चर्चा:महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न
Appearance
Untitled
[संपादन]हल्लीच मी एका बेळगाववासीयाशी चर्चा केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बेळगाव शहरामध्ये कर्नाटकात विलिन होण्याच्या वेळेस सुमारे १५ ते १६ मराठी माध्यमाच्या शाळा होत्या व जेमतेम एक इंग्रजी माध्यमाची शाळा होती. ही माहीती कुठुनतरी पडताळुन पाहणे शक्य आहे काय? कारण ह्या माहीतीच्या आधारे बेळगाव शहरात कन्नड लोकसंख्या औषधालासुद्धा (?) नव्हती (अथवा सगळे निरक्षर होते) व त्यामुळे कर्नाटकात सामील करून बेळगाववासियांवर घोर अन्याय झाला हे अधिक समर्थपणे मांडता येईल.
Amit (अमित) 14:13, 18 ऑक्टोबर 2006 (UTC)
बेळगांवात मराठी शाळा कन्नड पेक्षा अधिक आहेत हे सिध्द करता येईल. कृपया याच लेखातील 'अधिक माहिती' मधील तरुण भारतचे स्रोत पहा. महाराष्ट्र एक्सप्रेस 18:55, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)