चर्चा:अक्षय्य तृतीया

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एकाच लेखावर एकाच वेळी अनेकांनी संपादने टाळावीत[संपादन]

@ आणि आर्या जोशी: फ़क्त नोंद रहावी म्हणून मी ही बाब इथे नोंदवत आहे, आर्या जोशीने दिलेले दोन पुस्तकांचे संदर्भ, कुठलेही कारण न देता काढून टाकले गेले होते, ते मी पुर्ववत करुन सुधारलेल्या अवस्थेत पुन्हा जोडले आहेत. "ज" कडून कृती चुकून/नजर चुकीने झाली असावी असे आपण(गुड फ़ैथ/परस्पर विश्वास) गृहित धरुन पुढे जायला हरकत नाही. धन्यवाद! WikiSuresh (चर्चा) ०३:४६, १० एप्रिल २०१८ (IST)[reply]


@WikiSuresh: धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) ०६:५०, १० एप्रिल २०१८ (IST)[reply]


@WikiSuresh: ' एकाच लेखावर एकाच वेळी अनेकांनी संपादने टाळावीत' असे म्हणणे फार सोपे आहे, पण ते प्रत्येक वेळा शक्य असेलच असे नाही.

मी लांबलचक मजकूर लिहिला असताना मध्येच कुणीतरी येऊन आपलेच घोडे दामटत असेल, तर मला त्याकडे दुर्लक्ष करून आपली संपादनाची मोहीम पुढे चालवावी लागते. माझा संगणक अतिशय मंद आहे, त्यावर नोटपॅड किंवा वर्डपॅड या सोयी नाहीत. मी टंकलिखित केलेला मजकूर मी कोठेही साठवून ठेवू शकत नाही. आमच्याकडे वारंवार वीज जाते. मला फक्त एका हाताने टंकलेखन करावे लागते; टंकलिखित केलेला मजकूर वाचण्यासाठी चष्मा काढावा लागतो व लेखन अतिशय थोडे होते. त्यामुळे दुसऱ्याने भरीत भर घातलेल्या मजकुराकडे मला अत्यंत निर्दयीपणाने कानाडोळा करावा लागतो. असे अनेकदा हॊत असले तरी त्यानंतर माझ्याकडून त्या 'दुसऱ्या'ने केलेले संपादन वाचून यॊग्य सुधारणांसह मूळ लेखात साभार समाविष्ट केले जातेच जाते.

यावेळी कार्यबाहुल्यामुळे तसे जमले नसावे. .... (चर्चा) १४:२७, १० एप्रिल २०१८ (IST)[reply]