चंद्रा तळपदे मोहांती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


दोन दशके स्त्रीवादी अभ्यासाच्या प्रवाहात राहिल्या, झगडल्यानंतर हे पुस्तक निर्माण झाले असे लेखिका म्हणते. तिसरे जग आणि बहुराष्ट्रीय स्त्रीवाद याच्या अभ्यासक असलेल्या मोहंती यांची सहसंपादीत पुस्तके प्रसिद्ध आहेत. उदा.थर्ड वर्ल्ड वुमेन अन्ड द पॉलिटिक्स ऑफ फेमिनिझ् (१९९१),आणि फेमिनिस्ट जीनिओलोजीज कॉलोनीअल लीगसीज,डेमोक्रेटिक फ्युचर्स(१९९७).

या पुस्तकात वंचित आणि शोषित स्त्रियांच्या अनुभवांना मान्यता देताना सत्ता संबंध कसे काम करतात याचा आढावा आढावा घेण्यात आला आहे. सक्षमिकरणाचे "ज्ञान" आणि स्त्रीवाद्यांची युती या संदर्भातील सिद्धांकने आणि व्यवहार यांचा गोषवारा या पुस्तकात आहे. या दोन्ही संकल्पना राजकीय दृष्ट्या सिद्धांकन म्हणून भिन्न आहेत. राजकीय दृष्ट्या निष्कर्ष काढण्यासाठी आणि त्यावर काम करण्यासाठी वेगवेगळ्या स्त्रीवादी संकल्पना मग त्या अध्यापन आणि विना-अध्यापन,सैद्धांतिक किंवा प्रायोगिक असल्या तरीही त्यांचा उपयोग केला पाहिजे. स्त्रीवादाची युती ही लेखिकेची कल्पना रॉबिन मॉरगनच्या "भगिनीभाव" या संकल्पनेच्या पुढे जाते. लेखिकेच्या मते, भगिनीभावामध्ये तात्कालीन साम्राज्यवादाचे परिणाम आणि प्रत्येकाचा भिन्न इतिहास पुसला जाऊन "सहमती" आणि मुद्द्यांचे प्रामाणिकिकरण हे वेगवेगळ्या समुहातील नात्यांचे आधार ठरतात.

या पुस्तकात प्रस्तावनेश नउ प्रकरणे आहेत. यातील बहुतांश लेख पूर्वी प्रसिद्ध झालेले आहेत. लेखिकेच्या मते हे पुस्तक एका क्रमवारीत नसून मांडण्याची विविध आवर्तने आहेत,ज्यामध्ये एकच प्रश्न किवां समान प्रश्न वेगवेगळ्या पातळीवर विचारला जातो. या पुस्तकाचे तीन भाग आहेत. "स्त्रीवादाचे निर्वसह्तीकरण