गोरख थोरात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डाॅ. गोरख थोरात (जन्म : संगमनेर, १ जून १९६९) हे मराठी पुस्तकांचे हिंदीत आणि हिंदी पुस्तकांचे मराठीत अनुवाद करतात. ते पुणे विद्यापीठाचे एम.ए. पीएच.डी. असून पुण्याच्या सर परशुरामभाऊ काॅलेजात हिंदीचे प्राध्यापक आहेत. त्यांनी अनुवादित पुस्तकांखेरीज अनेक शैक्षणिक, समीक्षात्मक आणि वैचारिक पुस्तके लिहिली आहेत.

गोरख थोरात यांची पुस्तके[संपादन]

  • अनुवाद तंत्र आणि आव्हाने (संपादित)
  • ऐसा सहारा और कहाँ (हिंदी)
  • चित्र मुद्गल के कथा साहित्य का अनुशीलन (हिंदी)
  • बालगंधर्व- आधुनिक मराठी रंगमंच के एक मिथक की तलाश (मराठीतून हिंदीत अनुवादित; मूळ अभिराम भडकमकरलिखित 'असा बालगंधर्व' ही कादंबरी)
  • देखणी (मराठीतून हिंदीत अनुवादित; मूळ भालचंद्र नेमाडे यांचा देखणी हा कविता संग्रह). : या अनुवादाला अमर उजाला या संस्थेचा २०१८ सालचा शब्द सन्मान मिळाला आहे.
  • प्रयोगमूलक हिंदी (हिंदी)
  • हिन्दू : जीने का समृद्ध कबाड़ (मराठीतून हिंदीत अनुवादित; मूळ भालचंद्र नेमाडे यांची मराठी 'हिंदू : एक समृद्ध अडगळ' ही कादंबरी)

गोरख थोरात यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]