चर्चा:गामा (पहिलवान)
पहिलवान कि पैलवान?
अभय नातू १७:०२, १४ ऑगस्ट २०११ (UTC)
आठवत नाही. पहलवान, पहिलवान, पहेलवान की पैलवान यांतले मराठीत काय जास्त रूढ आहे ते शोधावे लागेल उर्दूत इकार-एकार नसल्याने पहलवान लिहिले की, हवा तो उच्चार करता येतो. भैरू पैलवानकी जय या नावाचा एक चित्रपट मराठीत होता. अर्थात ही घोषणा असल्याने त्यावरून पैलवान हेच योग्य रूप आहे सिद्ध होत नाही. शब्दकोश आणि संदर्भ शोधावे लागतील.
एक अडचणः विकीवर 'गामा', 'गामा पहेलवान' किंवा नुसते 'पहेलवान' हे शब्द शोधले तरी 'गामा (पहेलवान)' हा लेख मिळत नाही. असे का व्हावे? तसेच पहेलवान/पैलवान याचा एक वर्ग केला पाहिजे, म्हणजे विकीवर तसले अनेक लेख टाकता येतील...J १७:१९, १४ ऑगस्ट २०११ (UTC)
आंतरजालावर शोधले. पैलवान फक्त मराठीत आहे, पहलवान फक्त हिंदीत, आणि पहिलवान, पहेलवान हे दोन्ही भाषांत....J १७:२७, १४ ऑगस्ट २०११ (UTC)
- धन्यवाद J,
- विकीवर 'गामा', 'गामा पहेलवान' किंवा नुसते 'पहेलवान' हे शब्द शोधले तरी 'गामा (पहेलवान)' हा लेख मिळत नाही. असे का व्हावे?
- विकिवरील शोधयंत्राला नवीन लेख आणि बदल लक्षात येण्यास थोडा वेळ लागतो. मला वाटते २४ तासांत सहसा नवीन बदल शोधनिकालांत सापडायला लागतात.
- अभय नातू १७:३१, १४ ऑगस्ट २०११ (UTC)
मोल्सवर्थचा कोश बघितला. त्यांत पईलवान हा एक शब्द दिला आहे, अर्थात तो अप्रचलित असल्याने विचारात घेण्याचे कारण नाही. पेलवान आणि पैलवान या दोन्ही शब्दांसमोर 'Properly पहिलवान' अशी टीप आहे. म्हणजे पहिलवान हा जास्त बरोबर आहे. पहलवान आणि पहेलवान कोशात दिलेले नाहीत. गामा (पहेलवान) हे पान गामा पहिलवान या मथळ्याखाली निर्देशित करायला हरकत नसावी...J १७:३९, १४ ऑगस्ट २०११ (UTC)
- प्रा. यास्मिन शेखांनी संपादलेल्या "मराठी लेखनकोश" ग्रंथात "पहिलवान" या शब्दाचीच नोंद आहे. फारसीतून आपल्याकडे आलेला शब्द येताना पहिलवान, पैलवान असा झाला असावा. पैलवान शब्दाच्या नोंदींबद्दल कोश धुंडाळावे लागतील. पण सकृद्दर्शनी "पहिलवान" नामाचा बोलीतील उच्चार सुगम करण्याच्या प्रवृत्तीनुसार "पैलवान" झाला असावा, असे वाटते.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:३१, १५ ऑगस्ट २०११ (UTC)
मंडळी या हिंदुस्थानच्या मातीत जन्माला येणे हे परम भाग्याची गोष्ट आहे,एक एक असे नरवीर या भूमीत जन्माला आले त्यांची कीर्ती खरच आभाळा एवढी. अशाच एका नरवीराची कहाणी आज सांगत आहे ज्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मल्लविद्या जगाच्या काना कोपर्यात पोचवली.त्यांचे नाव गामा पैलवान.
अत्यंत गरीब परिस्थितीत जन्माला आलेल्या गामांचा जन्म लाहोर (सध्या पाकिस्तान मध्ये ) मधल्या छोट्याश्या खेड्यात झाला.लहानपणापासून त्यांनी खूप कष्ट घेऊन कुस्ती हा खेळ जिवंत ठेवला. त्यावेळी हिंदुस्थानावर ब्रिटिशांचे राज्य होते.
त्या काळी संस्थानिक-राजे लोक कुस्त्यांची मोठी दंगल भरवत असत. अखंड हिंदुस्थानात गामना त्या काळी तोड नव्हती. सर्व पैलवानांना त्यांनी ५ मिनिटाच्या आसमान दाखवले होते. त्यांची कुस्तीची हि भरारी आंतरराष्ट्रीय पातळीवर जावी म्हणून लाहोर चे राजे कुवरसिंग राजपूत यांनी त्यांना त्या काळी रशियात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जावे म्हणून विनंती केली, त्यांनी ती मान्य केली आणि १९२३ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी गामा रशियाला रवाना झाले .
युरोपियन स्टाईलची कुस्ती यात खूपच अंतर आहे. पण गामा डगमगले नाहीत. त्यांनी मोठ्या जिद्दीनं कुस्तीची तयारी सुरू केली होती. युरोपियन कुस्तीशैलीचा त्यांनी अभ्यास केला, माहिती मिळवली.
तिथे गेल्यावर या नरविराला स्पर्धेत प्रवेश नाकारला कारण; तत्कालीन हिंदुस्थानावर इंग्रजांचे राज्य होते आणि इंग्रजांचा एक पैलवान स्पर्धेत आम्ही आधीच घेतला आहे असे कारण सांगून गामाना प्रवेश नाकारला .
गामा निमूट पणे तिथून बाहेर पडले. मात्र रशियाच्या वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशीच एक बातमी झळकली... ती अशी कि या स्पर्धेत जो पैलवान विश्वजेता होईल त्याने किंवा या भागातल्या कोणत्याही पैलवानाने गामा पैलवानांच्या बरोबर आखाड्यात ५ मिनिटे खेळून दाखवावे आणि २५ हजाराचे बक्षीस घेऊन जावे. हे आव्हान दिले होते खुद्द गामा पैलवानांनी ..............याला म्हणतात आत्मविश्वास आणि स्वतावरच विश्वास .
त्या ऑलिम्पिक मध्ये विश्वजेता पैलवान ठरला 'झिस्को’ नावाचा एक रशियन पैलवान. त्यामुळे साहजिकच त्यांना गमांचे ते आव्हान स्वीकारावे लागले.
कुस्ती ठरली. मा.हेन्री फोर्ड यांच्या नातवाने हि कुस्ती ठरवली . सलामी झडली .. डोक्याला डोके लागले ...आंणी आणि आणि...केवळ दुसऱ्याच मिनिटात गामानी झीस्को ला अस्मान दाखवले .
सगळ्या रशिया नव्हे संपूर्ण जगात गामा पैलवानांची हवा झाली झीस्को ला हा पराभव खूप झोंबला ..३ महिन्यानंतर त्यांनी स्वताहून गामाना पुन्हा आव्हान दिले ....ती कुस्ती पण रशियात झाली . सलामी झडली...आणि केवळ १ मिनिटात धाक या डावावर झिस्को ला परत अस्मान दाखवले ..सलग दुसर्यांदा पराभव...........
यानंतर मात्र गामना हिंदुस्थानात परतावे लागले .....
गामा परत आले त्यावेळी खुद्द लाहोर चे राजे कुवरसिंग राजपूत यांनी त्यांच्या रथाला खांदा दिला ...पूर्ण जगावर गामा या पैलवानांचे अधिराज्य झाले होते. मात्र झीस्को ला सलग २ पराभव चैन पडून देत नव्हते ..त्यांनी ४ वर्षे कसून सराव केला आणि या पराभवाचा वचपा काढायचा असा निश्चय केला. ते हिंदुस्थानात आले आणि गामांच्या बरोबर पुन्हा ३ऱ्या वेळी कुस्ती ठरली. संपूर्ण जगातील संस्थानिक, राजे, उद्योगपती, हुकुमशहा यांच्या उपस्थितीत हि कुस्ती होणार होती. गामा तरीही नेहमी प्रमाणे शांत होते..हिमालयाच्या शिखराप्रमाणे ..
कुस्ती ठरली दिल्ली मुक्कामी. संपूर्ण देशाचं या लढतीकडे लक्ष लागलं होतं. स्टेडियम खचाखच भरलं होतं. हजारो प्रेक्षक श्वास रोखून कुस्ती पाहायला आपापल्या जागी बसले होते. कुस्ती सुरू झाली; आणि…. आणि रुस्तुम-ए-हिंद, हिंदकेसरी पैलवान गामांनी अवघ्या काही मिनिटातच झिस्कोला अस्मान दाखवलं!,.....सलग ३ वेळा पराभव झाल्यावर मात्र पुन्हा त्यांनी गामना कधी आव्हान दिले नाही .....असे होते जगत्जेता गामा पैलवान. मात्र.......
परत भारत पाकिस्तान फाळणी झाली. गामा पाकिस्तानात राहिले. शेवटच्या काळात त्यांना २ वेळेच्या जेवणाचे हाल सुरु झाले. उदरनिर्वाहासाठी गामाना टेलरिंग व्यवसाय करावा लागला. एकेकाळी ज्यांच्या नावाने जगाला थरकाप सुटायचा अशा विराला लोकांचे कपडे शिवायची वेळ आली. ही खबर रशियात असणाऱ्या झीस्को च्या कानी गेली. झीस्कोचे वय त्यावेळी ५९ होते शिवाय ते रशियातले प्राख्यात वकील झाले होते .
त्यांना गामांची हि परिस्थिती झाली आहे हे ऐकून डोळ्यातून पाणी आले.. ते रशियाहून लाहोर मध्ये आले .गामा त्यावेळी झोपडी वजा घरात राहत होते त्यांना पाहुन झीस्कोनी गामाना मिठीच मारली..
दोघेही खूप रडले. झीस्कोनी त्या काळी म्हणजे १९४९ साली गामाना १ लाख रुपयांची मदत केली ..तसेच झीस्कोनी हिंदुस्थानच्या गव्हर्नरला पत्र पाठून ९० रु .ची पेन्शन चालू केली. तसेच अत्लास या पंप उत्पादन करणाऱ्या कंपनीकडून झीस्कोनी २ लाख रुपयांची मदत गामाना मिळवून दिले. मंडळी अशी असते कुस्तीची नशा .कुस्तीच्या वेळी कुस्ती आणि दोस्तीच्या वेळी दोस्ती. एका पैलवानाला दुसरा पैलवान भावासारखा असतो.
सलग तीनदा पराभव स्वीकारून सुध्द झीस्को गामाला विसरू शकले नाहीत.एका पैलवानाची कदर दुसरा पैलवानाच करू शकतो..दुसऱ्याचे ते काम नाही.....
Start a discussion about गामा (पहिलवान)
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve गामा (पहिलवान).