ग्रंथालयशास्त्र
ग्रंथालयातील पुस्तके आणि त्या अनुषंगिक शास्त्राला ग्रंथालयशास्त्र असे म्हणतात. यामध्ये खालील बाबींचा येतात
- ग्रंथालयातल्या पुस्तकांच्या आणि इतर साहित्यांच्याचे व्यवस्थापन
- ग्रंथपाल प्रशिक्षण
- पुस्तकांची मांडणी
- साठवण
- माहितीचा योग्य पुरवठा
- पुस्तक हाताळणीची तंत्रे
हे शिकवले जाते.
व्यवस्थापन
[संपादन]ग्रंथालय व्यवस्थापनाचेशास्त्र आहे. पुस्तके अथवा माहितीचे स्रोत वेळेवर योग्यरीत्या सापडावेत या साठी कशारीतीने रचता आले पाहिजेत याचे भान ठेवून ग्रंथालयाचे व्यवस्थापन केले जाते. ग्रंथालय व माहितीशास्त्र या शास्त्रामध्ये प्रामुख्याने माहिती साधनांचे संग्रहण, संस्करण व संप्रेषण केले जाते. त्यासाठी काही पद्धती वापरल्या जातात. या पद्धती म्हणजेच वर्गीकरण, तालिकीकरण होत. वर्गीकरण इ. साठी अनेक संगणक प्रणालीही आता उपलब्ध आहेत. ग्रंथालय व्यवस्थापनाचे स्वतंत्र असे शास्त्र आहे. शिआली रामामृत रंगनाथन यांनी ग्रंथालय व्यवस्थापनाचे काही नियम सांगितलेले आहेत.
याशिवाय ग्रंथालय व्यवस्थापनात खालील अंगेही महत्त्वाची मानली जातात.
- नवीन सदस्यांसाठी एक नोंदणीच्या वेळी वाचनालय कसे वापरावे याचे प्रशिक्षण देणे.
- आपले नियम सुकर आणि पुस्तके वापरणाऱ्यांच्या दृष्टीकोनातून कसे आहेत हे तपासून पाहणे.
- आपली ग्रंथसंपदा केव्हढी आणि किती उपयोगी आहे याचे वेळोवेळी प्रदर्शन मांडणे.
- नियम 'का आहेत' हे सदस्यांना वारंवार समजावून देणे.
- ग्राहकसेवेचे प्रशिक्षण सर्व ग्रंथालय सेवकांना देणे - आणि कायम देत राहणे.
- ग्रंथालय आणि वाचक वेगळे नाहीत हे व्यवस्थापनाने मान्य करणे.
- मुक्त संचार देण्यासोबत सुरक्षेचे उपाय राबवणे.
- वाचनसंस्कृती रुजविणे.
- आपली ग्रंथ संपदा ही समाजाच्या गरजेशी निगडित आहे आणि राहिल हे सतत पाहणे.
नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेउन ग्रंथालय व्यवस्थापनाने आपले ग्रंथालय इतर ग्रंथालयांसोबत साखळीत जोडणे आवश्यक असते. यामुळे कोणतेही पुस्तक कुठेही परत करणे सोपे होते, आणि इतर वाचनालयातली पुस्तके पण कोठे ही नाममात्र फी मध्ये उपलब्ध होऊ शकतात. यासाठी संगणकीकरण मोठीच मदत करु शकते.
प्रमाणीकरण
[संपादन]
आय एस ओ (International Organization for Standardization) (इंग्रजी:ISO) ने ग्रंथालयांच्या व्यवस्थापनाच्या प्रमाणीकरणाचे काही नियम प्रसिद्ध केले आहेत. (ही यादी परिपूर्ण नाही.)
- ISO 2789:2006 Information and documentation — International library statistics
- ISO 11620:1998 Information and documentation — Library performance indicators
- ISO 11799:2003 Information and documentation — Document storage requirements for archive and library materials
- ISO 14416:2003 Information and documentation — Requirements for binding of books, periodicals, serials and other paper documents for archive and library use — Methods and materials
- ISO/TR 20983:2003 Information and documentation — Performance indicators for electronic library services
या क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानानुसार पुस्तकांसोबतच सीडीज, मायक्रोफिल्म्स, व्हीडिओज, कॅसेट्स, स्लाइड्स, संशोधनपत्र, संदर्भग्रंथ अशा अनेक गोष्टी अंतर्भूत असतात. पारंपरिक ग्रंथालयाची कल्पना आता बदलली असून इंटरनेट, र्व्हच्युअल बुक्स इथपर्यंत त्याचा विस्तार झालेला आहे. त्यात शाळा, महाविद्यालये, इन्स्टिट्युट्स यासारख्या संस्थांमधल्या ग्रंथालये सांभाळण्यासाठी व्यवस्थापकांना ग्रंथपालांची आवश्यकता असते. यामध्येही सार्वजनिक आणि खासगी लायब्ररी असे प्रकार असतात.
इतिहास
[संपादन]भारतात स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी फार मोठे योगदान दिले असे मानले जाते. त्यांनी पाच सूत्रे सांगितली होती ती म्हणजे
- ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत
- प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे
- प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे
- वाचकांचा व सेवकांचा वेळ वाचला पाहिजे
- ग्रंथालय ही वधिर्ष्णू संस्था आहे.
तसेच रंगनाथान यांनी या विषयाची अनेक पुस्तके लिहिली आहेत ग्रंथालयशास्त्र पाचसूत्रे. द्विबिंदू वर्गीकरण पद्धती (कोलन वर्गीकरण) वर्गुकृत तालीकिकरण पद्धती. पुणे विद्यापीठात, अनेक वर्षांपूर्वीच ग्रंथालयशास्त्राचा अभ्यासक्रम विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल श्री. हिंगवे यांनी सुरू केला. श्री. हिंगवे, हे भारतीय ग्रंथपालनाचे जनक डॉ. रंगनाथन यांच्या मोजक्या शिष्यांपैकी एक होत. महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालयांची उपयुक्तता ध्यानात घेऊन १९६७ साली 'महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम' हा कायदा अमलात आला. महाराष्ट्रात मान्यताप्राप्त ग्रंथालय संघांना ग्रंथालय संचलनालय महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत अनुदान देण्यात येते. भारतामध्ये ग्रंथालयाची सुरुवात प्राचीन कालपासूनच झालेली दिसून येते. भारतातील प्राचीन विद्यापीठामध्ये प्रशस्त अशी ग्रंथालये होती. उदा. तक्षशीला , नालंदा ' वल्लभी अशी अनेक प्राचीन विद्यापीठे ग्रंथालय संपन्न होती. त्या ग्रंथालयामध्ये लाकडाच्या सालीवर, झाडाच्या पानावर लिहिलेली अनेक ग्रंथ उपलब्द होती.
शिक्षण आणि पात्रता
[संपादन]आधुनिक शिक्षणात आधुनिक ग्रंथालय व माहिती शास्त्रज्ञास संगणक; तसेच आंतरजालाचा योग्य वापर , ग्रंथालयातील कामकाजासाठी योग्य संगणक प्रणाली वापरणे या तांत्रिक कौशल्यांबरोबरच वाचकांच्या माहितीच्या बदलत्या व गुंतागुंतीच्या गरजांचा मानसशास्त्रीय अभ्यास करून माहितीचे संकलन व विश्लेषण करून ती तत्काळ पुरविणे ही कौशल्ये महत्त्वाची मानली जातात. या मध्ये बी.लिब. एस्सी. व एम.लिब.एस्सी. असे अभ्यासक्रम आहेत. ग्रंथालय शास्त्र (लायब्ररी सायन्स कोर्स) पारंगत होण्यासाठी कमीत कमी पदवीधर असणे आवश्यक असते. या नंतर ग्रंथालय शास्त्र (लायब्ररी सायन्स)चा एका वर्षाचा कोर्स करून मास्टर कोर्स करता येतो. त्यानंतर आवडीनुसार उच्च शिक्षण पीएचडी किंवा एमफील घेता येते. यामध्ये डिप्लोमा आणि सटिर्फिकेट कोसेर्सही उपलब्ध असतात. यामध्ये लायब्ररी सिस्टिम मॅनेजमेण्ट, वगीर्करण पद्धती, बिबिलिओग्राफी, डॉक्युमेण्टेशन अशा गोष्टी शिकवल्या जातात.[ संदर्भ हवा ]
विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रम
[संपादन]पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रम हा एक इंग्रजी व मराठी अशा दोन्ही माध्यमातून अभ्यासक्रम उपलब्ध आहे. हा चार सत्रात पूर्ण होतो.
पुस्तके
[संपादन]ग्रंथालयशास्त्रावरील मराठी भाषेतील पुस्तके
- ग्रंथालय संगणकीकरण आणि आधुनिकीकरण
लेखक – डॉं. द.ना.फडके ,युनिव्हर्सल प्रकाशन,पुणे
- ग्रंथालय व्यवस्थापन
लेखक – डॉं.सत्यप्रकाश निकोसे,प्रज्ञा प्रकाशन,नागपूर
- ग्रंथालय आणि माहितीशात्र – संशोधन पदधती
लेखक – डॉं.सत्यप्रकाश निकोसे,प्रज्ञा प्रकाशन,नागपूर
- सुलभ ग्रंथालयशास्त्र
लेखक – डॉं.प्रकाश जैन, डॉं.प्रमोद डाखोळे, डॉं.दत्तात्रय देॅंशपाडे, डॉं.खेडकर
- सुलभ माहिती तंत्रज्ञान
लेखक- डॉ.प्रकाश जैन आणि डॉ. मंगला हिरवाडे
- औद्योगिक माहिती प्रणाली
लेखक- डॉ. श्रीराम रोकडे
- ड्यूई दशांश वर्गीकरण पद्धती : प्रात्यक्षिक
लेखक- अशोक खेडकर
- माहिती सेवा व साधने
लेखक- डॉ. किशोर काळे
- संदर्भ सेवा आणि माहिती साधनांचे मूल्यांकन
लेखक- किशोर काळे
विश्व पब्लिशर्स ॲंन्ड डिस्टिब्युटर्स 0712-2726592, वैकुंठधाम अपार्टमेंट,बिज़ाणी महिला महाविद्यालया जवळ,दक्षिणामूर्ती रोड, महाल,नागपूर
- डांयमड ग्रंथालय व माहीतीशास्त्रकोश
संपादक-प्रा डॉं.एम बी कोण्णूर,सुजाता कोण्णूर,उषःप्रभा मांणगॉंवकर डांयमड पब्लिकेशनस,पुणे
- ग्रंथालय व माहीतीशास्त्रकोश:व्यवस्थापनाचे नवे प्रवाह
लेखक – प्रा जी ए बुवा , श्री साई प्रकाशन, जुनी ग्रांमपंचायत कार्यालयानजिक,बांदा,ता-सांवतवाडी जि-सिंधुदुर्ग
- प्रगत सामाजिक संशोधन पद्दती व सांख्यिकी
लेखक – प्रा. डॉं.दिलीप खैरनार डांयमड पब्लिकेशनस,पुणे
- प्रलेखन आणि माहितीशास्त्र
लेखक – रेवती नरगुंदे , युनिव्हर्सल प्रकाशन ,पुणे (रेवती नरगुंदे यांची ग्रंथालयशास्त्रावरील इतर पुस्तकेही आहेत)
- ग्रंथालय व माहीतीशास्त्र
लेखक –एस पी पवार,बडकते,पवार,जाधव,कुलकर्णी फडके प्रकाशन,कोल्हापुर
- ग्रंथालय व माहीतीशास्त्रकोश : नेट/सेट वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरे (Objective)
लेखक –प्रा. तानाजी कांबळे, फडके प्रकाशन,कोल्हापुर
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- ग्रंथालय संचलनालय महाराष्ट्र राज्य Archived 2016-03-28 at the Wayback Machine.
- ग्रंथालय
- पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रम
- पुस्तकांच्या विश्वात..[permanent dead link]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |