चक्रधरस्वामी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हिंगोली जिल्ह्यातल्या शेवाळा गावातील (तालुका कळमनुरी) महदंबा साहित्य संघ, ही संस्था दरवर्षी चक्रधरस्वामी साहित्य संमेलन भरवते. या संस्थेने भरविलेली काही संमेलने : -

  • १ले ग्रामीण चक्रधरस्वामी साहित्य संमेलन, शेवाळा (जिल्हा हिंगोली) येथे इ.स. २००६मध्ये झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. राम शेवाळकर होते.
  • २री, ३री आणि ४थी ग्रामीण चक्रधरस्वामी साहित्य संमेलने, शेवाळा (जिल्हा हिंगोली) येथे २००७ ते २०११ या दरम्यान झाली.
  • ५वे राज्यस्तरीय चक्रधरस्वामी साहित्य संमेलन, माहूर (जिल्हा नांदेड) येथे १३ फेब्रुवारी २०११रोजी झाले.
  • ६वे राज्यस्तरीय चक्रधरस्वामी साहित्य संमेलन, हिंगोली येथे इ.स. २०१२मध्ये झाले.
  • ७वे राज्यस्तरीय चक्रधरस्वामी साहित्य संमेलन, भेंडेगाव (जिल्हा हिंगोली) येथे १७-१८ मार्च २०१३ या दिवसांत झाले. डॉ. आ.ह. साळुंखे अध्यक्ष होते.
  • ८वे राज्यस्तरीय चक्रधरस्वामी साहित्य संमेलन, इजळी (जिल्हा नांदेड) येथे २-३ मार्च २०१४ला झाले. अध्यक्षस्थानी उत्तम कांबळे होते..


पहा : साहित्य संमेलने