गोवारी स्मारक (नागपूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२३ नोव्हेंबर इ.स. १९९४ रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असतांना, गोवारी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला.त्यात चेंगराचेंगरी होऊन १२३ लोक मृत्यूमुखी पडले. त्यांच्या शिष्टमंडळाची आदिवासी कल्याण मंत्री मधुकरराव पिचड यांनी वेळेत भेट न घेतल्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली असाही आरोप झाला. या नंतर राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी-मार्च १९९५ दरम्यान निवडणूका झाल्यात. त्यावेळी शिवसेना-भाजप युतीचे सरकार राज्यात आले.[ संदर्भ हवा ]

या घटनेबद्दल सहानुभूती म्हणून नागपूर येथे शून्य मैलाचे दगडाशेजारी युती सरकारद्वारा गोवारी स्मारक बांधण्यात आले.[ संदर्भ हवा ]

संदर्भ[संपादन]