चर्चा:दिशा पिंकी शेख
Appearance
- आपल्या सवयीप्रमाणे आपण उत्पात करणे सोडलेले नाही, आता विभिन्नलिंगी असला काही शब्दच मुळात अस्तित्त्वात नाही. तो तुम्ही येथे जोडला.
- त्या दलित कार्यकर्त्या आहेत, म्हणजे दलित चळवळीच्या आहेत आपण स्वत: संदर्भ तपासावेत ते मी दिलेले आहेत.
- शिवाय आपण नसती लूडबूड थांबवून इतरांना काम करू द्यावे ही अपेक्षा. ज्या विषयातलं आपल्याला कळत नाही त्यात पडू नका हा फुक्कटचा सल्ला. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] ०१:०७, १४ मार्च २०१९ (IST)
- @QueerEcofeminist:
- लेखात सुधार करण्याला तुमच्या सारखा व्यक्तीच उत्पात म्हणू शकेल, आणि यात आश्चर्य वाटत नाही.
- विभिन्नलिंगी हा शब्द मी मनाने नाही तयार केला, आणि तो संदर्भातच आहे - तपासा. आणि तुम्ही जर हा तुम्हाला शब्द रूचला नसेल पर्यायी शब्द वापरा ना.
- त्या दलित कार्यकर्त्या असल्याचा संदर्भ मला लेखात सापडलेला नाही, तुम्हालाच संदर्भ तपासपण्याची गरज आहे.
- आणि लुडबुड... लेख तुम्ही लिहिला म्हणजे तो तुमच्या मालकीचा झाला नाही हे लक्षात ठेवा. इतर सर्वच जण यावर संपादने करू शकतात.
- तुमचा फुकटचा सल्ला मी तुम्हालाच सुपूर्ण करतो, कारण त्याची गरज तुम्हालाच आहे. कुणाला कोणत्या विषयात किती ज्ञान आहे हे मी चांगलेच जाणतो. म्हणून उचलली जीभ अन् लावली टाळाला असला प्रकार करू नये, आपलीच फसगत होते.
- स्वतःला विकिपीडियाचा मालक समजणे बंद करा. अगदी सर्वच गोष्टी स्वतःच्या मताप्रमाणे व्हाव्यात असला हट्ट सोडा.
- --संदेश हिवाळेचर्चा ०१:३९, १४ मार्च २०१९ (IST)
- # विभिन्नलिंगी शब्द जरी बातम्यात असला तरी तसली काही लिंगभाव अस्मिता अस्तित्त्वात नसते. आपल्याला यातला फरक नक्कीच माहित नाही.
- # दलित हा शब्द मी आणि दिशा विचारप्रणालीशी जोडून वापरतो तुमच्यासारखा जातीय संदर्भात नाही. अनेक संदर्भात हा उल्लेख आलेला आहे. तो तुम्हाला दिसत नाही त्याला मी जबाबदार नाही.
मी माझ्या मनाने सगळ्या बाबी अपेक्षित धरत नसून , काही नियम आहेत, शास्त्र आहे, आपली पोहोच नसेल तर अभ्यास करावा वाचन वाढवावे परस्पर उचलून शब्द भरु नयेत. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] ०१:४६, १४ मार्च २०१९ (IST)
सदर लेख इंग्रजी भाषेत उपलब्ध नाही.
[संपादन]सदर लेख इंग्रजी भाषेत उपलब्ध नाही. त्यासाठी कोणी सहकार्य करू शकेल का ?