Jump to content

चर्चा:मद्र

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मद्र देश म्हणजे विंध्याच्या दक्षिणेकडचा एक प्रदेश असे मी वाचल्याचे आठवत आहे (संदर्भ आठवत नाही.) मद्र म्हणजे पंजाबच्या आसपासचा प्रदेश याचा संदर्भ आपण देऊ शकाल का?

अभय नातू १५:४४, २३ मे २००७ (UTC)

हा नकाशा पहा[संपादन]

प्राचीन भारताचा हा नकाशा पहा.

[१]

यात तसेच महाजालावरही इतर अनेक वाचनांत हा उल्लेख सापडेल. (माझा सोर्स तरी तोच आहे.)

priyambhashini १५:५०, २३ मे २००७ (UTC)

धन्यवाद.
अभय नातू १५:५७, २३ मे २००७ (UTC)

ऐतिहासिक की प्राचीन[संपादन]

मद्र देशाचा लिखित इतिहास उपलब्ध नसावा असे वाटते. तसे असल्यास हा लेख प्राचीन राज्ये या वर्गात हलवावा (जसे बायझेंटाईन, इ.)

अभय नातू १५:२५, २४ मे २००७ (UTC)

ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. खरेतर भारतात ज्याला ऐतिहासिक म्हणावे असे पुरावे सम्राट अशोकापासून सुरु होतात.(चू.भू.दे.घे.), तेव्हा मद्रदेशाला प्राचीन राज्य म्हणणे योग्य ठरेल. priyambhashini १८:३५, २४ मे २००७ (UTC)

मद्र देशाचा उल्लेख लिखित स्वरूपात पौराणिक, उत्तरवैदिक साहित्यात आढळतात. हे साहित्य पूर्णतः काल्पनिक धरता येत नाही. त्यातील भौगोलिक वर्णने बर्‍याच अंशी वास्तविक आहेत; आणि हे साहित्य लिखित स्वरूपातही आहे. त्यामुळे 'इतिहास' या अभ्यासविषयाच्या रूढ लक्षणांमध्ये त्याला वास्तविक गणताही येऊ शकेल.. फक्त उपलब्ध माहिती तोकड्या प्रमाणात असल्याने आणि ही गोष्ट बर्‍याच शतकांपूर्वीची असल्याने त्याला ढोबळपणे 'प्राचीन' व्याख्येत मोडता येईल.
त्यामुळे मी हा लेख 'भारतातील प्राचीन राज्ये' नामक वर्गात हलवेन, पण 'भारतातील ऐतिहासिक राज्ये' हा वर्ग राहू द्यावा असे वाटते. कारण 'बुंदेलखंड' हे राज्य या वर्गात मोडू शकते. 'विजयनगर', 'देवगिरीचे साम्राज्य' इत्यादी मध्ययुगीन राज्यांवरचे लेख या वर्गात सामावू शकतील. तसेच 'बायझेंटाईन साम्राज्य' वगैरे मध्ययुगीन काळापर्यंत अस्तित्वात असलेल्या आणि लिखित इतिहास विस्तृत प्रमाणात उपलब्ध असलेल्या साम्राज्यांबद्दल 'प्राचीन राज्ये' वर्गापेक्षा 'ऐतिहासिक राज्ये' असा वर्ग जास्त योग्य वाटेल. कदाचित सर्वच पातळ्यांवर 'ऐतिहासिक राज्ये(/भारतातील ऐतिहासिक राज्ये)' स्वरूपातील वर्ग 'प्राचीन राज्ये(/भारतातील प्राचीन राज्ये)' स्वरूपाच्या वर्गांचे पालकवर्ग म्हणून ठेवता येतील.
--संकल्प द्रविड १०:०३, २५ मे २००७ (UTC)

बुंदेलखंड, विजयनगर, देवगिरी इ. भारतातील ऐतिहासिक राज्ये म्हणूनच यावीत तर मगध, कलिंग अशी राज्ये प्राचीन आणि ऐतिहासिक म्हणून ठेवता येतील. मद्रदेश ऐतिहासिक दृष्ट्या चुकीचे असे नाही परंतु ठोस पुरावे मिळाल्याखेरीज असे घालू नये असे वाटले.

priyambhashini १३:०१, २५ मे २००७ (UTC)