चर्चा:इ.स. १८६८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अमेरिकन ७ वे राष्ट्राध्यक्ष अँड्रु जॅक्सन की जॉन्सन? एकाच मताने निर्दोष की एकमताने? आणि इतक्या पराक्रमी, प्रामाणिक आणि तडफदार माणसावर कसला अभियोग भरला होता? आणि कुणी? १८६८ च्या पानावर ठळक अक्षरात नोंद व्हावी इतकी ही गोष्ट ऐतिहासिक महत्त्वाची आहे का?--J-J ०८:२४, ७ मे २००७ (UTC)

इतक्या पराक्रमी, प्रामाणिक आणि तडफदार माणसावर कसला अभियोग भरला होता? आणि कुणी? १८६८ च्या पानावर ठळक अक्षरात नोंद व्हावी इतकी ही गोष्ट ऐतिहासिक महत्त्वाची आहे का
तिसर्‍या प्रश्नाचे उत्तर पहिल्या प्रश्नात आहे :-)
पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरे जॉन्सनच्या इंग्लिश विकिपीडियावरील पानात आहेत. सवड मिळाल्यास येथे लिहावी.
अभय नातू १४:३६, ७ मे २००७ (UTC)

माझ्यापेक्षा अधिक जाणकाराची वाट न पहाता, मी जॅक्सनचे जॉन्सन करून टाकले. १ मताने बदलून एका मताने. आता 'अँड्रु' चे विशेष नामांच्या कोशात दिल्याप्रमाणे 'अँड्रू' करायचा विचार आहे. कुणाचा विरोध नसेल तरच!--J--J ०६:१८, ११ मे २००७ (UTC)