चर्चा:जास्वंद
मला जासवंद या फुलाची सिवसतर िचत्रासह माहीती हवी.
Untitled
[संपादन]संध्याकाळनंतर देउ शकेन.
V.narsikar ०९:५८, २७ ऑगस्ट २००९ (UTC)
इतरत्र सापडलेला मजकूर
[संपादन]जास्वंद हे फुल विविध रंगात आणि आकारात आढळते. ह्या झाडाला वर्षभर फुले येत असतात. जास्वंदाच्या फुलाचा आकार घंटेप्रमाणे असूनही फुले पांढऱ्या, पिवळ्या, लाल, नारिंगी, गुलाबी तसेच मिश्र अश्या अनेक रंगांची असतात. कीटकांना आकर्षित करण्यासाठी फुले खूप सुंदर रंगांची असतात परंतु त्यांना सुगंध मात्र नसतो. जास्वंदीच्या फुलाला बहुधा पाच पाने असतात आणि त्याचा व्यास सुमारे १० सेमी असतो. काही प्रकारच्या जास्वंदीमध्ये पाकळ्या दुप्पट आणि एकावर एक असतात. जास्वंद हे मुळचे चीन आणि पॅसिफिक बेटातील फुल आहे. हे झाड उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळतात. जगभरात जास्वंदाच्या सुमारे ३०० हून अधिक प्रजाती आहेत. जास्वंदाचे झाड सुमारे १५ फुटापर्यंत उंच होऊ शकते हवाईमध्ये तर ३० फुट उंच होऊ शकते. चीनमध्ये जास्वंदाला शु-फ्लॉवर म्हणतात कारण त्याचा उपयोग बूट पॉलिश करण्यासाठी होतो. हवाईन आणि ताहीतीन मध्ये स्त्रिया लग्नापूर्वी जास्वंदाचे फुल उजव्या कानावर घालण्याचा रिवाज आहे. हे फुल घालण्याचा अर्थ स्त्री लग्न करण्यासाठी इच्छुक आहे असा होतो. लग्न ठरल्यानंतर किंवा झाल्यानंतर फुल डाव्या कानावर घातले जाते. जास्वंदाचे फुल, पाने, मुळे सर्वच औषधी आहेत.जास्वंदाच्या फुलांपासून तयार केलेले तेल केसांच्या वाढीसाठी व केसगळती थांबविण्यासाठी उपयोगी आहे. तसेच या तेलामुळे डोके थंड होते आणि उत्तम झोप येते. जास्वंदाचे फुल गणपतीला अतिशय प्रिय आहे म्हणून भारतात ह्या फुलाला खास स्थान आहे. तसेच कालीमातेच्या पूजेत सुद्धा लाल जास्वंदाचा खास वापर होतो. जास्वंद हे मलेशियाचे राष्ट्रीय फुल आहे ज्याची घोषणा १९६०मध्ये झाली. तसेच जास्वंद साउथ कोरिया आणि हैटी य देशांचे सुद्धा राष्ट्रीय फुल आहे. हे फुल खाण्यायोग्य आहे आणि ह्या फुलाची चव तीव्र आंबट आहे. सुकलेले जास्वंदाचे फुल मेक्सिकोमध्ये खूप प्रसिद्ध आहे. रोजेल हा जास्वंद भाजी म्हणून वापरतात. काही प्रजातीच्या जास्वंदाचा उपयोग मध्ये नैसर्गिक रंग स्त्रोत म्हणून होतो. काही देशांमध्ये जास्वंदाचा चहा म्हणून उपयोग केला जातो ज्यामध्ये विटामिन क अधिक प्रमाणात असते. तसेच ब्लडप्रेशर आणि कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. पोलीनेशियामध्ये झाडाच्या खोडांच्या तंतूचा उपयोग ग्रास स्कर्ट बनविण्यासाठी होतो तसाच या तंतूपासून केसांसाठी विगसुद्धा बनविला जातो. केनाफ नावाच्या जास्वंदाचा वापर कागद बनविण्यासाठी होतो. जास्वंदीच्या फुलांची व पानांची पेस्ट शाम्पू म्हणून वापरली जाऊ शकते. पानांची पेस्ट गरम करून फोडांवर किंवा जखमेवर लावली जाते.