Jump to content

चर्चा:मराठी लेखन मार्गदर्शिका (पुस्तक)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चर्चा

[संपादन]

मराठी लेखन मार्गदर्शिका ही शासन पुरस्कृत आहे. महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी या पुस्तिकेची निर्मिती केली आहे राज्य मराठी विकास संस्थे मार्फत याची निर्मिती केली आहे.. या पुस्तकामुळे प्रमाणित भाषा वापरास मदत होईल. म्हणून त्यास वेगळे पान द्यावे असे मला वाटते. मजकूर जाहिरात सदृष आहे ही बाब मला मान्य आहे परंतु पुस्तकाची माहिती कशी द्यावी या विषयी मलाही नक्की समजत नाहीये. परंतु हे मराठी भाषा प्रमाणित करण्यासाठी वापरात असलेले शासन पुरस्कृत महत्त्वाचे पुस्तक आहे, म्हणून हे पान राहू द्यावे ही विनंती.

त्याच प्रमाणे यास मराठी साहित्य नामसूची वर्गीकरणाप्रमाणेच करण्याचाही प्रयत्न करतो. जसे https://secure.wikimedia.org/wikipedia/mr/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95 येथे आहे.

या लेखात पुस्तकाबद्दलची माहिती असल्याने हा लेख काढू नये.
अभय नातू २२:२०, ३० जानेवारी २०११ (UTC)
धन्यवाद अभय! 'पानकाढा' हा साचा काढत आहे. - निनाद