Jump to content

चर्चा:बिंदुसरा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बिंदुसरा नदी बालाघाट डोंगर रांगात वसलेली गोदावरीची उपनदी म्हणजे आजच्या दुष्काळी पट्टयातून वाहणारी बिंदुसरा नदी. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील वाघिरगावी या नदीचा उगम होतो. बालाघाट डोंगर रांगांच्या प्रभावमाळू बीड जिल्ह्याला एक नैसर्गिक वरदान लाभले आहे, ज्यामुळे येथील जलभिजान उत्तर -दक्षिणेच्या स्वरूपात झाले आहे. उत्तरेला गोदावरी अन दक्षिणेला मांजरा या नद्यांच्या प्रदेशात आपलाही बिंदु ठसवणारी बिंदुसरा नदी बीड शहराच्या उत्पत्तीला कारणीभूत आहे.

खळग्यासारखी किंवा बिळासारखी वाहणारी नदी म्हणून या नदीच्या काठीचे नाव बीळ- जे पुढे बीड म्हणून प्रसिद्ध झाले. असा काही संशोधकांचा दावा आहे. पाणी या मराठी शब्दाला फार्सी मध्ये "मीर" असे म्हणतात. ज्याचा अर्थ भुर्गभात खणले कि जीथे पाणी लागते असे ( हे मी पुर्वीचे सांगत आहे बरं का !) असा बीड शहराचा नावलौकीक होता.

रामायण काळात जटायु बरोबर झालेले रावणाचे युद्ध याच नदीकाठी झाले, ज्याला पुढे प्रुभ रामचंद्रांनी आपल्या हताने याच नदीकाठी तिलांजली दिली. म्हणून आजही पेठ बीड भागात जटायु मंदिर दाखवले जाते. यादवकालीन चंपावतीनगर म्हणजे बीड ज्याच्या सौंदर्यात यादवांनी या नदी काठी २००मी. अंतरावर ता-याच्या आकाराचे , चहु बाजूंनी पाण्याने वेढलेले कंकाळेश्वर मंदीर बांधले.

पुढे यादवांकडून मुहम्मदबीन तुघलकाने इ.स. १६२६ साली चंपावतनगर जिंकत त्याचे नामकरण बीड केले व त्याच तुघलकाच्या आमदानीत त्याच्या जुना खाना या सुभेदाराने बिंदुसरा या दक्षिण-उत्तर वाहणा-या नदीचा प्रवाह पुर्व-पश्चीमी करत नदीचे विभाजन केले.

बिंदुसरा नदी उगमापासून ४० किमी. वहात बीड च्या उत्तरेला सिंधान किंवा सिंधफणी या नदीला जाऊन मिळते ज्या पुढे गोदावरी नदीच्या उपनद्या म्हणून तिच्यामध्ये जाऊन मिसळतात.

बिंदुसरा नदीवर १९५५ साली बिंदुसरा या लघु प्रकल्पाची निर्मिती केली गेली ज्याची क्षमता ७.१०६ मिलीयन क्युबिक मी. येवढी आहे. जे कि अख्ख्या बीड, आष्टी-पाटोदा तालुक्याची तहान भागवते.

धोंडाजी किसान या धनिकाने या नदीचे महत्त्व ओळखत या नदीकाठी सराफा बाजार वसविला जो आज १०० वर्षांनंतरही धोंडीपुरा नावाने ओळखला जातो. भारतातील असा एकमेव सराफा बाजार असेल जो नदीच्या काठी वसलेला आहे.

या नदीवर अगदी अत्ता-अत्तापर्यंत म्हणजे २३ जुलै १९८९ पर्यंत आलेले पुर इथल्या अनेक लोकांना चांगले आठवतात. ज्यामध्ये ओघळाच्या रूपात वाहणा-या बिंदुसरेन केलेलं , लाखोंचं नुकसानही लोक आज सांगतात.

जलयुक्त शिवार योजनेन या नदीचे पुर्नजन्म झाला. व गेल्या व अगदी परवा पडलेल्या अवकाळी पावसानेही या नदीला दुथडी भरून पाणी आल्याचे आपण पाहिले असेल.

गणितज्ञ भास्कराचार्य यांनाही या नदीकाठचा मोह सुटला नाही, म्हणूनच कि काय त्यांनी आपला अखेरचा श्वासही या नदीपात्रातच सोडला. ज्ञानेश्वर महाराज -मुक्ताबाई आदी चार भावांडांच्या वडिलांचे वडील म्हणजे गोविंदपंत कुलकर्णी यांची समाधी या बिंदुसरा नदीच्या काठावर आहे. ज्याचे दर्शन दरवर्षी मुक्ताबाईंची पंढरपूरला जाणारी पालखी करते व या बिंदुसरेत आपल्या आजोबांची आठवण काढत एक डुबकी मारते.

अशा वारकरी संप्रदायाला परम वंदनीय असणा-या बिंदुसरेवर आज भक्ती संप्रदाया बरोबरच कष्टकरी ऊसतोड कामगारांचा संप्रदाय गुण्यागोविंदाने नांदतो आहे. हेच या बिंदुसरेला आजच्या काळातील सुखावणारे चित्र म्हणावे लागेल...!!!

चैतन्य बारसावडे..!

Start a discussion about बिंदुसरा

Start a discussion