Jump to content

चर्चा:अभिव्यक्ती

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:अभिव्यक्त होणे या पानावरून पुनर्निर्देशित)

या लेखाचे शीर्षक अभिव्यक्ती असे पाहिजे का?

अभय नातू ०१:४४, १४ मार्च २०११ (UTC)

कदाचित शीर्षकात बदलाची आवश्य्कता आहे पण अभिव्यक्ती या शब्दास व्यक्तीमत्व या अर्थाची अर्थछटा अधीक ठळक वाटते. केवळ अभिव्यक्त चालू शकेल काय ? शिवाय लेख विस्ताराकरिता होणार्‍या वाचनातून किंवा एखाद्दा जाणकाराचा या विषयास हात लागल्यास शीर्षकाबद्दल निर्णय करणे कदाचित सोपे जाईल. माहितगार ०२:३५, १४ मार्च २०११ (UTC)
अभिव्यक्ती हे 'एक्सप्रेशन' या अर्थी असणारे नाम आहे. त्यातही सूक्ष्म छटा सांगायची, तर एखाद्या गोष्टीचे तात्कालिक (इन्स्टँशिएटेड) प्रकटीकरण म्हणजे अभिव्यक्ती. त्यानुसार हे नाव सध्याच्या 'अभिव्यक्त होणे' नावापेक्षा अधिक बरे ठरेल, असे वाटते.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:२३, १४ मार्च २०११ (UTC)

ओबडधोबड भाषांतर

[संपादन]

मराठीत व्यक्त हे विशेषण आहे, पण त्याचा उपयोग करणे किंवा होणे या सकर्मक क्रियापदांबरोबर क्रियाविशेषणासारखा होतो. म्हणजे व्यक्त करणे आणि व्यक्त होणे या दोनही शब्दरचना वापरताना कर्म आवश्यक असते. तिथे व्यक्त करणे म्हणजे उघड किंवा जाहीर करणे. उदा० आनंद, खेद, दुःख, प्रेम, भावना, मत, विचार, शोक, हर्ष इत्यादी व्यक्त करणे म्हणजे, मनात असलेल्या या भावना शब्दरूपात उघड करणे. या गोष्टी हेतुपूर्वक केल्या नाहीत तरी त्या नजरेतून, वागणुकीतून किंवा चेहर्‍यावरील भावमुद्रांनी व्यक्त होऊ शकतात. औदासीन्य, कारुण्य, क्रौर्य, जिव्हाळा असल्या काही गोष्टी व्यक्त करता येत नाहीत, तर त्या फक्त व्यक्त होतात. तर सुख, शौर्य असल्या गोष्टी ना व्यक्त करता येत ना होत. ‘आय वॉन्ट टु एक्सप्रेस मायसेल्फ़‘चे ’मला व्यक्त व्हायचे आहे’ हे अत्यंत ओबडधोबड भाषांतर. जोपर्यंत त्या वाक्यात कर्म नाही तोपर्यंत व्यक्त होणेला काहीही अर्थ नाही. ते मराठी वाक्य नाही.

व्यक्त हे मराठीत नामाआधी येणारे शुद्ध विशेषण म्हणून वापरता येत नाही. पण ’अव्यक्त’ येते. अव्यक्त म्हणजे बोलून न दाखवलेले. अव्यक्त प्रेम, दु:ख इत्यादी.

अभिव्यक्ती म्हणजे प्रकटीकरण. हे भाववाचक नाव आहे. लेखक लेखनाद्वारे त्याच्या विचारांची अभिव्यक्ती करतो. मनापासून स्वयंपाक करणारी कुटुंबवत्सल स्त्री आपल्या कृतीने प्रेमाची अभिव्यक्ती करते, वगैरे. तसला अर्थ नसलेला अभिव्यक्त हा शब्द मराठीत नाही. त्यामुळे अभिव्यक्त होणे किंवा करणे या वाक्प्रयोगांना मराठीत थारा नाही.

अभि या उपसर्गाचा अर्थ आधिक्य दाखवणारा नाही हे खालील शब्दांवरून स्पष्ट होईल. अभियोग=खटला; अभिजात=सुसंस्कृत; अभिधान=विशेष नाम; अभिशाप=तळतळाट; अभिषेक=समंत्र पाणी शिंपडणे; अभिवादन=नमन; अभिसरण=पुढे जाणे, मिश्रण होणे; अभ्यागत=पाहुणा; अभ्यंतर=आतला भाग, असेच अभिमान, अभिजन वगैरे. यांत कुठेही आधिक्य हा अर्थ आलेला नाही.

सोशल नेटवर्किंगच्या फ्याडातून व्यक्त होणे किंवा अभिव्यक्त होणे हे निरर्थक वाक्प्रचार मराठीत येऊ पाहत आहेत, त्यांना वेळीच थांबवायला हवे. --J १९:०६, १४ मार्च २०११ (UTC)


  • अभि उपसर्गाने ध्वनीत होणार्‍या अर्थांची माहिती पुस्तक.ऑर्ग या ऑनलाईन शब्दकोशात खालील प्रमाणे मिळते.
उप० [सं०√भा(दीप्ति)+कि, न० त०] एक उपसर्ग जो कुछ शब्दों के आरंभ में लगकर निम्नलिखित अर्थ सूचित करता है।— (क) आगे या सामने की ओर, जैसे—अभिमुख। (ख) मात्रा या मान की अधिकता, जैसे—अभिकंपन, अभिसिंचन, अभ्युदय। (ग) अच्छी तरह से। भलीभाँति। जैसे—अभिव्यंजन, अभ्युदय। (घ) किसी प्रकार की विशेषता या श्रेष्ठता का सूचक, जैसे—अभिनव (बिलकुल नया), अभिभाषण (विवेचनापूर्ण भाषण), अभिपत्र (विद्धत्तापूर्ण लेख)।

१)

अभिव्यक्त शब्दाची नोंद शाब्दबंध या ऑनलाईन मराठी शब्दकोशात आढळते ती खालील प्रमाणे
अभिव्यक्त
Adjective(1)
1. (R)(H)(E) अभिव्यक्त, व्यक्त_केलेला, प्रकट_केलेला, जाहीर_केलेला, उघड_केलेला, अनावृत_केलेला - स्पष्ट रूपात समोर आलेला अथवा प्रकट केला गेलेला "अभिव्यक्त भावना का लपवित आहेस?"

२)

ऑनलाईन स्पोकन संस्कृत डिक्शनतरी अभिव्यक्त शब्दाचे इंग्रजी अर्थ : manifest, evident, clear,very distinct, manifestly असे देते.

माहितगार ०६:०४, १९ मार्च २०११ (UTC)

शाब्दबंध

[संपादन]

अभिव्यक्त हे विशेषण आहे असे शाब्दबंधात दिले आहे. अर्थ दिला आहे, प्रकट केलेला. मग ’अभिव्यक्त भावना का लपवीत आहेस?’ या वाक्याला काही अर्थ आहे? जे मुळातच प्रकट केलेले आहे ते लपवणार कसे? वाक्यात करून दाखवलेला उपयोग चुकलेला आहे हे उघड आहे.

आता आणखी वाक्ये करून पाहू. १. दगडी मूर्तीतून अभिव्यक्त(प्रकट झालेल्या?)विठ्ठलाने भक्ताला वर दिला. २. वर्तमानपत्रांत आरोपींची अभिव्यक्त(प्रकट केली गेलेली?)नावे छापून आली. ३. मंत्र्याने अभिव्यक्त(अनावृत केलेली?) मूर्ती लोकांना अतिशय विलोभनीय वाटली. काही अर्थबोध होतो?

एकूण काय, तर अभिव्यक्त हा शब्द मराठीत त्याच्या संस्कृत किंवा हिंदी अर्थाने वापरता येत नाही. --J १७:२६, २० मार्च २०११ (UTC)

अभिव्यक्त होणे/अभिव्यक्तिस्वातंत्र्य

[संपादन]

अभिव्यक्ती/अभिव्यक्तिस्वातंत्र्य वरील दोन नावांचे दोन लेख विकीवर आहेत. दोघांतील बराचसा मजकूर सारखाच आहे. पहिल्या लेखाच्या चर्चापानावर मी व्यक्त/अभिव्यक्त होणे/करणे असल्या शब्दरचना मराठीत करू नयेत अशा अर्थाचे काहीतरी लिहिले होते. तरीसुद्धा तसल्या रचना असलेला तो लेख अजून जिवंत आहे. दुसर्‍या लेखातही एखाद्या ठिकाणी तशीच रचना आहे. वाक्यात कर्म नसेल तर व्यक्त होणेला अर्थ नाही. बाळंत होणे सारखा व्यक्त होणे हा अकर्मक प्रकार मराठीतला नाही. ----59.96.243.163 ११:०५, १८ मार्च २०११ (UTC)

>> पहिल्या लेखाच्या चर्चापानावर मी <<
आपण लॉगिन होऊन सही केलीत, तर 'मी' या उल्लेखाचा कर्ता कोन ते कळेल. नाही तर हा मराठीतला अकर्ता प्रकार होईल (माफक विनोद म्हणून हे वाक्य घ्या. :) )
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:५९, १८ मार्च २०११ (UTC)
मी या उल्लेखाचा कर्ता कोन ते कळेल. नाही तर हा मराठीतला अकर्ता प्रकार होईल
सृष्टीका, कौन हे कर्ता; कर्ता है, वा अकर्ता; उंचे आकाशमें रहता; सदा अध्यक्ष बना रहता.
वही सच मुचमे जानता; या नही भी जानता; है किसीको नही पता....नही पता, नही है पता, नही है पता ......
अभय नातू १२:२२, १८ मार्च २०११ (UTC)

अनेक शक्यता

[संपादन]
  • १. अनवधानाने प्रवेश घ्यायचे राहून जाणे.
  • २. प्रवेश घेताना काहीतरी चूक होणे आणि ती प्रक्रिया अपुरी राहणे.
  • ३. प्रवेश घेतल्यानंतर अचानक तो अपघाताने रद्द होणे.
  • ४. मजकूर जतन केल्यानंतर आपण अदाखल असल्याचे समजूनही संगणक परत चालू करून फेरदाखल होण्यासारखी परिस्थिती नसणे, वगैरे वगैरे.

लिखाणाच्या कर्त्यापेक्षा त्या लेखनातल्या शेर्‍याच्या आशयाचा गंभीरतेने विचार व्हावा असे वाटत नाही? व्यक्त होणे या लेखाचे केवळ शीर्षकच आक्षेपार्ह नाही तर लेखात पुनःपुनः वापरलेली शब्दरचना आहे. मी व्यक्त झालो हे जर बरोबर असेल, तर मी व्यक्त आहे हेही बरोबर असले पाहिजे. सकर्मक क्रियापदाला ’लो’ आणि ’हे’ हे प्रत्यय लागत नाहीत तर अकर्मक क्रियापदाला लीत, लेत, लेस, ल्यात, ल्यास हे प्रत्यय लागत नाहीत. सकर्मक क्रियापदाला अध्याहृत का होईना पण कर्म असतेच आणि अकर्मक क्रियापदाला असलेच तर विधानपूरक(Complement) असते. त्यामुळे व्यक्त /होणे-असणे, हे प्रयोग अयोग्य. व्यक्त करणे असे लिहायचे असेल तर काय व्यक्त करायचे ते वाक्यात आले पाहिजे.--59.95.26.171 ११:४२, २० मार्च २०११ (UTC)

अभयजी हमही ने है अभिव्यक्तीकी इस सृष्टी को बनाया(बिगाडा) चुंकी हर अणूमे अपमे आपको पाते है इस लिए हमे तो सृष्टीका, कर्ता पता है :). क्षमा असावी, अंदाज लावण्या पलिकडे माझ्या हातात काही नाही, पण माझा अंदाज वरील प्रतिसाद आदरणीय जेंचा असावा.अभय,संकल्प आणि जे, मराठी व्याकरण आणि शुद्धलेखनात तुमच्याकडे मी देवमाणसे म्हणूनच पहातो. त्यामुळे प्रतिवादाचा काही प्रश्न आहे अशातला भाग नाही. कशामुळे कल्पना नाही पण व्यक्तिगत पातळीवर स्वातंत्र्य शब्दासोबत न वापरता एकट्याने 'अभिव्य्क्ती' शब्द वापरला जातो तेव्हा माझ्या विचारमालेत हिंदीतील अभिव्य्क्ती शब्दाच्या इतर अर्थ छटा अधिक येते.["लेखक लेखनाद्वारे त्याच्या विचारांची अभिव्यक्ती करतो./मनापासून स्वयंपाक करणारी कुटुंबवत्सल स्त्री आपल्या कृतीने प्रेमाची अभिव्यक्ती करते, अशा पद्धतीचा अभिव्यक्ती शब्दाचा उपयोग प्रमाण मराठीच्या दृष्टीने योग्य असेल तर, आपण मराठी विकिपीडियावर आपण जरूर वापरू पण मला अशा उपयोगाची सवय नसल्यामुळे असेल; असा उपयोग मला, भाजी करणे सारखा वाटतो. लेखक लेखनाद्वारे त्याच्या विचारांची भाजी(-आणि वाचकाची भजी-) करतो.मनापासून स्वयंपाक करणारी कुटुंबवत्सल स्त्री आपल्या कृतीने प्रेमाची भाजी करते. :) (ह्या पोरकट्ट विनोद प्रयत्नास व्यक्तिगत टिका न समजता कृपया हलकेच घ्यावे हि नम्र विनंती.)


>>>>तरीसुद्धा तसल्या रचना असलेला तो लेख अजून जिवंत आहे.

लेखास नेमके शीर्षक काय असावे हे आपणासारखी भाषातज्ज्ञ माणसे अधिक व्यवस्थीत सांगू शकतील, पण केवळ शीर्षकात चूक आहे म्हणून बाकीचा लेख जिवंत असू नये असे आपणापैकी कुणालाही म्हणावयाचे नसावे असा विश्वास आहे. किमान माझ्या दृष्टीने दोन्ही लेखांचा आशय आणि उद्देश वेगळा आहे. उद्देशातील फरक समजावून देण्यात मी कुठेतरी कमी पडतो आहे असे दिसते. अभिव्यक्तिस्वातंत्र्य या लेखाची व्याप्ती घटनादत्त आधिकार किंवा शासन/न्याय प्रणालीने दिलेले किंवा त्यांच्याकडून मिळवलेले आधिकार यादृष्टीने येते, अभिव्यक्तिस्वातंत्र्य मिळवण्याबद्दलचा प्रबोधन काळापासूनचा यूरोपिय आणि आमेरिक स्वातंत्र्य इतिहास ते भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासा पासून आभिव्य्क्तिस्वातंत्र्य ते आंतरराष्ट्रीय आणि भारतीय कायद्द्यांच्या संदर्भाने अभिव्यक्तिस्वातंत्र्य लेख अभिप्रेत आहे.
शीर्षकाचा मुद्दा तात्पुरता बाजूला ठेऊन (प्रमाण मराठी वापराचा बापुडवाणा प्रयत्न) : अभिव्यक्ती प्रकट होणे हि प्रक्रीया आहे. मी घडवत असलेला दुसरा लेख "अभिव्यक्ती प्रकट होणे" या प्रकीये बद्दलचा आहे.या लेखामागची माझी प्रेरणा नरहर कुरुंदकर यांनी स्वातंत्र्य जन्मसिद्ध नसते तर संस्कृती सिद्ध असे मत मांडणार्‍या त्यांच्या लेखातून आली (पण मी मुळ लेखन नकरता संदर्भासहीत विश्वकोशीय चौकटीत लेखन बसवण्याचा प्रयत्न करत आहे भारता बाहेर आहे संदर्भ ग्रंथ हाताशी नाहित त्यामुळे लेख पूर्ण होण्यात कालहरण होते आहे ). आणि या अभिव्यक्ती प्रकट होणे या प्रक्रीयेचा मानसशास्त्राशी संबध असू शकतो,तत्वज्ञान आणि तसेच इतर अनेक विषयांशी संबंध असू शकतो त्याचा अभिव्य्क्ती स्वातंत्र्याशी संबंध फार नंतरचा आहे.
मी या लेखात अभिव्य्क्ती प्रकट कसे व्हावे हे सांगत नाही आहे त्यामुळे हा विकिबुक्सचा विषय नाही. मी अभिव्य्क्ती प्रकट होण्याची प्रक्रीयेस विवीध शास्त्रे आणि तत्वज्ञान कोणत्या पद्धतीने विश्लेषण करतात हे सांगण्याचा उद्देश आहे.आणि एखादी प्रक्रीया कशी होते हि गोष्ट विश्वकोशीय कक्षेत बसते असे माझे मत आहे अर्थात कुणाला वेगळे मत मांडावयाचे असेल तर अधिक समजून घेण्यास निश्चित आवडेल. अभिव्यक्ती हा लेख अजून थोडा घडू द्दावा आणि मग आतील विश्वकोशीय मजकुरास कोणते शीर्षक अधिक चपखल ठरते ते ठरवावे कारण मुख्य काळजी विषयांतराची आहे. संगणक टंक या लेख शीर्षकाबद्दल चर्चा पानावर खूप चर्चा रंगली पण मंडळींनी प्रत्यक्ष लेखातील मजकुरात योगदान आणि सुधारणा करण्याचे अडगळीत पडले तसे ह्या लेखा बद्दल होऊ नये अशी इच्छा आहे. आणि इतःपर हा लेख विश्वकोशिय नाहीच अशी सर्वांची धारणा असेल तर मी तो मराठी विकिपीडियावरून काढून बाहेर लिहावयाचे झाल्यास तसे हि मान्यवर वृंदाने मनमोकळे पणाने मांडावे.मी ते राजीखुशीने मान्य करेन


विषयांतर असलेला प्रतिसाद भाग मुद्दाम शेवटी घेतोआहे.मी सोशल नेटवर्कींगच्या पिढीतला नाही त्यामुळे 'जें'चा हा आक्षेपकी शब्द प्रयोग सोशलनेटवर्कींगच्या फ्याडातून आला आहे हा माझ्यावर लागू होणार्‍या पैकी नाही तरी कृपया जे साहेब या विषयावर गैरसमज नसावा.माझी मराठी भाषा माझ्या गावी पुणेरी म्हणून अयोग्य ठरते आणि पुण्यात ती पुणेरी/प्रमाण नाही म्हणून अयोग्य ठरत आली आहे,गैरसमज ठेवायचाच असेल तर व्यक्तिगतपातळीवर मला प्रमाणभाषेचे प्रमाणाबाहेरचे कौतुक नाही म्हणून ठेवावा, वर चढणार्‍या माणसास कुणी चढला म्हणाले कुणी यंगला म्हणाले किंवा कुणी नवीन शब्द जंपला म्हणाले तरी मला तिन्ही शब्दांचे सारखेच कौतुक आहे, पण ते व्यक्तीगत पातळीवर, मला माझी व्यक्तिगतमते मराठी विकिपीडियात मुळीच लादावयाची नाही आहेत त्यामुळे चर्चेस पुढचा मुद्दा घेण्यास हरकत नसावी असे गृहीत धरतो.(तशी गरजच भासलीतर वर्‍हाडी,मराठवाडी,खानदेशी,कोकणी,चित्पावनी या सर्व बोली उपयोगात आणणार्‍यांना वीसेक माणसे गोळाकेलीतर स्वतंत्र विकिपीडिया तयार करून वेगळी चुल मांडण्याची मुक्तता विकिप्रणालीत आहे तथाकथीत ग्राम्य अशुद्ध किंवा अगदी तामीळ लिपीत तंजावरी मराठी विकिपीडिया उघडायचा झालातरी तेही शक्य आहे.पण सध्या सरी माझ्या कडे तसा प्रस्ताव नाही )
माहितगार १९:४०, १८ मार्च २०११ (UTC)

माझेही दोन थेंब...

[संपादन]

इतक्या तज्ञ मंडळींचे वाचल्यावर आपण काय बोलणार. तरीपण या दोन्ही शब्दांचे dictionary अर्थ काय आहेत ते पाहू

अभिव्यक्त : स्पष्ट, उघड ---- सोप्या मराठीत clean, plain, open

अभिव्यक्ती : १. खुलासा, स्पष्टीकरण ---- सोप्या मराठीत expression of one's thoughts, feelings, etc. २. प्रकटीकरण, आविष्कार ---- सोप्या मराठीत manifestation

या अर्थामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य या शब्दाला बळ येते. पण "अभिव्यक्त होणे" फारसे पुढे रेटता येत नाही.... :)

ही अशी गडबड होण्याची अनेक करणे आहेत, त्यातील एक महत्वाचे कारण म्हणजे - एकाच शब्द मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये आहे पण त्याचे अर्थ मात्र थोडे वेगवेगळे आहेत. उदा.

१. गर्व: हिंदी - मुझे गर्व है की मैं एक हिंदुस्थानी हू | मराठी - गर्वाचे घर खाली.....

२. आग्रह: हिंदी: विमा आग्रह की विषय वस्तू है| मराठी: मी त्याला घरी येण्याचा आग्रह केला.

मंदार कुलकर्णी

व्यक्त-अव्यक्त

[संपादन]

जी गोष्ट अव्यक्त असते तीच व्यक्त होऊ शकते. ’मी’ अव्यक्त नाही, म्हणून ’मी’ व्यक्त होऊ शकत नाही. जी गोष्ट ‘व्यक्त‘ची तीच ‘अभिव्यक्त‘ची. मनातल्या मनात्त दडवून ठेवलेल्या मत, विचार, भाव, भावना आदी गोष्टी अव्यक्त आहेत, म्हणून त्या व्यक्त करता येतात. माणूस व्यक्त किंवा अभिव्यक्त कसा होऊ शकतो ते अनाकलनीय आहे. फारतर देव किंवा भूत यांना व्यक्त म्हणजे प्रकट होता येईल, माणसाला नाही.----J १६:५५, २० मार्च २०११ (UTC)

शीर्षकाबद्दल सपशेल माघार !!! नवे शीर्षक सुचवा

[संपादन]
मंडळी मंदारांनीसुद्धा पुस्ती जोडल्यानंतर माझ्या मनात हिंदी शब्दाच्या अर्थाशी कुठेतरी गफलत झाली असे दिसते त्यामुळे शीर्षकाबद्दल आपली सपशेल माघार !!! अभिव्य्क्ती प्रकट होण्याची प्रक्रीया हा या लेखाचा विषय आहे पण "अभिव्य्क्ती प्रकट होण्याची प्रक्रीयेस" हे शीर्षक अगदीच लांबलचक आहे तात्पुरते तरी आपण सर्वांनी सुचवल्याप्रमाणे अभिव्यक्ती असे शीर्षक बदलू नंतर अजून चांगल्या शीर्षकाकरिता काय सुचना येतात ते पाहू माहितगार ०६:२१, १९ मार्च २०११ (UTC)

मला अभिव्यक्त होण्यास अजून जागा आहे ?

[संपादन]
विकिमित्रांनो मी लेख शीर्षका बद्दल सपशेल माघार घेतली हे खरे.खास करून अभिव्य्क्त होणे हि मराठीत वापरलेच जात नाही हे आदरणीय जे म्हणाले पण मला लेखातील वाक्ये अभिव्यक्त ऐवजी अभिव्यक्ती शब्दाने कशी बदलता येतील ह्या प्रश्नाचा नवीनच गुंता डोळ्या समोर उभा आहे तो अजून सुटलेला नाही.
दुसरे असे कि जेंचे हे मत कि "अभिव्यक्त होणे असा वाकप्रचार मराठी भाषेत नाहीच,कुठे असा उपयोग झाला तर तो सोशल नेटवर्कींग वाल्यांच फ्याड आहे " हे माझ्या मर्यादीत गूगल शोध यंत्राच्याच सहाय्याने शोधण्या पर्यंत सध्या तरी माझी साधने सिमित आहेत.

माहितगार १८:५३, १९ मार्च २०११ (UTC)

होतो हे क्रियापद होणेशी संबधीत समजून मी गूगल वर शोध घेतल्या वर "अभिव्यक्त होतो" या शब्द समुहाचा शोध घेतला.
  • चित्रपट हे एक माध्यम आहे.जशा इतर माध्यमातून कलाकार अभिव्यक्त होतो तसाच चित्रपटातूनही. हे वाक्य मात्र मायबोली सोशल नेटवर्क फ्याडावर आढळल
  • तरी आपण निरर्थक असे वाचाळपणे सतत बोलत राहतो. अथक अभिव्यक्त होत राहतो. पण चुकीचे तेवढे मनातच ठेवतो.परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे चार प्रकार सांगितले आहेत ज्ञानेश्वरीत. परा म्हणजे नाभीतली अव्यक्त वाणी आणि वैखरी म्हणजे प्रत्यक्ष मुखातून प्रगटणारी शब्दरूप वाणी. परा, म्हणजे खरे तर नेणीवेत विचार येतो तेव्हाच आपण स्वत:शी बोलतो. प्रत्यक्ष बोलतो तेव्हा दुसऱ्याशी अभिव्यक्त होतो आणि कृती म्हणजे आपले बोलणे समष्टीशी. विचार, वाणी आणि कृती या क्रमाने बहिर्मुख होत जाणाऱ्या आपल्या या अभिव्यक्ती.संदर्भ:प्रेम -संजय भास्कर जोशी(कादंबरीकार आणि समीक्षक) 20 Sep 2010, 0320 hrs IST महाराष्ट्र टाईम्स

"अभि" वरती अजून थोडे

[संपादन]

माहितगार, आताच माघार का बरे घेतली? मला असे वाटते कि अजून चर्चा होऊ शकते. तुमच्या "मला अभिव्यक्त होण्यास अजून जागा आहे ?" अजून थोडा विचार करायला प्रेरणा मिळाली.

मला हिंदी चा संदर्भ या चर्चेसाठी द्यायचा नव्हता. मला फक्त कुठे गडबड होऊ शकते हे नमूद करायचे होते.

अभि या शब्दाचा अजून खल केल्यावर खालील ३ ठिकाणी तो वापरला गेला आहे: १. "अभि" हा शब्द मराठी मध्ये उपसर्ग म्हणून बऱ्याच ठिकाणी वापरला जातो ज्यामुळे नंतर च्या शब्दाला जास्त वजन मिळते किंवा तेज येते. जसे: अभिजात , अभिनव, अभिभाषण, अभिरुची, अभिवचन,अभिराम, अभिवृद्धी, अभिलेख, अभिज्ञ, अभिज्ञान

२. काही वेळेला नन्तर च्या शब्दासंबंधी 'अजून काहीतरी' किंवा थोडेसे संबंधित - - जसे: अभिमुख , अभिमान, अभियांत्रिकी ,

३. संपूर्ण वेगळा शब्द ज्यात 'अभि' चा पहिल्या २ प्रकारांशी काही संबंध नाही. - - जसे: अभिप्रेत, अभिनेता, अभिनेत्री, अभिनंदन, अभिप्राय, अभियान, अभियोक्ता, अभिलाषा, अभिवादन, (माझे एखादे उदाहरण गडबडीत चुकू पण शकते तरी तेथे माफी करावी.)

मी असेही पाहिले आहे की, काही साहित्यिक 'साहित्य संमेलनात' अथवा 'चर्चासत्रात' आपले म्हणणे सांगण्यासाठी तत्क्षणी 'अभि' हा उपसर्ग शब्दाला जोडून सांगू शकतात. हा त्यांनी मराठी भाषेला बहार केलेला नवीन शब्द किंवा वाक्प्रचार असू शकतो... :)

अशा परिस्थितीत, 'अभिव्यक्त' कुठल्या प्रकारात मोडतो ? कदाचित - पहिल्या भागात......

व्यक्त करणे आणि अभिव्यक्त करणे हे अशाच प्रकारचे असू शकते काय? तसे नसेल तर आणि तो दुसऱ्या भागातील शब्द असेल तर तुम्ही सांगितलेला "अभिव्यक्त करणे / होणे " हा लेख योग्य आहे. असे माझे मत झाले आहे.

आपण तज्ञ मंडळी या विषयी शेवटचा निर्णय घेऊ शकता. मंदार कुलकर्णी)

मंदार अभ्यासपूर्ण प्रतिक्रीयेकरिता धन्यवाद.मी इतर वाचक आणी विकिपीडीयन्सच्या प्रतिक्रीयेच्या प्रतीक्षेत असेन.या निमीत्ताने माझाही या शब्द समुहा बद्दल अधीक अभ्यास होतो आहे.माहितगार ०६:२६, २० मार्च २०११ (UTC)

इंग्रजी विकिपीडियातील वेगवेगळे लेख

[संपादन]

इंग्रजी विकिपीडियात या विषयावर एकसंघ एक लेख आढळत नाही माहिती वेगवेगळ्या लेखातून विखूरलेल्या स्वरूपात आढळते.en:Expression (language) ,en:Emotional expression,en:Facial expression आणि अजून बरेच माहितगार ०८:५१, २० मार्च २०११ (UTC)

"अभिव्यक्त होणे"बद्दल चर्चा करताना विसरलेल्या गोष्टी....

[संपादन]
  • "अभिव्यक्त होणे" हा लेख लिहणार्‍या लेखकाचे अभिनंदन करण्यास सर्व विसरले.
  • लेख छानच व अभ्यासपूर्ण आहे, असे मला जाणवते.
  • अशुद्धलेखन बद्दल ही मोठी चर्चा झालेली वाटते, परंतु त्यातील त्रुटी दुर कराव्या कोणास ही वाटले नाही, याचे रहस्य मला उमगले नाही. मी काही शहरी अथवा शुद्धलेखन मधील जाणकार आहे असे काही एक नाही.
  • "ओबडधोबड भाषांतर" असे म्हणण्याइतका लेख खराब नाही.
  • अभिव्यक्त होणे या लेखाचे शीर्षक आक्षेपार्ह नाही.
  • इतक्या तज्ञ मंडळींचे वाचल्यावर आपण काय बोलणार. पण अभिव्यक्त होणे ही व्यक्त होणे नव्हे की जे जाणून बुजून होते.


Dr.sachin23 १७:३९, २३ मार्च २०११ (UTC)

Dr.sachin आपल्याला लेख आवडल हे वाचून बरे वाटले,मेहनतीचे सार्थक झाले की चांगले वाटते, कदाचित बराक ओबामांना (-हे म्हणजे काजव्याने सुर्याशी तुलना करून घेण्याचा सोस बाळगण्या सारखे आहे-) जसे शांततेचे नोबेल प्राईज लवकर मिळाले असे बर्रेच जण मानतात,तसे ह्या लेखावर अजून बरेच काम बाकी आहे तरी सुद्धा अभिनंदन करून दाद देऊन हुरूप दिलात याबद्दल धन्यवाद.
"ओबडधोबड भाषांतर" टिकेबद्दल म्हणाल तर लेखात नमुद केल्याप्रमाणे आशयाचे बौद्धिक मुल्य स्विकारवायाचे का नाही आणि स्विकारले तर त्याचे मूल्यांकन आशय प्राप्त करणार्‍या व्यक्ती, समूह किंवा संस्थेवर अवलंबून असते. मराठी विकिपीडियावर सदस्य 'जे' यांचे विवीध लेखातील शुद्धलेखन दुरूस्त्यात बरेच सक्रीय योगदान राहिले आहे, त्यामुळे त्यांचे आक्षेप चिंतनीय असतात.पण या वेळी लेखात नेमका बदल कुठे आणि कसा करावा हे मलाही सुचले नाही.सुयोग्य दुरूस्त्या करून आपण लेखात हातभार लावल्यामुळे काम बरेच हलके झाले त्याबद्दल सुद्धा धन्यवाद
अभिव्यक्त करणे या खेरिज त्यांचा दुसरा आक्षेप अभिव्यक्तीची निर्माता कोण आणि कोणती अभिव्यक्ती निर्मित करतो आहे हे लेखातील वाक्यात नमुद नसण्या बद्दल असावा असा माझा समज झाला आहे. कदाचित 'एक किंवा अधिक गोष्टी अभिव्यक्त करताना, अभिव्यक्त होणारा/र्‍या व्यक्ती' किंवा 'एक किंवा अधिक गोष्टी अभिव्यक्तींची निर्मिती करताना, अभिव्यक्तीस निर्मित करणारा/र्‍या व्यक्ती' असे काही त्यांना अभिप्रेत आहे का ते विचारून पहता येईल पण त्यामुळे पुनरूक्ती, (कृत्रिमता कारण मला तसे लिहिण्याची नैसर्गीक सवय नसल्यामुळे) आणि लांबण लागण्याचे दोष येतील किंवा काय य बद्दल चिंतीत आहे.माहितगार ०४:११, २४ मार्च २०११ (UTC)