घळ
Appearance
(घळी या पानावरून पुनर्निर्देशित)
दोन्ही बाजूला भिंतीसारखे डोंगर असून मधल्या भागात असलेल्या अत्यंत अरुंद दरीला घळ म्हणतात. सह्याद्रीत अनेक घळी आहेत, पण वरंधा घाटातील शिवथर घळ सर्वात प्रसिद्ध आहे . शिवथर घळीतच समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ रचला.
याशिवाय अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील सांदन घळ, ......... वगैरे घळी कमीअधिक प्रमाणात माहीत असतात. घळ ही अरुंद आणि बऱ्यापैकी लांब दरी असते. तिच्यात प्रवेश केल्यावर दुसऱ्या टोकाला बाहेर पडण्याचा सोपा मार्ग असेलच असे नाही. कित्येकदा त्या टोकाला कडा असू शकतो.