Jump to content

चपराळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जिल्हा मुख्यालयापासून 70 ते 75 कि.मी. अंतरावर चामोर्शी तालुक्यातील चपराळा हे एक भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे.

चपराळा येथील मंदिर:

  • येथे कार्तिक स्वामी महाराजांचे मंदिर आहे. त्याला लागून साईबाबा, शंकर, मारोती इत्यादीचे मंदिर व शिवलिंग आहे. महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते.
  • हनुमान जयंतीला येथे काला व भजन किर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

येथे नेहमीच भाविकांची गर्दी असते.

मंदिरापासून जवळच वर्धा-वैनगंगा नदीचा संगम आहे, यालाच प्रशांतधाम असे म्हणतात. 

नदीचे पात्र विस्तीर्ण असून त्यांचे दोन्ही काठ नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहेत. मंदिरासमोरून आजु-बाजुला घनदाट सागवानाची झाडे व काही चंदनाचे वृक्ष आहेत.

  • या मंदिराच्या परिसरात जंगल असल्यामुळे भाविकांना व पर्यटकांना वृक्ष छायेचा आश्रय घेऊन थांबण्यास अधिक मौज वाटते. 

चपराळा हा अभयारण्य परिसर असून वनखात्याच्या क्षेत्रात येतो. येथे वनखात्यामार्फत विकास करण्यात येत असून देखरेखीसाठी निरीक्षण कुटी तयार करण्यात आले आहे. यामुळे वन्यप्राण्यांचे व वनांचे संरक्षण करण्यास मदत झाली आहे.

  • या अभयारण्यात वाघ, बिबटया, रानडुक्कर, निलगाय, सांबर, चित्ता, हरीण, रानमांजर, कोल्हे, ससे इत्यादी वन्यप्राणी आढळतात.

शिवाय अनेक जातीचे पक्षी देखील दिसून येतात.