चर्चा:भारिप बहुजन महासंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारतीय रिपब्लिकन पक्षाची बदनामी[संपादन]

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात भारतीय रिपब्लिकन पक्षाची कायम बदनामी करण्यात येत आहे. वरील यादी व वर्रील चर्चा मजकुरातून त्याचा प्रत्यय येतो. वर म्हटले आहे कि दररोज ‘रिपब्लिकन’ हा शब्द असलेला एक राजकीय पक्ष (गट) स्थापन होतो आणि पुढे तो फुटतो, याचा अर्थ ५० वर्षात ३६५*५० =१८२५० पेक्षा अधिक ????? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गट स्थापन झाले आहेत पण इतके नव्हे जितके सागितले जातात. उद्या महाराष्ट्रातील एखाद्या तालुक्यात काँग्रेस शब्द असलेल्या पक्षाची स्थापना झाल्यास तो काँग्रेस चा गट असेल काय ??? बर कॉंग्रेस पक्षापासून अलग होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाली तर तो मूळ कॉंग्रेस चा गट असेल कि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा गट असेल ??? याच प्रकारे भाजपाचा उदय ज्या मूळ पक्षापासून झाला. तर भाजप हा गट पक्ष धरता येईल काय ? तसेच युनायटेड रिपब्लिकन फ्रंट (गंगाराम इंदिसे) यांनी ठाण्याला स्थापन केला मुळात हा गटाचा उप उप गट होता परंतु त्याचा संबंध मूळ भारतीय रिपब्लिकन पक्षाचा गट म्हणून उल्लेख करणे व वरील यादीत त्याचा उल्लेख करणे म्हणजे मूळ भारतीय रिपब्लिकन पक्षाची बदनामी करणे होय. वरील यादीत हरियाणा रिपब्‍लिकन पार्टी चा समावेश होता. तसेच यादीतील सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी कार्ल मार्क्स, फुले आणि आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानांवर आधारित पक्ष - स्थापनकर्ते कॉम्रेड शरद पाटील याचा मूळ रिपब्लिकन चा गट कसा होईल ??? यामुळे बदनामी हेतूला आणखीच पुष्टी मिळते. यावरून अमेरिकेतील रिपब्लिकन पक्ष हा भारतातील रिपब्लिकनचा गट आहे असा विनोद फिरवण्या सारखे आहे. म्हणूनच पुरेशी उल्लेखनीयता व संस्थापक त्याचा आधीचा गट स्थापन दिनांक राजकीय कार्य पार्श्वभूमी लक्षात घेऊन यादित्त पक्ष टाकावेत. केवळ यादी वाढवणे नव्हे. म्हणून वरील संपूर्ण यादी मूळ लेखात टाकण्याला माझा विरोध आहे. तसेच उल्लेखनीयता नसलेले व पुरेसे कार्य वा संदर्भ नसलेले रिपब्लिकन पक्षाचे रिकामे लेख तयार केले जाऊ नयेत. उदा. भारतीय रिपब्लिकन पक्ष (कांबळे) अथवा वगळावेत. आणि लेखात वस्तुनिष्ठ भर घालून लेख विस्तारास मदत करावी परंतु बदनामी थांबवावी ही विनंती. प्रसाद साळवे (चर्चा) ०९:२४, २५ मार्च २०१८ (IST)

यादी पहा... चर्चा:भारतीय रिपब्लिकन पक्ष