चर्चा:तिरुवनंतपुरम जिल्हा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी शुद्धलेखन नियम क्रमांक १४ अन्वये अन्‌ हा एकुलता एक शब्द सोडला तर मराठीतला किंवा इतर कोणत्याही भाषेतला कोणताही शब्द मराठीत लिहिताना शेवटच्या अक्षराचा पाय मोडू नये. उदाहरणार्थ:वन्दे मातरम, कुर्यात सदा मंगलम वगैरे वगैरे लिहिणे उचित. मास्टर ऑफ़ आर्ट्‌स साठी एम.ए.(एम्‌.ए. नाही!) पण बॅचलर ऑफ़ लॉज साठी एल्‌एल.बी. पहिल्या ल चा पाय मोडला कारण तो शब्दाच्या शेवटी नाही. तसेच एम.एस्‌सी. त्यामुळे तिरुअनंतपुरम्‌ चालणार नाही. तिरुअनंतपुरम लिहायला पाहिजे. पाय न मोडता देखील मराठी उच्चारपद्धतीनुसार शेवटचे अक्षर हलन्त उच्चारले जाते. हा नियम जर नसता तर प्रत्येक अकारान्त इंग्रजी श्ब्द मराठीत शेवटच्या अक्षराचा पाय मोडून लिहावा लागला असता. जसे: जॉर्ज्‌, प्रोग्रॅम्‌, व्हाइट्‌ हाउस्‌ इत्यादी. --J १५:३७, ११ ऑक्टोबर २००७ (UTC)

Copied this to विकिपीडिआ:चावडी
MarathiBot १५:५०, ११ ऑक्टोबर २००७ (UTC)