चर्चा:प्रेम चौधरी
कृपया या लेखाची स्थिती बघावी. व्याकरणावरून बहुधा मशिन अनुवादीत वाटतो आहे. तुम्ही स्त्री अभ्यास केंद्रातून आहात म्हणून संदर्भ शोधून सुधारणा करू शकाल म्हणून आशा आहे. स्त्री अभ्यास केंद्राच बॅकग्राऊंड काही सेकंदांसाठी बाजूला ठेऊन पण सर्वसाधारण इतर अनुभवी संपादक म्हणून किंवा माझ्या भूमिकेतून पहा. लेख सुधारण्यासाठी अधिक माहिती तर पाहिजे पण ती कशी शोधायची असा प्रश्न पडतो. मी स्वत: गूगल घेऊन शोधायचे म्हटले तर याच नावाच्या अनेक व्यक्ती मधून हि व्यक्ती वेगळी कशी ओळखायची हा प्रश्नही शिल्लक राह्तोच.
व्हि गीता आणि या लेखांस प्रश्न बहुधा उल्लेखनीयतेचाही येणार नाही पण एका ज्ञानकोशीय लेखास लागणाऱ्या किमान व्यक्ती विषयक माहितीचा अभाव जाणवत राहतो. हे कमी माहितीचे लेख पुरेशी माहिती उपलब्ध होई पर्यंत समकालीन स्त्री अभ्यासक अथवा समकालीन लिंगभाव अभ्यासक अशा एकाच लेखात एकत्रीत का करू नयेत असा प्रश्न पडतो आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:१३, २० सप्टेंबर २०१४ (IST)
@Mahitgar नक्कीच आपल्याला सध्या सर्व स्त्रीवादी लेखीकांची माहिती एकत्र करता येत असेल तर हरकत नाही.
[संपादन]सध्या नक्कीच आपल्याला सगळ्या स्त्रीवादी लेखीकांची माहिती एकत्र एकाच पानावर घेता येऊ शकते आणि जसजसे ते विकसित केले जातील तसतसे ते पुढे वेगळे मांडता येतील.
दुसरा मुद्दा व्यक्ति शोधण्याचा, स्त्रीवादी भुमिकेतून लिहिणारी व्यक्ति असल्याने, व संदर्भातच काम केल्याने तसे शोधणे कठीण नाहिये. परंतू आपला प्रश्न रास्त आहे...
त्या लेखाची लेखीका, खुपच नवीन असल्याने, त्या धुमारीमध्ये नव्याने भाषांतरही पहिल्यांदाच करुन तिने तिथे टाकले आहे.
असो हरकत नाही, तीलाच मी तो लेख सुधारावयास सांगिन,
आपण इतर स्त्रीवादी लेखीकांच्या पानांचे सध्या एकत्रीकरण करावयास हरकत नाही. आणि इथल्या इतर लेखकांनी लिहीलेल्या संकल्पनात्मक लिखाणाचेही स्त्रीवादी सिध्दांकन ह्या मथळ्याखाली ह्याच धर्तीवर एकाच पानात एकत्रीकरण करता येईल असे मला वाटते.