घेता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कविवर्य विंदा करंदीकर यांची घेताही कविता मराठी साहीत्यात मह्त्वपूर्ण मानली जाते.या कवितेत सुंदर निसर्ग रुपके आहेत. मानवाला इतक घे की देणारा होशील असाही संदेश ही कविता देते.

घेता[संपादन]

देणा-याने देत जावे;

घेणा-याने घेत जावे.


हिरव्यापिवळ्या माळावरुन

हिरवीपिवळी शाल घ्यावी;

सह्याद्रीच्या कड्याकडून

छातीसाठी ढाल घ्यावी.


वेड्यापिशा ढगाकडून

वेडेपिसे आकार घ्यावे;

रक्तांमधल्या प्रश्नांसाठी

पृथ्वीकडून होकार घ्यावे.

उसळलेल्या दर्याकडून

पिसाळलेली आयाळ घ्यावी;

भरलेल्याशा भीमेकडून

तुकोबाची माळ घ्यावी.


देणा-याने देत जावे;

घेणा-याने घेत जावे;

घेता घेता एक दिवस

देणा-याचे हात घ्यावे!

काव्याकलन[संपादन]

  • काव्यालकन हा लेख अपुर्ण आहे .तो पूर्ण करण्यास मदत करा