चर्चा:कानू सन्याल
Appearance
बदल साचा लावण्याचे कारण ?
[संपादन]हा साचा लावण्याचे कारण स्पष्ट कराल का? म्हणजे मी लेखात नेमके बदल करीन. धन्यवाद.
- साचा लावण्याचे सर्व उद्देश मलाही माहित नाहीत, पण विषयाच्या विश्वकोशीय दखलपात्रतेच्या अथवा शीर्षकाच्या सुयोग्यतेचा प्रश्न नसावा असे वाटते.शुद्धलेखन हा माझा वीषय नाही त्याबाबत त्याक्श्ःएत्रातील जाणकार सांगतील.
- विशेषणांचा फुलोरा असलेले अलंकृत लेखन आणि वार्तांकनता हि विश्वकोशीय लेखन शैलीस धरून नसते. लेखात इतर महत्वाचे जे दोष आहेत सध्या लेखावर वर्णनात्मक(कथाकनात्मक) ललित लेखनशैलीचा प्रभाव आहे,काही ठिकाणी वृत्त्पत्रीय वार्तांकनतेचा दोष आहे, विश्वकोशीय लेखन शैलीस धरून नाही.खास करून शक्यतेवढी विशेषणे गाळण्याचा प्रयत्न केल्यास विश्वकोशीय लेखन शैलीच्या जवळ जाणे सोपे जाईल.
- मजकुरातील काही भाग वृत्तपत्रीय लेखनातून कॉपी पेस्ट केला गेल्याचे जाणवते. त्यामुळे परिच्छेदांचा क्रमही वृत्तपत्रीय ब्लॉग सदृश्य झाला आहे.त्यामुळे लेखात लिहिणार्याची व्यक्तीगत मते काहि ठिकाणी आल्यासारखे वाटते.कॉपी पेस्टींगमुळे प्रताधिकारभंगा सोबतच मूळ वृत्तपत्रीय वृत्तातील नक्षलबारी हे खेडे तीबेट जवळ असल्याचा चुकीचा उल्लेखही जसाच्या तसा उधृत झाला आहे
माहितगार ०३:०३, १८ मे २०११ (UTC)
- अज्ञात संपादक, माहीतगारांनी सांगितलेल्या कारणास्तव लेखाची शैली काही प्रमाणात ललित ढंगातील व काही प्रमाणात वृत्तपत्रीय बातमीपत्रासारखी लिहिली गेल्याचे दिसले. त्यामुळे बदल साचा लावला. सचिन, माहीतगार व अन्य सदस्यांनी पुनर्लेखन करून हा लेख काही अंशी सुधारला आहेच; तरीही चांगला ज्ञानकोशीय दर्जा गाठण्यासाठी या लेखात अजून काही प्रमाणात सुधारणा करायला वाव आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:१५, १८ मे २०११ (UTC)