चर्चा:जगातील वेगवेगळी खेळमैदाने
Appearance
Untitled
[संपादन]१)ग्राउंड=मैदान,पण स्टेडियमला काय शब्द आहे? तो स्टेडियमच ठेवावा काय? २)कोणी मला ही यादी देशानुसार एकत्र (म्हणजे सर्व भारताच्या मैदानांची आधी एकत्र,एकाखाली एक,नंतर ऑस्ट्रेलिया ....)अशी करून देउ शकेल काय? कृपया मदत करा. ३)स्टेडियमच्या अस्तित्वात असलेल्या पूर्वीच्या लेखनावात एकसुत्रता नाही.कुठे नुसते नाव आहे.कुठे नाव,स्थानाचे नाव.त्याची policy ठरवुन त्यानुसार एक आदर्श लेख हवा.त्यानुसार मग बाकीचे लेख करता येतील.याचा साचा आहे काय? जाणकारांनी कळविल्यास मी आभारी राहीन. वि. नरसीकर (चर्चा) ०३:१९, १० डिसेंबर २००९ (UTC)
- स्पोर्ट्स ग्राउंड = क्रीडांगण असाही शब्द आहे; पण स्टेडियम या संदर्भात तो वापरला जात नाही. माझ्या माहितीनुसार '(ते) स्टेडियम' असाच शब्द मराठीत उसना वापरतात. स्टेडियम हा शब्द मराठी मानला, तर अकारान्त नपुंसकलिंगी शब्दांच्या प्रवृत्तीनुसार स्टेडियमांचे अनेकवचनी रूप '(ती) स्टेडियमे' होईल असे माझे मत आहे.
- यादीतील रकाने तुम्ही हवे तसे वरखाली करू शकता. ही यादी स्वयंचलित क्रमाने मांडली नसल्याने, कुणालाही हिचा क्रम सुधारता येईल.
- सहसा स्टेडियमाचे नुसते नाव शीर्षकात असलेले बरे. परंतु भारतात जशी गांधी, नेहरू यांच्या नावांची खंडोगणती मैदाने/स्टेडियमे सापडतात, तिथे नि:संदिग्धतेसाठी शहराचे नावही कंसात नोंदवावे (उदा., 'जवाहरलाल नेहरू स्टेडियम (पुणे)'). अर्थात यावर बाकी सदस्यांची मते पाहून निर्णय घेणे बरे.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:३८, १० डिसेंबर २००९ (UTC)