चर्चा:गणपतीपुळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गणपतीपुळे रत्नागिरीपासून नेमके किती अंतरावर आहे? लेखात ते अंतर एका ठिकाणी १२, तर एका ठिकाणी ४० किलोमीटर असल्याचे म्हटले आहे. विविध संकेतस्थळांवर हे अंतर २२, २५, ३० आणि ५० किमी असल्याचेसुद्धा नमूद केलेले आढळले.---J १८:२१, ३ मार्च २०११ (UTC)


'गुगल अर्थ' वर या प्रकरणाचा शोध घेतला असता,रत्नागिरीहुन प्रमुख राज्य मार्ग -४ ने निघुन साखरतार,आरे,काजितभाटी,भंडारवाडा ते गणपतीपुळे किनारा या मार्गाचे अंतर अंदाजे २५ कि.मी इतके येते. हा संपूर्ण मार्ग समुद्रकिनार्‍याशेजारुन जातो.

रत्नागिरीहुन राष्ट्रीय महामार्ग २०४ ने माझगाव,केळ्ये,आरे, कोटवडे, नेवरे जवळुन मुख्य जिल्हा मार्ग ३७ ने गणपतीपुळे किनारा हे अंतर सुमारे ४० कि.मी. इतके येते.प्रत्यक्षात यात २-३ किमी अधि-उणे असे अंतर पडु शकेल.

गणपतीपुळे समुद्रकिनारा ते गणपतीपुळे गाव हे अंतर सुमारे ३ ते ४ किमी आहे.या अंतरमुळे तो फरक पडत असावा, असे माझे मत आहे.

वि. नरसीकर (चर्चा) १५:५३, ४ मार्च २०११ (UTC)