चर्चा:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@संदेश हिवाळे:

नमस्कार सर, ह्या लेखाच्या विकासाच्या निमीत्ताने काही महत्वाच्या गोष्टींकडे आपले लक्ष वेधावे वाटते.

  • पहिले हे की त्यांच्या विचारांची कोणत्याही विकिप्रकल्पातून जी काही दखल घेतली जात आहे ती वस्तुत: विशीष्ट ग्रंथातून विशीष्ट पृष्ठ क्रमांकासह आणि अनुवाद असल्यास मूळ ग्रंथातील अथवा पाक्षिकातील मूळ उतारा नोट्स मध्ये अथवा दाखवा लपवा साचा लावून घेण्याची दक्षता आत्तापासूनच घेणे उत्तम. नाहीतर कोणतेही वाक्य कुणाच्याही नावावर खपवण्याचे आणि नंतर नावात काय आहे म्हणण्याचे प्रमाण भारतात कमी नाही. अनेक वृत्तपत्रे सुद्धा बऱ्याचदा चुकीची माहिती अंतर्भूत असू शकते (उदाहरणार्थ सध्या नाना पाटेकरांच्या विकिपीडिया लेखातील तथ्ये जुळत नाहीत).
    • आणि आपणास आपल्या वेळेपैकी काही वेळ विकिस्रोत प्रकल्पात डॉ. बाबासाहेबांच्या ग्रंथासाठी देण्याचे सुचवण्या मागे तोच उद्देश होता हे आपण लक्षात घेत असाल असे वाटते.
    • डॉ._बाबासाहेब_आंबेडकरांचे_विचार या सध्याच्या लेखात त्यांच्या विचारांचा विकास कसा कसा होत गेला दिशा कशी कशी बदलली त्या बाबत टिका आणि समर्थन संशोधन अथवा समिक्षा ग्रंथातून कसे कसे केले या बाबत संदर्भासहीत माहिती यावयास हवी. म्हणजे डॉ._बाबासाहेब_आंबेडकरांच्या विचारांचा नीटसा ज्ञानकोशीय मागोवा घेतल्यासारखे होईल.
  • आणि व्यवस्थीत समिक्षण झालेली टिका आणि समर्थना सहीत त्यांचे विचार आणि त्यांच्या बद्दलची मते थोडक्यात मराठी विकिपीडियावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मुख्य लेखात परिच्छेद लेखन स्वरुपात यावयास हवीत.
हे सर्व इंग्रजी विकिपीडिया प्रमाणे या क्षणीच झाले पाहीजे नाही तर डिलीट करू बॅन करु असा अट्टाहासही या मागे नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे काही लिहिले जाईल ते अधिकाधीक विश्वासार्ह असावे या बद्दल आपणही उत्सूक असालच आणि आपुलकीतून होणाऱ्या केवळ वरवरचे लेखनापर्यंत मर्यादीत न राहता त्यांचे आणि त्यांच्या बद्दलचे मूळग्रंथ विकिस्रोतवर उपलब्ध करणे, आणि त्यामूळ ग्रंथातून त्यांच्या विचारांचा संदर्भ देत लेखन करणे मराठी विकिपीडियावरील मजकुरास अधिक खोली प्राप्त करुन देईल या बद्दल आपण सहमत असाल असा विश्वास वाटतो.
आपला सहभाग सर्वसाधारणपणे ज्ञानकोशीय परंपरा समजून घेणारा, समतोल आणि उत्साही राहीला आहे त्या बद्दल आदर आहेच. केवळ या निमीत्ताने मला काय वाटते ते या संवादातून आपल्यापाशी व्यक्त केले.
आपल्या पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:५९, २२ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

बरोबर आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार यांना संदर्भ ग्रंथ हवेत. विकिस्रोत प्रकल्पाविषयी मला विशेष माहिती नाही. --संदेश हिवाळेचर्चा १०:३४, २३ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]