Jump to content

घुघुतिया (कुमाऊँ सण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(घुघुतिया ( कुमाऊँ सण) या पानावरून पुनर्निर्देशित)

घुघुतिया किंवा घुघुती हा भारत देशाच्या कुमाऊँ प्रदेशात साजरा होणारा उत्तरायणाशी संबंधित सण आहे. गढवाल येथे यालाच खिचडी संक्रांती असे म्हंटले जाते.[]

स्वरूप

[संपादन]

सणाच्या आदल्या दिवशी कणीक आणि गूळ यांच्या मिश्रणापासून वेगवेगळे आकार देऊन पदार्थ केला जातो. याला घुघुत असे म्हणतात. सणाच्या दिवशी आपल्या दिवंगत पूर्वजांना ते मिळावेत यासाठी लहान मुले हा पदार्थ कावळ्यांना खायला घालतात.[]

आख्यायिका

[संपादन]

कुमाऊँच्या राजाला अपत्य नव्हते. त्याने भागणाठ मंदिरात प्रार्थना केली आणि त्याला पुत्रप्राप्ती झाली. राजाचा मंत्री त्याच्या राज्य मिळविण्याच्या ईर्षेने राजाचा देश करीत असे. राजाच्या पुत्राचे नाव घुघुती असे होते,. राणीने आपल्या मुलाच्या गळ्यात हिऱ्यांचा हार घातलेला होता. घुघुती आईचे ऐकत नसेल तर ती त्याला सांगायची की त्याने जर आईचे ऐकले नाही तर ती त्याचा आहार कावळ्याला देऊन टाकेल. लहान राजपुत्र कावळ्यांना खाऊ देत असे. एके दिवशी दुष्ट मंत्र्याने राजपुत्राने अपहरण केले आणि तो जंगलाच्या दिशेने जावू लागला. कावळ्यांनी हे पाहिले. त्यांनी मंत्र्याच्या माणसांना चोचीने मारायला सुरुवात केली. घुघुतीने आपला हार कावळ्याला दिला. तो हार घेऊन कावळा महालात गेला त्यामुळे राजाला समजले की राजपुत्र संकटात आहे. राजपुत्राची सुटका झाल्यानंतर राजाने मंत्र्याला मृत्युदंड दिला. घुघुतीने कावळ्यांना गोड खाऊ खायला घातला. त्या वेळेपासून घुघुती सणाला कावळ्यांना खाऊ देण्याची पद्धती आहे अशी कथा प्रसिद्ध आहे.[]



संदर्भ

[संपादन]
  1. ^ नवभारतटाइम्स.कॉम (2022-01-14). "मकर संक्रांति के अवसर पर क्यों खाते हैं खिचड़ी, तिल और तिलकुट". नवभारत टाइम्स (हिंदी भाषेत). 2022-01-31 रोजी पाहिले.
  2. ^ "घुघूतिया का त्यौहार".[permanent dead link]
  3. ^ "मकर संक्राति पर पहाड़ में कौवों के लिए मनाया जाता है 'घुघुतिया' त्योहार, जानें- इससे जुड़ी रोचक कथा". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2022-01-18 रोजी पाहिले.