चर्चा:गौरी देशपांडे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखातील मजकुर[संपादन]

या लेखातील काही मजकुर विकिपिडियाच्या नियमांत बसत नाहीए का.? कोणता.? मार्गदर्शन् करावे.

अमित य़ादव १४:२९, २९ डिसेंबर २००९ (UTC)

या लेखात पुस्तकांबद्दल फार विस्तृत व बारीक-सारीक माहिती लिहिली आहे; जी लेखाच्या मुख्य विषयापासून - गौरी देशपांडे यांच्यावरील व्यक्तिविषयक विश्वकोशीय माहितीचा लेख, या स्वरूपाशी प्रत्यक्ष संबंधित वाटत नाही. उदा., प्रत्येक पुस्तकाच्या माहितीमध्ये 'पुस्तकाबद्द्ल:', 'पृष्ठसंख्या', 'किंमत', 'आयएसबीएन' असे बारकावे नोंदवले आहेत; जे मूळ विषयाच्या व्याप्तीपलीकडचे आहेत (त्या-त्या पुस्तकासाठी स्वतंत्र लेख असल्यास, त्यात वरील बारकावे नोंदवणे उचित ठरते.). त्यामुळे या लेखात गौरी देशपांड्यांच्या प्रकाशित साहित्याची जंत्री आणि सोबत काही मोजकी व महत्त्वाची संलग्न माहिती (पुस्तकाचे नाव - पुस्तकाचे प्रकाशन वर्ष - पुस्तकाचे प्रकाशक - साहित्याची भाषा इत्यादी.) नोंदवावी. उदाहरणादाखल रणजित देसाई हा लेख आणि विशेषत्वाने त्यातील 'प्रकाशित साहित्य' विभाग बघावा. पुस्तकांबद्दलची माहिती नोंदवायची असल्यास, स्वतंत्र लेख लिहावा (उदा.: पावनखिंड (कादंबरी) ).
दुसरी बाब म्हणजे, 'गौरी देशपांड्यांची ऑर्कुट कम्युनिटी' यांसारखे - म्हणजे विशिष्ट संकेतस्थळाच्या (= ऑर्कुट) लॉगिन खाते असलेल्या सभासदांनाच उपलब्ध असलेल्या पानांचे - बाह्य दुवे देऊ नयेत. जे बाह्य दुवे, कुठलेही लॉगिन खाते न उघडता, सार्वजनिक वाचनासाठी उपलब्ध आहेत, असेच बाह्य दुवे नोंदवावेत.
'इंग्लिश मध्ये अनुवाद केलेली पुस्तके' या विभागात, पुस्तकाचे नाव इंग्लिश भाषा व रोमन लिपीत नोंदवणे चालेल (सोबत त्याचे मराठीतील लेखनही शक्यतो नोंदवावे), परंतु पुस्तकविषयक बाकीची माहिती (प्रकाशक, प्रकाशन वर्ष इ.) मराठीतच नोंदवावी (मराठी विकिपीडियावरील मुख्य आशयभाषा देवनागरी लिपीतील मराठी, हीच वापरण्याच्या संकेताला अनुसरून).
दिवाळी अंकांतील व पुस्तकांमधील चित्रे प्रकाशकांच्या लेखी/ईमेलावरील अनुमतीशिवाय चढवू नयेत व वापरू नयेत. (अनुमती असल्यास, अनुमतिपत्राची नोंद त्या-त्या संचिकेच्या पानावर ईमेलाचा मजकूर किंवा लेखी अनुमतिपत्राच्या स्कॅन केलेल्या चित्राची लिंक देऊन जरूर ठेवावी.)
हे मुद्दे या लेखाच्या सद्यस्थितीला अनुसरून लिहिले आहेत. विकिपीडियावरील लेखनशैलीबद्दल ढोबळ संकेत विकिपीडिया:परिचय लेखातील या विभागात संक्षेपाने नोंदवले आहेत.
काही शंका/प्रश्न/आक्षेप असतील, तर जरूर नोंदवा. धन्यवाद.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:४५, ३१ डिसेंबर २००९ (UTC)

प्रताधिकार?[संपादन]

या लेखातील चित्रे, प्रकाशित साहित्यातील मजकूर इत्यादी बाबी प्रताधिकार-नियमांत बसत नसावीत असे दिसते. योगदान देणार्‍या सदस्यांनी कृपया येथे प्रताधिकारांबद्दल माहिती नोंदवावी, म्हणजे लेखातील कोणता मजकूर/चित्रे ठेवावीत व कोणती उडवावीत, हे ठरवता येईल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०७:०१, २९ डिसेंबर २००९ (UTC)

============आवृत्ती का परतवली?[संपादन]

116.75.6.36 यांची आवृत्ती का परतवली? कारण समजले नाही. 116.75.6.36 त्यांनी दुवा दिलेल्या ब्लॉगवर गौरी देशपांड्यांच्या कुटुंबाची विस्तृत माहिती होती, ती विषयाला धरूनच होती. तो ब्लॉग उघडण्यासाठी त्यावर ऑर्कुटप्रमाणे सभासदत्व पत्करून दाखल होण्याचीही गरज नव्हती....J १८:४०, २५ जानेवारी २०१२ (UTC)