चर्चा:नाशिकमधील नाट्यगृहे आणि चित्रपट गृहे
लेख वगळावा
[संपादन]ही सूची नाशिक या लेखातून हलवून स्वतंत्र लेख बनवण्याचे प्रयोजन विवाद्य वाटते. अश्याने 'पुणे परिसरातील नाट्यगृहे', 'पुणे परिसरातील चित्रपटगृहे', 'पिंपरी-चिंचवड परिसरातील नाट्यगृहे', 'पिंपरी-चिंचवड परिसरातील चित्रपटगृहे', 'इंदापूर परिसरातील हंगामी व कायमस्वरूपी चित्रपटगृहे' (महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्याच्या गावागणीक एक आणि मुंबई वगैरेंसारख्या शहराबाबत तर प्रत्येक उपनगरागणीक बनवायचा पायंडा पडेल.) असे लेखही बनायचे पायंडे पडतील. कृपया या लेखातील माहिती नाशिक या मुख्य लेखात संक्षेपाने लिहावी. ऐतिहासिक/सांस्कृतिक संदर्भात महत्त्वाच्या असलेल्या आणि त्यामुळे बर्यापैकी विश्वकोशीय उल्लेखनीयता सापडण्याजोग्या मोजक्या नाट्यगॄहांबद्दल/चित्रपटगॄहांबद्दल माहिती नोंदवायची असल्यास या लेखाचा पुनर्विचार करण्यात हशील वाटते. कारण काही वर्षांमध्ये नवीन ठिकाणांची या सूचीत भर टाकण्याचे व "कै." झालेली केंद्रे उडवण्याचे तुलनेने कमी महत्त्वाचे काम करण्याचे कष्ट कायम घेतले जायची व त्यायोगे पान कायम अद्ययावत राहायची शक्यता फार कमी! ही माहिती शिळी झाल्यावर, आधीच फारश्या महत्त्वाचा नसलेल्या माहितीवर एवढे का झिजावे, हा प्रश्न मनात उमटल्यास नवल वाटू नये.
तस्मात, आताच अश्या जंत्रीपर लेखांच्या निर्मितीआधी साधक-बाधक विचार करावा.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:३५, १७ सप्टेंबर २०११ (UTC)
- मी यासाठी इंग्रजी विपी चा आधार घेतला आहे. तेथे अशाच प्रकारचे लेख आणि उपलेख आहेत. हे पाहूनच मी उपलेख सुचवले. जर सगळ्यांनाच ते मान्य नसेल तर माझे काही म्हणणे नाही. अभय आणि माहितगार यांचे यावर असेच मत आहे का?.....मंदार कुलकर्णी १७:५४, १७ सप्टेंबर २०११ (UTC)
- जर अशा उपलेखांत भरीव माहिती असेल तर ते तयार करण्यास हरकत नाही. नाशिकमधील नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे या लेखात प्रत्येक नाट्यगृह आणि चित्रपटगृहाबद्दल चार-पाच ओळींची (तरी) माहिती असेल तर हे पान तयार करावे.
- जर अशा पानात नुसती जंत्री असणार असेल तर ही माहिती मूळ लेखातच असू द्यावी.
- जर अशा पानात चार-दोनच चित्रपटगृहांचा समावेश होत असेल तर असा लेख वेगळा करू नये.
- हाच निकष इतरही लेखांत लावावा, उदा. पुण्यातील रस्ते, पुण्यातील मानाचे गणपती, इ.
- अभय नातू १८:०४, १७ सप्टेंबर २०११ (UTC)
- अभय, माझेही असेच मत आहे. फक्त आधी यादी बनवायची आणि त्यात भर घालायची का आधी माहिती लिहून मग यादी सकट विपी मध्ये टाकायची हाच काय तो प्रश्न आहे. माझ्या असे निदर्शनात आले आहे की आधी यादी किंवा विषय सुरु केला तर इतर सदस्यांना त्यात चार चार (किमान) ओळींची भर घालणे सोपे जाते. त्यामुळे याद्या नकोतच का हट्ट किती योग्य आहे? इंग्रजी विपी वर अशी शेकडो उदाहरणे आहेत पण मराठी विपी चे नियम आपण वेगळे करायचे आहेत का? दुसरा मुद्दा-- मुख्य विषयाच्या लेखाची लांबी फारच वाढत चालली आहे (उदा. मुंबई, पुणे, नाशिक इत्यादी) म्हणून मी काही उपलेख बनवायचा प्रयत्न करत आहे. पण लगेच त्यावर विरोधाची भाषा कशासाठी? आपल्याकडे नवीन विषय शोधून त्यावर निश्चित स्वरूपात भर घालण्या पेक्षा विषय किंवा टायटल सुरु करून त्यात भर घालणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यातील रस्ते (http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%८७). हा लेख सुरु केला तेव्हा फक्त यादी होती. आज जर हा लेख पाहिला तर त्याला बऱ्यापैकी चानले स्वरूप येत आहे. "गब्बरसिंग" किंवा "चिऊ चिऊ" सारखे अनावश्यक लेख सुरु करून त्यात अकारण भर अगर दुरुस्त्या करण्यापेक्षा अशा याद्या किंवा विभाग सुरु करून त्यात सर्वांनी खारीचा वाटा उचलून भर घालणे योग्य आहे असे मला वाटते.... --मंदार कुलकर्णी (चर्चा | योगदान)मंदार कुलकर्णी ०५:५४, १८ सप्टेंबर २०११ (UTC)