Jump to content

चर्चा:महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हल्लीच मी एका बेळगाववासीयाशी चर्चा केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बेळगाव शहरामध्ये कर्नाटकात विलिन होण्याच्या वेळेस सुमारे १५ ते १६ मराठी माध्यमाच्या शाळा होत्या व जेमतेम एक इंग्रजी माध्यमाची शाळा होती. ही माहीती कुठुनतरी पडताळुन पाहणे शक्य आहे काय? कारण ह्या माहीतीच्या आधारे बेळगाव शहरात कन्नड लोकसंख्या औषधालासुद्धा (?) नव्हती (अथवा सगळे निरक्षर होते) व त्यामुळे कर्नाटकात सामील करून बेळगाववासियांवर घोर अन्याय झाला हे अधिक समर्थपणे मांडता येईल.

Amit (अमित) 14:13, 18 ऑक्टोबर 2006 (UTC)

बेळगांवात मराठी शाळा कन्नड पेक्षा अधिक आहेत हे सिध्द करता येईल. कृपया याच लेखातील 'अधिक माहिती' मधील तरुण भारतचे स्रोत पहा. महाराष्ट्र एक्सप्रेस 18:55, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)