लिपीत लिहितात ती उच्चाराधिष्ठित नसल्याने, एक विशिष्ट स्पेलिंग असलेल्या शब्दाचे अनेक उच्चार होणे शक्य आहे. पण ज्या इंग्रजी पानाचे भाषांतर करून आपण मराठी विकीवर आणतो आहोत, त्या इंग्रजी पानावर दिलेला उच्चार तरी प्रमाण मानायला नको? स्थानिक लोकांचा उच्चार प्रमाण मानायचा असेल तर पुणं या नावाने पान उघडायला पाहिजे. कारण पुण्याचे लोक पुण्याला पुणे म्हणतच नाहीत. नाशिकचे गोदावरीला गंगा म्हणतात. अहमदनगरचे त्यांच्या गावाला नगर म्हणतात. ह्याही पानांचे मथळे बदलावे लागतील.

पूना ही पुणेची मोडतोड नसून पुणं चे अचूक स्पेलिंग आहे. इंग्रजीत ण नाही. शब्दाच्या शेवटी a लावल्याखेरीज शेवटी दीर्घ अकार असलेल्या शब्दाचे स्पेलिंग शक्य नाही. आणि a न लावल्यास हलन्त उच्चार होईल, तो नको आहे. शिवाय, Puneचा उच्चार प्यून आणि प्यूनच होणार. अशा परिस्थितीत पुणं चे Poona यापेक्षा दुसरे स्पेलिंग संभवतच नाही.

मुंबईचे बॉम्बे झाले नसून उलट प्रकार आहे. मुंबईच्या सात बेटांना वेगवेगळी नावे होती. बेटे एकमेकांना जोडल्यावर पोर्तुगीजांना त्या विशाल बेटाला बॉम्बे हे नाव ठेवले. त्यांतल्या एका बेटावर मुंबादेवीचे एक छोटे देऊळ होते(इंग्रजांनी ते हलवले आणि दुसर्‍या जागी मोठे करून बांधून दिले). त्या मुंबादेवीचा बॉम्बेशी काही संबंध नव्हता. कोळीलोक देवदर्शनासाठी किंवा यात्रेसाठी मुंबादेवीला किंवा मुंबाईला जातो असे म्हणत. त्यावरून त्या भागाचे नाव मुंबाई असावे असे लोकांना वाटू लागले. इंग्रजांनी मुंबईचे बॉम्बे केले हा शुद्ध गैरसमज आहे. ज्याप्रमाणे चेन्नै आणि मद्रास होती त्याप्रमाणे, मुंबई आणि बॉम्बे ही दोन्ही नावे एकाचवेळी वापरात होती....J १६:४७, १७ जून २०११ (UTC)