Jump to content

चर्चा:ऑपरेशन पोलो

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुक्त

[संपादन]

@Mahitgar: १८ सप्टेंबरपूर्वी घेतलेली ठिकाणे ही जिंकलेलीच होती. रूढार्थाने प्रशासकीय शब्दात हैदराबादच्या निजामाने शरणागती स्विकारेपर्यंत या तोपर्यंत जिंकलेल्या ठिकाणांवर निजामाचीच सत्ता होती. त्यामुळे निजामाने अधिकृत शरणागती पत्करल्यानंतर ही ठिकाणे मुक्त झाली. असो बाकी तुमचे मत निर्णायकच असणार. (या विषयावरील लेखन समाप्त) -- संतोष दहिवळ (चर्चा) १६:००, ३० जुलै २०१४ (IST) संतोष दहिवळ (चर्चा) १६:००, ३० जुलै २०१४ (IST)[reply]

असे नव्हे, १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळताना, (पाकीस्तान विभाजन सोडता) ब्रिटीशांची भारतातील सर्व लिगसी दिल्लीतील नवीन सरकारकडे संपूर्णपणे हस्तांतरीत झाली. (फक्त हैदराबाद म्हणून नव्हे भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा आणि आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी ब्रिटीशांकडून भारताकडे संपूर्ण हस्तांतरण या मुद्याच्याच आधारे केली जाते, म्हणून भारताच स्वातंत्र्य हे केवळ राजकीय स्वातंत्र्य (हस्तांतर) आहे, ब्रिटीशांनी एकत्र करून दिलेल्या प्रत्येक घटकाच स्वातंत्र्य नव्हे. अरुणाचल असो वा अक्सईचीन सगळी मुत्सद्देगिरी या मुद्द्याच्या आधारावर आहे). टेक्नीकली निजाम जसा ब्रिटीशांचा संस्थानिक होता तसा तो स्वतंत्र भारताच्या अंतर्गतही केवळ संस्थानिकच होता. ब्रिटीश काळापासून भारतातील कोणत्याही संस्थानिकांना लष्करी स्वातंत्र्य नव्हतच तस ते हैदराबादच्या निजामालाही नव्हत. शेवटचा शब्द हा भारत सरकारचच असण अपेक्षीत होत. जिंकणे या शब्दा पेक्षा सुद्धा अधिक इथे वर रुढार्थानेच्या नंतर 'प्रशासकीय शब्दात' या शब्द प्रयोगाबद्दल मी अधीक असहमती नोंदवतो आहे. (कदाचित आपणास 'प्रशासकीय दृष्ट्या' हा शब्दप्रयोग करावयाचा असावा.) हैदराबादचा निजाम हा मोगल काळापासूनही अधिकृतपणे सार्वभौम नव्हताच ब्रिटीशकाळात नव्हताच नव्हता तो केवळ एक संस्थानिक आणि संस्थानिकच होता त्या अर्थाने संस्थानिक या नात्याने त्याच काही प्रदेशावर सरंजामी नियंत्रण होत (सरंजामशाही या अर्थाने 'सत्ता' शब्द वापरता येतो एरवी नव्हे) . पोलीस कारवाईचा अर्थ एवढाच की संघशासनाने स्वत:च्याच भूमीवरील एका भरकटू पाहणाऱ्या संरजामशहाला शरणागत आणून नियंत्रण तेथील जनतेच्याच मागणीवरून स्वत:कडे घेतल. आणि उर्वरीत राष्ट्राप्रमाणेच लोकशाहीत प्रक्रीयेत सहभागी होण्याच्या तेथील जनतेच्या आकांक्षेतील सरंजामशाही अडथळा दूर केला.
निजामाने रजाकार हा अनधिकृत प्रकार उभा केला होता कारण अधिकृतपणे त्याला सैन्य उभकरण शक्य नव्हत. पोलीस कारवाईत भारतीय संघसरकारने या अनधिकृत प्रकारांनी जनतेला जाच होत होता त्या जाचातून जनतेची मुक्तता केली या अर्थाने मुक्तता शब्द वापरला आहे. (गोवा मुक्तीनंतर पोर्तूगिजांनी अधिकृतपणे भारताचा भाग असण्याला त्यांची टेक्नीकल स्विकृती नंतर बऱ्याच वर्षांनी दिली म्हणून तेवढा काळ आम्ही गोवा जिंकले म्हणणार का ?) सैनिकी दृष्टीकोनातून प्रत्येक विजय प्रत्येक यश जिंकणच असत . पण इथे जिंकण म्हणजे काय केल सरंजामशहांना हटवून स्वत:चीच भूमी स्वत:च्या नियंत्रणात घेतली याला तो विजय असलातरी मी राजकीय दृष्ट्या जिंकण म्हणू शकत नाही ती जनतेसाठी राजकीयदृष्ट्या जाचातन मुक्तता म्हणून मुक्तता शब्द वापरला एरवी जिंकण्या पेक्षा अधिक नेमक्या पॉलीटीकली राईट व्याख्येसाठी पुर्न-अधिग्रहण असा काही शब्दप्रयोग करण्याची आवश्यकता असावी. म्हणून अधिकृतरित्या पोलीस कारवाई हा शब्द प्रयोगास प्राधान्य मिळत असाव.
जिंकून घेतल ह्या शब्दाचा तुमच्या आणि माझ्या आपापसातील वापराने तसा फारसा फरक पडत नाही. पण पाकीस्तानी लोक आंतरराष्ट्रीय पातळीवर तसेच देशात अतीरेकी मिळवण्यासाठी फॅनाटीकल ब्रेनवॉशींग साठी याच जिंकणे शब्दाचा वेगळ टोकाच सादरीकरण करू शकतात. टोकाचा अर्थ काढणारे जे तुमच नव्हत ते तुम्ही जिंकल म्हणू शकतात. अरे जो प्रदेशच माझा आहे त्याला मी जिंकणार काय ? 'कार्गिल जिंकले' हे दोनच शब्द वापरले तर सैनिक दृष्ट्या बरोबर आहे पण कारगील माझ्या देशाचा अविभाज्य भाग आहे त्याला मी राजकीय दृष्ट्या जिंकल म्हणणार नाही विजय मिळवला म्हणेन.
नेमके शब्द काय वापरावेत ही, म्हटली तर क्षूल्लक बाब आहे. पण दुर्लक्ष केल तर भारतविरोधी शक्ती अर्थाचा अनर्थ करू शकतात. मराठीच्या लेव्हलला आणि रोजच्या दैनंदीन लिहिण्या बोलण्यात याची काळजी घेण्याची गरज आहे का ? इथे मतांतरे असू शकतात पण आजही काही ठिकाणी मुलतत्ववादी शक्ती डोके वर काढण्याची संधी शोधत असतात तेव्हा आपल जपलेल बर.
अर्थात मी माझ मत लादल पाहीजे एवढही या विषयाला महत्व देऊ इच्छित नाही.
चर्चेसाठी धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:१०, ३० जुलै २०१४ (IST)[reply]

जाणत्यांनी घातलेली गस्त खरोखरच योग्य आहे काय ?

[संपादन]

या लेखपानावर आजवर अनेक जाणत्यांनी गस्त आणि नजर टाकलेली आहेच त्यामुळे ज्याकोणी माहितीचौकटीत कारवाईची दिनांक १३ सप्टेंबर, इ.स. १९४७ ते १८ सप्टेंबर, इ.स. १९४७ अशी टाकलेली आहे ती बरोबरच आहे असे गृहित धरावे काय? संतोष दहिवळ (चर्चा) १०:५६, ३१ जुलै २०१४ (IST)[reply]


:) आपल्या उपरोक्त कॉमेंट नंतर घोळा कडे लक्ष गेले. पण एरवी आपण नेमक काय म्हणू इच्छित आहात ? :)
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१३, ३१ जुलै २०१४ (IST)[reply]