चर्चा:अलेक्झांडर द ग्रेट
अलेक्झांडरबद्दल लिहिताना पर्शियन साम्राज्याचा उल्लेख वारंवार येणार आहे. पर्शियन साम्राज्य म्हणजे केवळ इराण नव्हे त्यामुळे पर्शियन साम्राज्यासाठी नेमका मराठी शब्द कोणता वापरावा? 'फारसी' असा शब्द वापरणे सयुक्तिक वाटत नाही, तर पर्शियन हा इंग्रजी शब्द आहे.
कळावे, priyambhashini 20:47, 15 जानेवारी 2007 (UTC)
IMO, पर्शियन साम्राज्य, with a link to an article of its own, is fine.
अभय नातू 21:04, 15 जानेवारी 2007 (UTC)
- मलाही मराठीतील इतिहासविषयक लिखाणात 'पर्शियन साम्राज्य' असे नाव वाचल्याचे आठवते. 'फारसी' हा शब्द प्रामुख्याने इस्लामी काळातील इराणच्या संदर्भांमध्ये येत असावा (उदा. फारसी साहित्य, फारसी भाषा). 'इराण' हे नाव खुद्द इराणी लोकांनी तसे गेल्या दीड-एक शतकात वापरायला सुरुवात केल्याचे कुठेतरी वाचले होते.
- त्यामुळे, सध्यातरी 'पर्शियन साम्राज्य' असा शब्द योजण्यास हरकत नाही.
- --संकल्प द्रविड 05:19, 16 जानेवारी 2007 (UTC)
माकेदोन का मॅसेडोन?
[संपादन]ग्रीक भाषेत 'मॅसेडोन'चे लेखन Μακεδονία असे केले जाते (संदर्भ: en:Macedon) याचा उच्चार माकेदोन/माकेदोनिया असे होईल असे (माझ्या ग्रीक लिपी/उच्चारांबाबतच्या अल्प-स्वल्प माहितीनुसार :P) वाटते. कारण: 'Μα' = 'मा', 'κε' = 'के', 'δο' = दो (का 'डो'.. ग्रीक लोकांनाच विचारावे लागेल. :D), 'νία' = 'निया'.
फारसी/उर्दूमध्येदेखील 'अलेक्झांडर द ग्रेट'ला 'इस्कंदर-ए-मक्दूनी' म्हटल्याचे वाचले.
याबाबतीत इतर विकिकरांना काही माहिती आहे काय?
--संकल्प द्रविड 05:28, 16 जानेवारी 2007 (UTC)
- मॅसेडोन/मॅसिडोनिया रूढ आहे त्यामुळे तेच ठेवावे.
- अभय नातू 05:32, 16 जानेवारी 2007 (UTC)
- मलाही वाटते मॅसेडोनिया हा सरळसोट इंग्रजी (/अमेरिकन) उच्चार रूढ असल्याने तोच ठेवावा.
- priyambhashini 12:15, 16 जानेवारी 2007 (UTC)
अलेक्झांडर द ग्रेट की अलेक्झांडर महान
[संपादन]पुन्हा एक similar प्रश्न. अलेक्झांडर द ग्रेट म्हणावे की त्याचे मराठीकरण करून अलेक्झांडर महान म्हणावे आणि अलेक्झांडर द ग्रेट चे पान redirect करावे? इतरांचे मत हवे होते? priyambhashini 12:18, 16 जानेवारी 2007 (UTC)
- खरे तर, लहानपणी वाचलेल्या पुस्तकांमध्ये 'सिकंदर' असा नामोल्लेख होता. तो वापरायला हरकत नाही.
- --संकल्प द्रविड 12:24, 16 जानेवारी 2007 (UTC)
- त्याचा उपयोग करायला हरकत नाही परंतु सिकंदर हे अलेक्झांडरचे भ्रष्ट रुप असल्याने केवळ त्याचा वापर करणे सयुक्तिक वाटत नाही. तसे उत्तरेकडे त्याला अलक्षेंद्र म्हटल्याचेही आठवते. :p परंतु सिकंदर या नावाचा उल्लेख हवाच आणि तसेही पान बनवून रिडायरेक्ट करता येईल.
- priyambhashini 12:26, 16 जानेवारी 2007 (UTC)
- सिकंदर हे पान कधीच केले गेलेले आहे. :-)
- अलेक्झांडर द ग्रेट सयुक्तिक वाटते. मराठीकरण करायचेच झाल्यास (माझा याला प्रखर विरोध) महान अलेक्झांडर करावे, अलेक्झांडर महान नव्हे.
- प्रतिउदाहरण द्यायचे झाल्यास महात्मा गांधीचे इंग्रजीकरण Great Soul Gandhi जसे बरोबर वाटत नाही तसेच काहीसे अलेक्झांडर महानचे होइल.
- अभय नातू 16:56, 16 जानेवारी 2007 (UTC)
प्लुटार्क की प्लूटार्क
[संपादन]मूळ स्पेलिंग Plutarch. याप्रमाणे मी प्लु र्हस्व लिहिते. विकिवर प्लूटार्क असे पान बनवले गेले आहे. कृपया कळावे. (या लेखात प्रत्येक ग्रीक नावाबद्दल प्रश्न उपस्थित राहणार असे वाटायला लागले आहे. :( )
priyambhashini 18:09, 16 जानेवारी 2007 (UTC)
हे शब्द मराठीत कसे लिहावेत?
[संपादन]काही शब्दांबाबत संदिग्धता आहे जसे
Pharaoh हा शब्द फॅरो असा लिहावा की फॅरोह् असा?
Cairo हा शब्द कैरो असाच लिहावा का?
Port Said हा शब्द पोर्ट सैद असा लिहावा की पोर्ट सईद?
तसेच upper and lower Egypt हे मराठीत कसे लिहावे? upper and lower हे श्रेष्ठ/ कनिष्ठ नसून नाईल नदीच्या प्रवाहावरून ठेवलेली नावे आहेत. वरील आणि खालील इजिप्त म्हणणे कसेसेच वाटते. :) विकिवरील भाषातज्ञ याबाबत काही सुचवणी करतील का?
कृपया कळावे, त्यानुसार मला लिहिणे सोपे जाईल.
priyambhashini १५:०८, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)
फॅरो, कैरो, पोर्ट सैद बरोबर आहेत. वरचे/खालचे हे शब्द उचित वाटतात. इंग्लिशमधील अपर, लोअर सारखेच स्पॅनिशमध्येसुद्धा 'बाहा' हा शब्द, छोटे, खालचे हे सूचित करण्यासाठी आहे व भौगोलिक संकल्पनेत तो सर्रास वापरला जातो, जसे बाहा कॅलिफोर्निया (खालचे कॅलिफोर्निया). खालची आळी, वरची आळी, इ. आपण वापरतोच की!
मी भाषातज्ञ नाही :-)
अभय नातू १६:२३, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)
गागामेलाचा उच्चार
[संपादन]Please help me out to finalize pronunciation of Gaugamela. I have heard pronunciations like following
गागामेला and गॉगामीला. How do we do मराठीकरण of this word? Regards, priyambhashini ११:३४, ८ फेब्रुवारी २००७ (UTC)
== कंदहार==
कंदहार की कंदाहार?---J---J १०:०९, २३ जून २००७ (UTC)
---------------------------------------------------------------------------------------------
पुरु/पोरस/पौरस
[संपादन]पोरस किंवा पौरसला एकदा पुरु म्हणायचे ठरवले तर त्याला प्रत्यय लावताना मराठी शुद्धलेखनाचे नियम पाळावे लागतील. पुरूचे(दीर्घ रू), पुरूला इत्यादी. ही चूक एकूण पंधरा ठिकाणी झाली आहे. मूळ लेखिकेनेच दुरुस्ती केल्यास बरे होईल.(मुळात पुरु सुद्धा पुरू असा लिहायला हरकत नव्हती, पण नाही लिहिले तरी चालावे असे वाटते.. जुनी पुस्तके पाहून उपयोग नाही, कारण ती जुन्या नियमांनुसार लिहिली असणार). ब्युसाफला की बुकेफाला? नक्की उच्चार तुम्ही पाहिलाच असेल. तसेच नायसीया की निकोई? हा शब्द 'निकी' असा पण मी वाचला आहे. मुळात शकांनी माग किंवा मांग नावाचे गाव वसवले होते, तिथेच सिकंदराने हे निकोई वसवले. हल्ली त्याला परत मांग म्हणतात असे ऐकून आहे. --J १६:०२, २६ ऑगस्ट २००७ (UTC)
- 'जे' यांच्या पुरु म्हणायचे ठरवले तर त्याला प्रत्यय लावताना मराठी शुद्धलेखनाचे नियम पाळावे लागतील या मताशी सहमत. मूळ विशेषनाम जरी र्हस्व उकारान्त असले, तरीही विभक्तीरूपे होताना र्हस्व उकाराचा दीर्घ उकार होतो. त्याप्रमाणे लेखात योग्य त्या दुरुस्त्या कराव्यात.
- --संकल्प द्रविड १९:१६, २६ ऑगस्ट २००७ (UTC)
- पुरूचे शुद्धलेखन बदलले. शुद्धलेखनाचे नियम लक्षात आले नाहीत. आधी सर्व पुरू दीर्घ ठेवले होते. संकल्पनी सांगितल्यावर सर्व र्हस्व केले, डोके वापरले नाही. क्षमस्व! सध्या दिसतील तेवढे बदल केले आहेत. अधिक लक्षात आले तर करत जाईन.
- ब्युसाफलस हे घोड्याचे नाव धरले तर शहराचा उच्चार ब्युसाफला असावा असे वाटते. नायसीयाचा उच्चार मात्र माझ्यामते बरोबर आहे कारण नायसीया नावाची अनेक शहरे असावीत. (अलेक्झांड्रियाप्रमाणे) इतर काही शहरांचे उच्चार नायसीया असेच ऐकले आहेत. युद्धात विजय मिळाला, शुभ झाले अशा अर्थाने नायसीया हे नाव ठेवले गेले. उच्चार येथे[१] आहे. नाईकी ही ग्रीक देवता जी युद्धात विजय मिळवून देते असे मानले जाते. तिच्या नावावरून निकोई नाव येणे शक्य आहे.
- या लेखाचे सर्व उच्चार ग्रीक इतिहासाप्रमाणे घेतले असले तरी ते प्रचलीत इंग्रजी उच्चार आहेत. (अर्थात, सिंधूला इंडस नाही म्हटलेलं) जे उच्चार सहज शोधून मिळाले नाहीत त्याचे ग्रीक उच्चार सध्या तसेच ठेवले आहेत. पर्शियन आणि भारतीय उच्चार वेगळे असण्याची शक्यता आहे. ते मिळाले तर हे ग्रीक उच्चार कंसात टाकता येतील असे वाटते. आपल्याला ते मिळाले तर अवश्य लिहा, मी शोधत असतेच परंतु मला मिळणे जरा कठिणच होते.
- priyambhashini २२:११, २६ ऑगस्ट २००७ (UTC)
वैज्ञानिक संशोधनावर मिळालेली अधिक माहिती
[संपादन]२५ ऑक्टोबर २००७ ला सिकंदराने हिंदुस्थान सोडल्याला बरोब्बर २३३३२ वर्षे होतील. तो हिदुस्थानात फक्त १८ ते २० महिने होता. या काळात त्याने ५ ते ६ लाख माणसे मारली व जायबंदी केली.इथली अर्थव्यवस्था खिळखिळी करून तो सिंधमार्गे २५ ऑक्टोबर इ.स.पू. ३२५ या दिवशी जिवानिशी पळाला. पुरूने सिकंदराशी लढलेले युद्ध आपले पहिले स्वातंत्र्ययुद्ध! त्यात जय मिळवूनसुद्धा तो पुढे जाण्याची हिंमत हारला. ब्रिटिश म्युझियममधील हत्तीवरील दोन हिदुस्थानी आणि त्यांच्यावर मागून भालाफेक करणारा ग्रीक सैनिक असे चित्र असणारे नाणे खरे नाही. अरिस्टॉटल या त्याच्या गुरूनेच त्याला दारूतून थोडेथोडे विष शेवटचे बारा दिवस घातले. त्याच्या मृत्यूची कारणे--सदोदित धावपळीचा ताण, मद्य आणि मदिराक्षींच्या अतिरेकामुळे बिघडलेले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, दारूमुळे खराब झालेले यकृत, सततची पोटदुखी, उलट्या आणि हिंदुस्थानी डासांच्या चावण्यामुळे झालेले रोग आणि येणारे वेडाचे झटके आणि शेवटी विषप्रयोग. ---J---J १५:०२, २२ ऑक्टोबर २००७ (UTC)
ऍरिस्टोटल मृत्यूसमयी अलेक्झांडर समवेत असल्याचे कोणतेही पुरावे वाचनात नाहीत. पुरुने सिकंदराशी लढलेल्या युद्धाला स्वातंत्र्ययुद्ध म्हणणे केवळ अशक्य. पुरुने मांडलिकत्व स्वीकारून अलेक्झांडरची चाकरी केल्याचे इतिहास सांगतो. बाकी लेखातही अनेक चुका आढळल्या. हेफेस्टियनला मृत्यूपश्चात देवाचा दर्जा मिळावा याला संमती मिळाल्यावर आयोजित केलेल्या समारंभात अतिमद्यपान केल्यावर, त्यानंतरही एका सेनापतीच्या आग्रहावरून त्याच्याकडे जाऊन केलेल्या मद्यपानानंतर अलेक्झांडरची प्रकृती ढासळल्याचे इतिहास सांगतो. त्यावरून त्याला विषबाधा करण्यात आली असावी हा अंदाज खरा आहे. त्याच्या मृत्यूशी भारताशी संबंध इतकाच की फुप्फुसाला बाण लागून झालेली जखम त्याला जन्मभर पुरली आणि पोखरत गेली. बाकी, ग्रीक सैन्यापेक्षा पर्शियन सैन्याला महत्त्व देणे, पर्शियन रितीरिवाज अवलंबिणे, पर्शियन कन्यांशी लग्ने करणे अशा अनेक कारणांनी तो मॅसेडोनियन/ ग्रीक सैन्याच्या मनातून उतरला होता आणि त्यावरून त्याला विषबाधा करण्यात आली असेल तर त्यात वावगे वाटत नाही
priyambhashini १३:४२, १९ नोव्हेंबर २००७ (UTC)