Jump to content

चर्चबेल (ललित लेखसंग्रह)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चर्चबेल हा मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा पहिला लघुनिबंधसंग्रह होय. इ.स. १९७४ मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. या संग्रहात पस्तीस ललित लेख आहेत. त्यांपैकी चौतीस लेख नागपूरच्या 'तरुण भारत'च्या साप्ताहिक आवृत्तीत प्रसिद्ध झालेले होते.

अर्पणपत्रिका

[संपादन]

अवलिया

ताजुद्दीन

संगीतकार
रोशन यांच्या
पवित्र

स्मृतीस...

परिचय

[संपादन]

आत्मपर आशय असूनही भावमधुर काव्याची प्रचिती देणारे लेख या संग्रहात आहेत. 'चर्चबेल'मध्ये ग्रेसच्या अन्य कवितांच्या तुलनेत अधिक सुगमता आहे आणि लक्षपूर्वक वाचल्यास 'कवी' ग्रेस समजून घेण्यासाठी त्यांचे ललित लेख फारच महत्त्वाचे ठरतील हे लक्षात येते.

भाषांतर

[संपादन]

डॉ. जया मेहता यांनी चर्चबेलचा गुजराती भाषेत केलेला अनुवाद प्रकाशित झालेला आहे. []

संदर्भ

[संपादन]