चर्चा:प्रभाकर चिंतामण शेजवलकर
शेजवलकरांचे ’यशोगाथा’ हे पुस्तक पुणे विद्यापीठाने वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षासाठी लावले. नाशिक येथील यशवंत प्रकाशन संस्थेने ते प्रकाशित केले होते. विविध क्षेत्रांतील बारा व्यक्तींचा परिचय त्या पुस्तकात देण्यात आला आहे. तो देताना मराठी भाषा आणि व्याकरणाची मात्र ’वाट' लावण्यात आली होती.. या यशोगाथा निर्माण करणाऱ्या व्यक्तींनीच पुस्तकातील चुका लक्षात आणून दिल्याने डॉ. शेजवलकर यांना पुस्तकाची सुधारित आवृत्ती देण्याची तयारी दर्शवावी लागली.
डॉ. श्रीराम लागू यांच्याविषयी माहिती देताना पुस्तकात गंभीर चुका झाल्या आहेत (कंसात चुकीचा शब्द). "...त्यांनी (औपचारिकदृष्ट्या) "एमबीबीएस'चा अभ्यास पूर्ण करून डॉक्टरी पेशाला सुरवात केली.' "इथे ओशाळला मृत्यू या कानेटकर यांच्या नाटकात त्यांनी प्रथमत: (भाग) घेतला.' डॉ. भटकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा परिचय देताना, "लहानपणापासून त्यांना वाचनाची आवड होती. त्यांची आईसुद्धा (स्वयंपाक करत असताना) पुस्तके वाचायची. त्यांनी पीएचडी करत असताना (आयआयटीमध्ये ७0 हजार पुस्तके) वाचून काढली,' असे म्हटले आहे.
शिक्षणतज्ज्ञ राम ताकवले यांच्याबद्दल लेखक म्हणतात, "त्यांनी (खेड्यातच सर्व शिक्षण घेतले) आणि (उच्च शिक्षणाकरिता ते पुणे विद्यापीठात आले).' "केवळ पंचेचाळिसाव्या वर्षी (म्हणजे १९७८ साली) ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले.' गंभीर चुका असलेली, पण विनोद निर्माण करणारी असंख्य वाक्ये या पुस्तकात आहेत. याव्यतिरिक्त मुद्रितशोधनाच्या चुका वेगळ्याच. या चुकांसह पुस्तके सर्व महाविद्यालये आणि पुस्तक विक्रेत्यांना वितरित करण्यात आली आहेत.
त्या पुस्तकामध्ये लता मंगेशकर यांच्या व्यक्तिरेखेविषयी सांगताना पान क्रमांक १६ वर एक गंभीर चूक झाली आहे. या पानावर असा उल्लेख आहे, की, १९९३ मध्ये ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गाणे त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले. हे गाणे ऐकताना पंडित नेहरूंच्या डोळ्य़ातून खरोखर अश्रुधारा वाहू लागल्या. या गाण्याचे दिग्दर्शन सी. रामचंद्र यांनी केले होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन २७ मे १९६४ रोजी झाले, त्यामुळे ते १९९३ मध्ये तिथे उपस्थित असणे शक्यच नव्हते, असे असतानाही हा उल्लेख या पुस्तकात आला आहे. ....J (चर्चा) २३:००, ७ मार्च २०१४ (IST)
- आपले नित्या प्रमाणे मराठी विकिपीडियावर अमुल्य योगदान चालू आहे या बद्दल धन्यवाद. अर्थात छोटे पण महत्वाचे बदल सूचवतो. दोन्ही मुद्दे पूर्ण वाचून घ्यावेत अशी विनंती आहे
- १) लेखकाच्या ग्रंथा पुढे कंसात (चर्चा पान पहावे) अस लिहायच आणि चर्चा पानावर विकिपीडिया संपादकाने स्वत: टिका करायची हे (आपली टिका कितीही सुयोग्य असली तरीही) विकिपीडिया संकेतास अनुसरून नाही, (अशाने कुणीपण येईल जाहीरात करावयाच्या अथवा / न पटलेल्या ग्रंथा पुढे (चर्चा पान पहावे) असे लिहिल आणि चर्चा पानावर येथेच्छ जाहीरात अथवा झोडपून घेईल). आपली व्यक्तीगत मते विकिपीडिया बाह्य स्रोतात आधी मांडली जावयास हवीत आणि नंतर तिथून संदर्भासहीत विकिपीडियात यावयास हवीत. (हे इतरही सदस्यांना संकेत क्लिअर असावा म्हणून लिहिले; कारण सध्या आपण व्यक्तीगत मत मांडता आहात असा आभास होतो आहे; खरेतर हि आपली व्यक्तीगत मते नाहीत, आपण हि माहिती वृत्तपत्रीय बातमी वरून संदर्भ न देता घेतली असण्याची मला शक्यता जाणवते आहे) या मुद्द्यापुरते एकुण ग्रंथ नावा पुढचे (चर्चा पान पहावे) हे कंसातील वाक्य काढून घेतले जावयास हवे.
- २) आपण वर लिहिलेल्या टिकेला वृत्तपत्रीय बातम्यांचा आधार आणि संदर्भ उपलब्ध आहे तेव्हा ती टिका, टिका विभाग वेगळा बनवून सरळ लेखात घ्यावी व संबंधीत वृत्तपत्रीय संदर्भ नमुद करावा अशी नम्र विनंती आहे.
- आपणास आपणास उपरोक्त मुद्द्यांबद्दल काही शंका असल्यास कळवावे. आपल्या आवडीचे वाचन लेखन घडत राहो ही शुभेच्छा. आणि धन्यवाद
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ००:२८, ८ मार्च २०१४ (IST)