चर्चा:नागपूर
नागपूरसह विदर्भावर महाराष्ट्र शासनाचे दुर्लक्ष
[संपादन]अभय यांनी लेखातील ही ओळ काढली आहे पण हा POV कसा काय? हे सत्य नसावं अशी माझीही इच्छा आहे पण ही तर वस्तुस्थिती नव्हे काय? मुंबई-पुणयाचं कोडकौतुक करण्यात व विदर्भाकडे डोळेझाक केल्यामुळेच तर वेगळ्या विदर्भाची मागणी होत आहे. लेखातील ती ओळ इंग्रजीतून घेतली आहे.विदर्भातील कोणी या वर प्रकाश टाकेल काय?→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १६:३८, १३ मे २००७ (UTC)
- पण हा POV कसा काय
- ज्या वाक्याला संदर्भ नाही व ज्या वाक्याबद्दल दुमत असू शकते ते वाक्य POV.
- पुणे/मुंबईबद्दल असे लिहीले असेल (विशेषतः नकारात्मक) तर तेही POVच.
- अभय नातू २२:४४, १३ मे २००७ (UTC)
वेगळ्या विदर्भाची मागणी होत आहे ही वस्तुस्थिती आहे तसेच अनुशेष-प्रश्न आहेतच. नागपूरातील ग्रामीण भागात सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष आहे हे स्वच्छ आहे तसे संदर्भ देखील उपलब्ध होतील.पण नागपूरकरांव्र अन्याय होत असल्याचे वाचलेले नाही व तसा संदर्भ ही उपलब्ध नाही.त्यामुळे हे वाक्य न टाकणेच इष्ट होईल.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १४:००, १४ मे २००७ (UTC)
नकाशा
[संपादन]नागपूर शहराचे स्थान दाखवणारया नकाशात काश्मिर आणि अरुणाचल प्रदेश ही राज्ये वेगळ्या रंगात आहेत. हा नकाशा बदलावा असे मला वाटते
- हा नकाश मराठी विकिपीडीयावर बहुतांश ठिकाणी वापरलेला आहे व यावरुन अनेकवेळा चर्चा झालेली आहे. तो मजकूर चावडीवरील जुन्या चर्चांमध्ये सापडेल.
- माझ्या आठवणीतील चर्चेचा सारांश असा - इंग्लिश विकिपीडियात हा नकाशा प्रमाण मानला आहे. जम्मू-काश्मीर व अरुणाचल प्रदेश हे दोन्ही प्रदेश वादग्रस्त आहेत व त्यातील मोठ्या भागात परकीय राष्ट्रांनी ठाण मांडलेले आहे ही वस्तुस्थिती आहे. प्रस्तुत नकाशा ही राज्ये पाकिस्तान किंवा चीनचा भाग असल्याचे दाखवत नाही, किंबहुना या परिस्थितीची (कटू) आठवण करून देतो. तरी हा नकाशा वापरावा.
- इतर (विशेषतः जुन्या) सदस्यांना विनंती - पुन्हा हा वाद येथे उकरुन काढू नये. जुन्या चर्चेत न मांडलेले मुद्दे असल्यास चावडीवर लिहावे.
- अभय नातू २२:१२, २९ मे २००७ (UTC)
संपादन नाही करता येत
[संपादन]नागपूर पानाच संपादन का नाही करता येत?
होना, पुण्याचं पान संपादित करता येत नाही, नागपूरचं पान संपादित करता येत नाही. नोंदणीकृत वापरकर्त्यांनाही हे जमत नाही. हा काय प्रकार आहे? मराठी विकीपिडीयावर मुठभरांचा एकाधिकार आहे काय ? मनोज २३:४८, २९ जून २००८ (UTC)
- नागपूर, पुणे, इ. लेखांत फक्त नोंदणीकृत सदस्यांना बदल करता येतात. तुम्हाला बदल करता न येण्याचे कारण वेगळे असणार.
- अभय नातू ०३:०४, ३० जून २००८ (UTC)
i have put the links of Govt.'s website(collector nagpur) on this page. can it be put? pl check and helpIt is requested to align this page properly and fix in wikipedia's format as i am not acquainted with the net/commands required for the same. Kindly help.
bhatkya १०:४१, २८ जुलै २००९ (UTC)