ग्रीन काउंटी, अलाबामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यूटॉ येथील ग्रीन काउंटी न्यायालय
Disambig-dark.svg

ग्रीन काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र यूटॉ येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,७३० इतकी होती.[२] या काउंटीची जनसंख्या अलाबामामध्ये सगळ्यात कमी आहे. यातील ८१% व्यक्ती आफ्रिकन वंशीय अमेरिकन आहेत.

ग्रीन काउंटीची रचना १३ डिसेंबर, १८१९ रोजी झाली. या काउंटीला ऱ्होड आयलंडच्या सेनापती नथानियेल ग्रीनचे नाव दिले आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. April 7, 2022 रोजी पाहिले.